Agriculture news in marathi;Dakbar sowing crisis in Akola district | Agrowon

अकोला जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकट

टीम अॅग्रोवन
शनिवार, 20 जुलै 2019

अकोला ः पावसाचा खंड आणि त्यातच दिवसाचे तापमानसुद्धा वाढल्याने जिल्ह्यात पेरणी झालेले बहुतांश क्षेत्र अडचणीत आले आहे. काही भागांत दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची भीती आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३ लाख ५० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तर, पावसाअभावी एक लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पेरणी रखडली आहे. शेतकरी पावसासाठी आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. 

अकोला ः पावसाचा खंड आणि त्यातच दिवसाचे तापमानसुद्धा वाढल्याने जिल्ह्यात पेरणी झालेले बहुतांश क्षेत्र अडचणीत आले आहे. काही भागांत दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची भीती आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३ लाख ५० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तर, पावसाअभावी एक लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पेरणी रखडली आहे. शेतकरी पावसासाठी आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. 

कृषी विभागाने खरीप हंगामासाठी ४ लाख ८० हजार हेक्टरवर पेरणीचे नियोजन केलेले आहे. पावसाचे आगमन उशिरा झाल्याने  शेतकऱ्यांनी कमी-जास्त प्रमाणात पेरण्यांना सुरवात केली होती. दरम्यानच्या काळात अधूनमधून पाऊस झाल्याने पिके तरारलीसुद्धा. जिल्ह्यात आतापर्यंत ७५ टक्के क्षेत्र लागवडीखाली आले. 

दरम्यान, लागवड झालेल्या क्षेत्रात सोमवारअखेरीस (ता. १५) कापूस १ लाख २२ हजार ५६, सोयाबीन १ लाख ४३ हजार ३६२, तूर ४४ हजार ८९१, उडीद १० हजार ६८८, मूग १४ हजार १५३, ज्वारी ८ हजार २०६ व बाजरी २१२ हेक्टरवरील पेरणी झालेली आहे. मात्र, आता पावसाने दडी मारल्यामुळे अंकुरलेले पीक जळण्यास सुरवात झाली आहे. अनेक ठिकाणी हलक्या जमिनीवरील पेरणी उलटलीसुद्धा आहे. काही शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली. या आठवड्यात पाऊस न आल्यास सर्वत्र दुबार पेरणीचे संकट वाढणार आहे. या संकटात शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जावी, अशी मागणी शेतकरी व विविध संघटना करू लागल्या आहेत. 

मूर्तिजापूर तालुका पिछाडीवर
या हंगामात जिल्ह्यात मूर्तिजापूर तालुका सर्वांत पिछाडीवर पडला आहे. गेल्या वर्षी या तालुक्यात जूनमध्येच जोरदार पाऊस होऊन पेरण्या आटोपल्या होत्या. यंदा अर्धा जुलै लोटूनही केवळ २६ हजार ४७६ हेक्टरवर म्हणजेच ३६ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली. अनेक शेतकऱ्यांनी पीक मोडून काढले आहे. आता दुबार पेरणी करायची म्हटले, तरी जमिनीत ओल नसल्याने पेच बनलेला आहे.

तालुकानिहाय झालेली पेरणी (हेक्टरमध्ये) 

तालुका पेरणी क्षेत्र टक्केवारी
अकोला ७३८९६ ७०
पातूर ४०८६० ७८
बाळापूर ४८२०९ ८०
अकोट ५८२६१ ८५
बार्शीटाकळी ५१३५७ ८२
मूर्तिजापूर २६४७६ ३६
तेल्हारा ४३७८७ ७७

मी ३५ एकरांतील पीक वखरले आहे. २० एकरांतील तूर व मुगाचे पीक काढून झाले. आता २० एकरांतील सोयाबीन वखरणीचे काम सुरू आहे. या पेरणीसाठी अडीच लाखांवर खर्च झालेला आहे. ३० जूनला पेरणी केली होती. पीक उगवलेही होते. मात्र, नंतर पाऊस न आल्याने पेरणी उलटली. 
- हितेश प्रल्हाद बावनेर (जांभा खुर्द, ता. मूर्तिजापूर)


इतर बातम्या
पोपटराव पवार, राहिबाई पोपेरे यांना...नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून शनिवारी (ता. २५)...
कोयना धरणाच्या पोटात होणार आणखी एक धरणकोयनानगर, जि. सातारा ः येथील कोयना धरणाची...
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत केवळ १४...औरंगाबाद : संकटांशी दोन हात करून आपली शेती जिवंत...
पुणे जिल्हा परिषदेचा ‘एक पुस्तक' पॅटर्न...पुणे : विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी...
लातूर, उस्मानाबादमध्ये २० तूर खरेदी...लातूर : लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात हमी...
शेती करताना जैवविविधता जोपासणे आवश्यक...नाशिक : वाढत्या लोकसंख्येचा भार कृषी क्षेत्रावरही...
अकोला : तूर विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणीत...अकोला  ः शासनाकडून हमी भावाने तूर खरेदीसाठी...
खानदेशात रब्बीत अत्यल्प पीक कर्जवाटपजळगाव ः खानदेशात रब्बी हंगामातील पेरण्या जवळपास...
वटवाघळांचा मोर्चा आता द्राक्ष बागांकडेपुणे: वटवाघळांची वस्तीस्थाने आणि अधिवास...
भंडारा : शेतकरी किसान सन्मानच्या...भंडारा ः पंतप्रधान किसान सन्मान योजनेला वर्षभराचा...
कवठेमहांकाळ तालुक्यात पाणीसाठ्यात वाढसांगली  ः कवठेमहांकाळ तालुक्यात ऑक्टोबर...
खानदेशात कांदा लागवड सुरूचजळगाव ः खानदेशात कांदा लागवड सुरूच असून, सुमारे...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ४३ हजार...सोलापूर : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
सांगोल्यात डाळिंब व्यापाऱ्याला पुन्हा...सांगोला, जि. सोलापूर : सांगोल्यातील एका...
लोकशाहीच्या बळकटीसाठी मतदानाला महत्त्व...नगर : ‘‘भारत हा जगातील सर्वांत मोठी लोकशाही...
विजेबाबतच्या समस्या निकाली काढा : डॉ....बुलडाणा  : विजेच्या बाबत नागरिकांना अनेक...
चाळीसगाव : किसान सन्मानच्या लाभापासून...चाळीसगाव, जि. जळगाव ः शासनाकडून राबविण्यात...
जिल्हा परिषदांचे तलाव मासेमारीसाठी खुले...मुंबई : राज्यातील ग्रामविकास विभागांतर्गत जिल्हा...
खानदेशात तूर नोंदणीला प्रतिसादजळगाव  ः जिल्ह्यात तूर नोंदणीसंबंधी १०...
नागपूर जिल्ह्यात रब्बीच्या क्षेत्रात...नागपूर : मॉन्सूनोत्तर पावसाने खरीप पिकाचे चांगलेच...