agriculture news in Marathi,decline in ground water over nine thousand villages, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

राज्यातील सव्वानऊ हजार गावांत पाणीपातळी खालावली

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

यंदा झालेल्या चांगल्या पावसामुळे भूजल पातळीत काही प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र, रब्बी हंगामात पाण्याचा उपसा अधिक वाढला तर पुन्हा पाणीपातळी झपाट्याने खाली जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करून कमीत कमी उपसा कसा करता येईल, यावर भर द्यावा. जेणेकरून राज्यातील नऊ हजार ३५५ गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाईसदृश्य परिस्थिती तयार होणार नाही.
- कौस्तुभ दिवेगावकर, संचालक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, पुणे

पुणे ः चालू वर्षी राज्यातील अनेक भागांत जोरदार पाऊस पडला असला तरी भूगर्भातील पाणीपातळी फारशी वाढलेली नाही. राज्यातील २६८ तालुक्यांतील सुमारे ९ हजार ३५५ गावांतील पाणीपातळी एक मीटरहून अधिक खोल गेली आहे. त्यापैकी ४ हजार १६४ गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाईसदृश्य परिस्थिती असून पाण्यावाचून भूगर्भ तहानलेला असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. 

यंदा कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात चांगला पाऊस झाला. त्यामुळे या भागातील धरणे तुडुंब भरली होती. मात्र, विदर्भातील पश्चिम भागात अत्यंत कमी तर पूर्व भागात बऱ्यापैकी पाऊस झाला. त्यामुळे धरणेही भरली आहेत. मात्र, गेल्या वर्षी उन्हाळ्यात उन्हाची तीव्रता वाढल्याने झालेल्या भूजल साठ्यातून सिंचनासाठी, औद्योगिक वापरासाठी तसेच शहरीकरण व वाढत्या लोकसंख्येमुळे पिण्याच्या पाण्याच्या पाण्यासाठी मोठा उपसा झाला. त्यामुळे गेल्यावर्षी सुमारे १३ हजार ९८४ गावांमध्ये एक मिलिमीटरपेक्षा पाणी पातळी खोल गेलेली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी घट झाली असली तरी उन्हाळ्यात काही प्रमाणात टंचाई भासण्याची शक्यता आहे.

पर्जन्यमानाचा तुलनात्मक अभ्यास 
यंदा ऑक्टोबरअखेरीस तालुकानिहाय पर्जन्यमानासोबत तुलनात्मक अभ्यास करण्यात आला. त्यानुसार सरासरीच्या तुलनेत ३५५ तालुक्यांपैकी २५२ तालुक्यांत सरासरी, त्यापेक्षा जास्त पर्जन्यमान झालेले असून १०३ तालुक्यांत सरासरीच्या तुलनेत घट आढळून आली आहे. सरासरीच्या पर्जन्यामानाच्या तुलनेत तूट आलेल्या १०३ तालुक्यापैकी ८७ तालुक्यात ० ते २० टक्के तूट आढळून आली आहे. तर १४ तालुक्यांत २० ते ३० टक्के, दोन तालुक्यांत ३० ते ५० टक्के, तर ५० टक्क्यांपेक्षा जास्त तूट एकाही तालुक्यात आढळून आलेली नाही.

विहिरीच्या पाणीपातळीचा अभ्यास
भूगर्भातील पाणीपातळीचा अभ्यास करण्यासाठी राज्यात पाणलोट क्षेत्रनिहाय ३२ हजार ७६९ निरीक्षण विहिरी निश्चित केल्या आहेत. गेल्या ऑक्टोबर महिना अखेरमधील निरिक्षण विहिरीतील पाणी पातळीचा मागील पाच वर्षांतील ऑक्टोबर महिन्यातील सरासरी भूजल पातळीशी तुलनात्मक अभ्यास करण्यात आला. राज्यातील ३२ हजार ७६९ निरीक्षण विहिरीपैकी २० हजार ७५४ विहिरीमधील भूजल पातळीमध्ये सरासरीपेक्षा वाढ झाली असून १२ हजार १५ निरीक्षण विहिरींमधील भूजल पातळीमध्ये सरासरीच्या तुलनेत घट आढळून आलेली आहे. त्यामध्ये राज्यातील एकूण ९ हजार ३५५ गावांत भूजल पातळीमध्ये एक मीटरपेक्षा जास्त घट आढळून आहे. त्यापैकी ४,१६४ गावांत तीन मीटरपेक्षा घट आढळून आली आहे. एक हजार ९१० गावांमध्ये दोन ते तीन मीटर, तर तीन हजार २८१ गावांत एक ते दोन मीटरने घट आढळून आली आहे.

मराठवाड्यात ७४ तालुक्यांचा समावेश 
विदर्भापाठोपाठ मराठवाड्यातही भूजलपातळीचा अधिक झालेल्या पाण्याच्या उपशामुळे फार  मोठ्या प्रमाणात भूजल पातळी वाढलेली नाही. मराठवाड्यातील ७४ तालुक्यांतील ४ हजार ३०५ गावांत एक मीटरहून अधिक पाणी पातळी खोल असल्याचे निदर्शनास आले आहे. यात औरगाबाद, बीड, जालना, लातूर, उस्मानाबाद नांदेड जिल्ह्यातील सर्वाधिक गावांचा समावेश आहे. त्यापैकी ९९७ गावांत एक ते दोन मीटर, तर ८९२ गावांत दोन ते तीन मीटर, तर २ हजार ४१६ गावांत तीन मीटरहून अधिक खोल पाणी पातळी गेली आहे.  

कोकण, मध्य महाराष्ट्रात कमी गावे 
कोकण, मध्य महाराष्ट्रातील पाणीपातळी चांगलीच वाढ झाली आहे. त्यातच कमी झालेला उपशामुळे या भागातील पाणी पातळीत कमी झाली आहे. कोकण व मध्य महाराष्ट्रातील एकूण तीन हजार १६९ गावांत एक मीटरहून अधिक पाणीपातळी खोल गेल्याचे दिसून आले आहे. त्यापैकी एक हजार ३६९ गावांत एक ते दोन मीटर, तर ६६६ गावांत दोन ते तीन मीटर, तर ११३४ गावांत तीन मीटरहून अधिक पाणी पातळी खोल गेल्याचे स्पष्ट झाले आहे.

भूजल पातळी खोल जाण्याची कारणे 

  •  पिकांसाठी पाणी देण्याच्या पारंपरिक पद्धती
  •  बारामही ऊस, केळी, संत्री, द्राक्षे अशा पिकांसाठी भूजलाचा अतिवापर
  •  भूजल व्यवस्थापनाचा अभाव
  •  कमी पर्जन्यमान पर्यायाने कमी भूजल पुनर्भरण
  •  पर्जन्यमानाची तीव्रता व त्याचा कालावधी

पाणीटंचाई कालावधीसाठी खालील गृहितके धरली जातात 

क्षेत्र पर्जन्यमानातील तूट (टक्के)  स्थिर पाणी पातळीतील तूट संभाव्य टंचाई कालावधी
अवर्षणप्रवण व शाश्वत पर्जन्यमान   २० टक्क्यांपेक्षा जास्त तीन मीटरपेक्षा जास्त   ऑक्टोबरपासून पुढे
    दोन ते तीन मीटर  जानेवारीपासून पुढे
    एक ते दोन मीटर  एप्रिलपासून पुढे
    एक मीटरपर्यत   मॅनेजेबल टंचाई
अति पर्जन्यमान ५० टक्क्यांपेक्षा जास्त दोन ते तीन मीटर जानेवारीपासून पुढे
    एक ते दोन मीटर   एप्रिलपासून पुढे

      

विभागनिहाय भूजलपातळी खालावलेल्या गावांची संख्या

विभाग  तीन मीटरहून अधिक दोन ते तीन मीटर एक ते दोन मीटर एक मीटरपेक्षा जास्त
ठाणे ११    ४३    १८४    २३८
नाशिक  ५४१   २०४   ३९८ ११४३
पुणे  ५८२  ४१९   ७८७ १७८८
औरंगाबाद  २४१६     ८९२  ९९७ ४३०५  
अमरावती ५५२   २९९ ७८४ १६३५
नागपूर   ६२ ५२   १३   २४६
एकूण ४१६४    १९१०  ३२८१    ९३५५

    


इतर अॅग्रो विशेष
भांडवली शेतीचा विळखा बघता बघता हरितक्रांतीला पन्नास वर्षे झाली. तसे,...
पशुखाद्य : नियोजन अन् नियंत्रणमहाराष्ट्रात २०१२ च्या दुष्काळापासून दुग्ध...
मराठवाड्यात साडेदहा हजार एकरांवर तुतीऔरंगाबाद : मराठवाड्यात यंदा ३० नोव्हेंबर...
विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सहा दिवस...मुंबई : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या...
विठ्ठल मंदिरात मोबाईल बंदीपंढरपूर, जि. सोलापूर ः श्री विठ्ठल मंदिराच्या...
धानासाठी क्विंटलला पाचशे रुपये अनुदानमुंबई: राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा...
‘पीजीआर’ला मान्यतेचा मार्ग मोकळापुणे ः देशभरात शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या बिगर...
इथेनॉलसाठी मान्यता; पण प्रकल्पांसाठी...पुणे  : थेट साखरेपासून इथेनॉल तयार करण्यास...
उत्कृष्ट व्यवस्थापनातून पपईत मिळवली ओळखनंदुरबार जिल्ह्यात धमडाई येथील सुभाष व प्रनील या...
उद्या तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे ः बंगाल उपसागराच्या आग्नेय भागात कमी दाबाचे...
परिश्रमपूर्वक व्यवस्थापनातून...पुणे जिल्ह्यातील रिहे येथील सुनील शिंदे...
किरकोळ व्यापाऱ्यांकरिता कांदासाठा...मुंबई ः देशात कांद्याचे उत्पादन घटल्याने...
सर्वाधिक दर मोजक्याच कांद्यालानगर ः वाढलेल्या कांदादराचा गेल्या महिनाभरापासून...
पशुखाद्य दर गगणाला भिडलेसांगली ः दुष्काळ व अतिवृष्टीचा फटका पशुखाद्य...
शेवंतीचे तीन वाण लवकरच पुणेः शेतकऱ्यांना शेवंतीच्या पांरपरिक वाणांना...
उत्तर प्रदेशात ‘एसएपी’त बदल नाहीनवी दिल्ली: उत्तर प्रदेश सरकारने सलग दुसऱ्या...
उसाचे ३८ गुंठ्यांत तब्बल १४७ टन उत्पादनकोल्हापूर जिल्ह्यातील कवठेगुलंद (ता. शिरोळ) येथील...
कमी कालावधीचा दोडका देतोय चांगला नफागेल्या दोन, तीन महिन्यांत झालेल्या पावसामुळे पुणे...
तापमानात चढ-उतारपुणे ः अरबी समुद्राच्या आग्नेय भागात असलेले कमी...
जीवघेणा बाजारदेशात बोगस, भेसळयुक्त, अनधिकृत कीडनाशकांचा वापर...