नाशिकमध्ये हिरव्या मिरचीच्या आवकेत घट   

नाशिक : नाशिक बाजार समितीत गत सप्ताहात हिरव्या मिरचीची आवक ५८४ क्विंटल झाली. लवंगी मिरचीला प्रतिक्विंटल ५०० ते १,७०० रुपये, तर सरासरी दर १,००० रुपये मिळाला.
Decline in import of green chillies in Nashik
Decline in import of green chillies in Nashik

नाशिक : नाशिक बाजार समितीत गत सप्ताहात हिरव्या मिरचीची आवक ५८४ क्विंटल झाली. लवंगी मिरचीला प्रतिक्विंटल ५०० ते १,७०० रुपये, तर सरासरी दर १,००० रुपये मिळाला. सध्या मागणी सर्वसाधारण असल्याने बाजारभावात घसरण झाली आहे, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांकडून देण्यात आली.

सप्ताहामध्ये उन्हाळ कांद्याची आवक १०,६०९ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ४०० ते १,५७५ मिळाला. तर सरासरी दर १,२३१ रुपये राहिला. बटाट्याची आवक ७२५६ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ४०० ते १,२००, तर सरासरी दर ८०० रुपये राहिला. लसणाची आवक २६३ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ३,००० ते ८,५०० तर सरासरी दर ६,००० रुपये राहिला.

फळभाज्यांच्या आवकेत चढ उतार राहिला. वालपापडी-घेवड्याची आवक ७,५८० क्विंटल झाली. वालपापडीला प्रतिक्विंटल १,५०० ते ३,०००, तर सरासरी दर २,५०० रुपये राहिला. घेवड्याला प्रतिक्विंटल १,४०० ते ३,२००, तर सरासरी दर ३२०० रुपये राहिला. गाजराची आवक ३९४ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १,५०० ते २,४००, तर सरासरी दर २,००० रुपये राहिला. वाटाण्याची आवक १,१५० क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ८,००० ते १२,०००, तर सरासरी दर १०,००० रुपये राहिला. 

फळभाज्यांमध्ये टोमॅटोला ५० ते २००, तर सरासरी १५०, वांगी १०० ते २५० तर सरासरी १५० व फ्लॉवर १३० ते २५० सरासरी १७० रुपये असे दर प्रति १४ किलोस मिळाले.तर कोबीला ४० ते ८० तर सरासरी ७० रुपये असे दर प्रति २० किलोस मिळाले. ढोबळी मिरचीला १४० ते २७५ तर सरासरी दर २०० रुपये असे दर प्रति ९ किलोस मिळाले. फळांमध्ये चालू सप्ताहात केळीची आवक १३७० क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल ८५० ते १२५० तर सरासरी दर १,००० रुपये मिळाला. डाळिंबांची आवक ११,०८९ क्विंटल झाली. मृदुला वाणास ४,००० ते १०,५०० तर सरासरी ७,००० रुपये दर मिळाला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com