agriculture news in Marathi,Deepak become light, Samadhan become satisfaction on PM-KISAN portal, Maharashtra | Agrowon

पीएम-किसानच्या पोर्टलवर दीपकचा झाला ‘लाइट’, ‘समाधान’चे ‘सॅटिसफेक्शन

टीम अॅग्रोवन
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

नांदुरा, जि. बुलडाणा ः शेतकऱ्यांना सध्या सर्वच प्रकारच्या मदतींचा निधी हा ऑनलाइन पद्धतीने थेट बँक खात्यात जमा केला जातो. प्रत्येक योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांची माहिती संबंधित साइटवर अपलोड केली जाते. परंतु, ही माहिती साइटवर टाकत असताना असंख्य घोळ होत असून शेतकरी महिनोमहिने लाभापासून वंचित राहत आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीपासून हजारो शेतकरी वंचित असून यामागे प्रमुख कारणांमध्ये माहिती चुकीची असणे, नावातील दोष असल्याचे सांगितले जाते. माहिती भरताना गुगल ट्रान्स्लेटच्या माध्यमातून नावाचे थेट अर्थच लिहिले जात असल्याचे समोर आले आहे.

नांदुरा, जि. बुलडाणा ः शेतकऱ्यांना सध्या सर्वच प्रकारच्या मदतींचा निधी हा ऑनलाइन पद्धतीने थेट बँक खात्यात जमा केला जातो. प्रत्येक योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांची माहिती संबंधित साइटवर अपलोड केली जाते. परंतु, ही माहिती साइटवर टाकत असताना असंख्य घोळ होत असून शेतकरी महिनोमहिने लाभापासून वंचित राहत आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीपासून हजारो शेतकरी वंचित असून यामागे प्रमुख कारणांमध्ये माहिती चुकीची असणे, नावातील दोष असल्याचे सांगितले जाते. माहिती भरताना गुगल ट्रान्स्लेटच्या माध्यमातून नावाचे थेट अर्थच लिहिले जात असल्याचे समोर आले आहे.

 शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी या हेतूने प्रथमच देशात केंद्र सरकारने ‘पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना’ जाहीर केली. या योजनेतून शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजारांची मदत तीन टप्प्यात दिली जाणार आहे. यासाठी पोर्टलवर शेतकऱ्यांची नोंद करण्यात आली. ही नावे व माहिती इंग्रजीत भरण्यासाठी तहसील कार्यालयांनी तात्पुरतचे ऑपरेटर ठेवले होते. त्यांनी मराठीचे इंग्रजी करण्यासाठी गुगल ट्रान्सलेटचा वापर केल्याने इथेच शेतकऱ्यांच्या नावात मोठा घोळ झाला आहे.

नांदुरा तालुक्यातील फुली येथील शेतकऱ्याचे नाव ‘समाधान’ असे असताना चक्क ‘सॅटिसफेक्शन’, ‘दीपक’चा ‘लाइट’, ज्यांचे आडनाव वाघ होते त्यांच्या नावासमोर ‘टायगर’, ‘सातव’चे ‘सेवंथ’ करण्यात आले आहे. हा घोळ केवळ नावांपुरताच नसून असे घोळ अनेक गावांत झालेले असून शेतकरी लाभापासून वंचित राहिलेले आहेत. पीएम किसान पोर्टलवर नांदुरा तालुक्यातील फुली गावातील सुभाष प्रल्हाद वाघ यांचे नाव सुभाष प्रल्हाद टायगर, दीपक यादव इंगळे यांचे लाइट यादव इंगळे, जगन्नाथ समाधान बोदडे यांचे जगन्नाथ सॅटिसफेक्शन बोदडे असे लिहून आले. या चुकांमुळे हे लाभार्थी नाव जुळत नसल्याच्या कारणाने वंचित राहिले आहेत.

गुगल ट्रान्सलेटरचा वापर
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेसाठी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी शेतकऱ्यांची नोंदणी करण्यासाठी त्या त्या तालुक्यातील तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवकांनी माहिती तहसील कार्यालयाला मराठीत सादर केली होती. परंतु, पीएम किसान पोर्टलला ती इंग्रजीत सादर करावयाची असल्याने प्रशासनाने तात्पुरते ऑपरेटर नेमून मराठीतील नावे व माहिती इंग्रजीत करण्यासाठी गुगल ट्रान्सलेटचा सर्रास वापर केला. यातच घोळ झाला. त्यातून नावांचे मजेदार किस्से ही वेबसाइट उघडल्यानंतर दिसू लागले. 
 


इतर अॅग्रो विशेष
संघर्ष येथील संपणार कधी? शेती कसत असताना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, करावा...
`ज्ञानेश्‍वरी'त दडलंय कृषी विज्ञान कां सु क्षेत्री बीज घातले।  ते आपुलिया परी...
निर्यातबंदी उठविल्याचे कांदा बाजारात...नाशिक : केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री...
साडेआठशे कोटींची एफआरपी थकलीपुणे: राज्यातील साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक...
‘जानुबाई’, ‘केशवराज’ संस्था ठरल्या...पुणे: पाणीवापर संस्थांच्या माध्यमातून प्रभावी...
साम टीव्ही न्यूज महाराष्ट्रात ‘नंबर १’मुंबई ः सर्वोत्तम न्यूज चॅनेल्सच्या स्पर्धेत ‘...
कृषी परिषदेने विद्यापीठांसाठी नेमले...पुणे : महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे: पावसाला पोषक हवामान होत असल्याने विदर्भ,...
शेतकऱ्यांना खते, बियाणे अन् महिलांना...शुद्ध पाणीपुरवठा, गावाअंतर्गत सिमेंट रस्ते,...
सांगलीत तूर खरेदी ठप्पसांगली ः जिल्ह्यात हेक्टरी २५७ किलोच तूर खरेदी...
राज्यात गारठा वाढलापुणे  : उत्तरेकडून थंड वाऱ्यांचे प्रवाह...
चीनला द्राक्ष निर्यात सुरूसांगली ः जिल्ह्यात गेल्या वर्षी झालेल्या...
‘लिंकिंग’बाबत कंपन्यांना नोटिसापुणे  : रासायनिक खतांच्या बाजारपेठेत होत...
बाजार समित्यांच्या निवडणुका होणार...मुंबई  ः राज्यातील कृषी उत्पन्न बाजार...
भाजीपाला शेतीतून पेलल्या साऱ्या...लग्नानंतर अवघ्या तीन वर्षातच पतीच्या निधनामुळे...
कांद्यावरील निर्यातबंदी हटविली;...नवी दिल्ली : चार महिन्यापूर्वी कांद्यावर...
सूक्ष्म सिंचन योजनेचा सात वर्षानंतर...अकोला ः सूक्ष्म सिंचनाचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना...
कोल्हापुरातील गूळ हंगाम अंतिम टप्प्यातकोल्हापूर : यंदाचा गूळ हंगाम अंतिम टप्प्यात येत...
पाणीवापराचे तंत्र समजून निर्यातक्षम...सिंचन व्यवस्थापन हा प्रयोगशील व प्रगतिशील शेतीतील...
सकाळी गारठा, तर दुपारी चटकापुणे : राज्यात कमाल तापमानातील वाढीबरोबरच किमान...