agriculture news in Marathi,delay in give assistance to flood affected due to political unstability, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

राजकीय अस्थिरतेमुळे पूरग्रस्तांना मदतीस विलंब?

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

कोल्हापूर: महापुरात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणाऱ्या कर्जमाफीबाबतच्या अंतिम याद्या येत्या काही दिवसांत मंजुरीसाठी जाणार आहेत; परंतु सध्या राज्यात सुरू असलेल्या राजकीय अस्थिरतेमुळे मदत मिळण्यास विलंब लागण्याची शक्‍यता आहे. जाहीर झालेली मदत मिळणार, हे निश्‍चित असले तरी ती केव्हा मिळेल, याबाबत कोणीच अंदाज व्यक्त करत नाही. अधिकाऱ्यांमध्येही दोन प्रवाह आहेत. प्रशासकीय गती मिळाली नाही तर मदत अशीच रखडत राहण्याची शक्‍यता असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. 

कोल्हापूर: महापुरात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणाऱ्या कर्जमाफीबाबतच्या अंतिम याद्या येत्या काही दिवसांत मंजुरीसाठी जाणार आहेत; परंतु सध्या राज्यात सुरू असलेल्या राजकीय अस्थिरतेमुळे मदत मिळण्यास विलंब लागण्याची शक्‍यता आहे. जाहीर झालेली मदत मिळणार, हे निश्‍चित असले तरी ती केव्हा मिळेल, याबाबत कोणीच अंदाज व्यक्त करत नाही. अधिकाऱ्यांमध्येही दोन प्रवाह आहेत. प्रशासकीय गती मिळाली नाही तर मदत अशीच रखडत राहण्याची शक्‍यता असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. 

ऑगस्ट महिन्यात आलेल्या महापुरात दक्षिण महाराष्ट्रात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. तत्कालीन शासनाने तातडीने निर्णय घेत अडीच हेक्‍टरपर्यंतच्या शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ व ज्यांचे पीककर्ज नाही त्यांना तिप्पट भरपाई अशी घोषणा केली. तातडीने पंचनामेही झाले. यानंतर याद्या बॅंकांकडे पाठविण्यात आल्या. याद्या आल्यानंतर शेतकरी वंचित राहू नयेत यासाठी पुन्हा तपासणी करून राहिलेल्या शेतकऱ्यांचाही यात समावेश करण्यात आला. या याद्या कृषी विभागाकडून बॅंका, जिल्हाधिकारी कार्यालयांकडे देण्यात येत आहेत. 

येत्या काही दिवसांत हे काम पूर्ण होण्याची शक्‍यता आहे; परंतु याद्या पूर्ण झाल्यानंतर त्याला मंजुरी मिळून ही रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणे गरजेचे आहे. गेल्या पंधरा दिवसांच्या कालावधीत वेगाने राजकीय घडामोडी झाल्या; परंतु सरकार स्थापन न झाल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट आली. याचा परिणाम मिळणाऱ्या कर्जमाफीवर होईल का, याबाबत पूरग्रस्त शेतकऱ्यांत संभ्रम आहे. 

काही अधिकाऱ्यांच्या मते मंत्रिमंडळाने घेतलेले निर्णय हे राज्यपालांच्या सहीनेच घेतलेले असतात. यामुळे सध्या सुरू असलेल्या मदतीच्या कार्यवाहीत कुठेच अडथळा येणार नाही. कृषी, महसूल व सहकार विभागाच्या वतीने निर्णयानुसारची कार्यवाही करून ती राज्याकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येत आहे; पण ती कधी मंजूर होईल याबाबत निश्‍चित सांगता येणार नाही.

काही अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, एकदा मंत्रिमंडळाने निर्णय घेतला की तिथे राजकीय हस्तक्षेप होत नाही. ही सर्व कार्यवाही अधिकाऱ्यांच्या पातळीवर जाते. सध्या राष्ट्रपती राजवट असल्याने व विषय गंभीर असल्याने ही प्रक्रिया जलद होऊ शकते. अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव सध्या नसल्याने कर्जमाफीला प्राधान्य देऊन हे काम तातडीने होऊ शकते. 

जिल्हा प्रशासनाकडूनयाद्यांची पूर्तता
वरिष्ठ पातळीवरून मदत कधी मिळेल, याबाबत अस्पष्टता असली तरी जिल्हा प्रशासनाने मात्र याद्यांची पूर्तता करण्यात गती घेतली आहे. कोल्हापूर जिल्ह्यासाठी २६३ कोटी रुपयांची मदत मिळणार असल्याचे मंगळवारी (ता. १२) सायंकाळी स्पष्ट झाले. कोल्हापुरातील ९२ हजार शेतकऱ्यांना २६३ कोटींपर्यंत कर्जमाफी आणि १ लाख ४० हजार शेतकऱ्यांच्या पिकांना तिपटीने नुकसानभरपाई दिली जाणार आहे. येत्या काही दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होऊन अंतिम याद्या मंजुरीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे कृषी विभागातून सांगण्यात आले.


इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादमध्ये मूग, उडदाची आवक नगण्यऔरंगाबाद: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मूग व...
नाशिकमध्ये हिरवी मिरची २००० ते ५०००...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
सोलापुरात कांदा, कोथिंबीर, मेथीला उठाव...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात कांदा १२० ते ४०० रुपये दहा...कोल्हापूर: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गत...
नगरमध्ये टोमॅटो, शेवग्याचे दर स्थिरनगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
पावसाच्या तडाख्याने साताऱ्यात हातची...कऱ्हाड, जि. सातारा ः चांगल्या पावसामुळे यंदाचा...
परभणी जिल्ह्यात पुरामुळे पिके पाण्याखालीपरभणी  : जायकवाडी आणि माजलगाव धरणातील...
सोयाबीन आले सोंगणीला, मात्र उत्पादन...शिरपूरजैन, जि. वाशीम  ः यावर्षी सातत्याने...
वऱ्हाडातील मोठे प्रकल्प तुडुंबअकोला  ः आत्तापर्यंत झालेल्या पावसाने काही...
खानदेशात पंचनाम्यांच्या प्रतीक्षेत पिके...जळगाव  ः खानदेशात उडीद, मुगाचे अपूर्ण...
पुणे विभागात आडसाली ऊस लागवड क्षेत्र...पुणे  ः चालू वर्षी वेळेवर दाखल झालेल्या...
सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान...सांगली  ः जिल्ह्यातील मिरज, खानापूर, पलूस,...
केळी पिकातील कंद कुजव्या रोगाचे...कंदकुजव्या रोगाचा प्राथमिक प्रसार रोगट कंदापासून...
वाढवा जमिनीतील सेंद्रिय कर्ब...जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविण्यासाठी...
कृषी विधेयकांस विरोधासाठी इंडिया...नवी दिल्ली : बहुचर्चित कृषी विधेयकांवर राष्ट्रपती...
निकोप स्पर्धेसाठी मोदी सरकारचा प्रयत्नशेती उत्पादन व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन आणि...
नगरमधील ३५ हजार शेतकरी विमा भरपाईपासून...नगर  ः जिल्ह्यात गेल्यावर्षी परतीच्या...
पुण्यात भाजीपाल्याची आवक घटली; दरात वाढपुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...
रत्नागिरी जिल्ह्यात हळव्या भात कापणीत...रत्नागिरी  : हळवे भात पीक कापणी योग्य झाले...
औरंगाबादमध्ये थेट शेतीमाल विक्रीची ...औरंगाबाद  : औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागात...