Agriculture news in marathiDelaying sowing in Khandesh; Due to low rainfall, there was no speed | Page 2 ||| Agrowon

खानदेशात पेरण्या रखडत; कमी पावसामुळे गती मिळेना

टीम अॅग्रोवन
रविवार, 20 जून 2021

खानदेशात खरिपातील पिकांच्या पेरणीला रखडत सुरवात झाली आहे. गुरूवारी (ता.१७) व  शुक्रवारी (ता.१८) दुपारी व सायंकाळी अनेक भागात मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. यामुळे पेरणीला शेतकऱ्यांनी अनेक भागात सुरवात केल्याचे चित्र आहे. 
पण सर्वत्र पाऊस नव्हता.

जळगाव : खानदेशात खरिपातील पिकांच्या पेरणीला रखडत सुरवात झाली आहे. गुरूवारी (ता.१७) व  शुक्रवारी (ता.१८) दुपारी व सायंकाळी अनेक भागात मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. यामुळे पेरणीला शेतकऱ्यांनी अनेक भागात सुरवात केल्याचे चित्र आहे. 
पण सर्वत्र पाऊस नव्हता. काही भागात पाऊस झाला, तर काही भागात ऊन तापत होते. दर आठ ते १० किलोमीटरनंतर पावसाची स्थिती वेगवेगळी अशीच होती.

काही भागात पेरणीयोग्य पाऊस झाला. जळगाव जिल्ह्यात जळगाव, धरणगाव, एरंडोल, पाचोरा आदी तालुक्यांमध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. काही मंडळांमध्येच चांगला पाऊस झाला. जळगाव तालुक्यात सर्वत्र मध्यम पाऊस होता. त्यामुळे पेरणीच्या प्रतीक्षेत असलेल्या अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. हवा तसा पाऊस नसल्याने सोयाबीनची पेरणी मात्र शेतकरी करीत नसल्याची स्थिती आहे.  

कोरडवाहू कापूस, तूर, उडीद, मूग, ज्वारी यांची पेरणी मात्र सुरू झाली. हवा. पाऊस झाल्यानंतरच किंवा ५० मिलीमीटर पाऊस एकाच दिवसात झाल्यानंतर सोयाबीन पेरणी करा. सध्या सोयाबीन पेरणी टाळा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. मोसमी पावसाचे आगमन झाल्याचे मध्यंतरी जाहीर झाले होते. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंद होता. पण पावसाने अनेक भागात हूल दिली. काही तज्ज्ञ खानदेशात २१ जूननंतर पाऊस येईल, असे सांगत आहेत.  

धुळे व नंदुरबारातही पाऊस काही शेतकऱ्यांनी पेरणीला शनिवारी (ता.१९) सुरवात केली आहे. पण . सकाळी ऊन तापत असल्याने वाफसा स्थिती नाहीशी होत आहे. यामुळे किमान थंड किंवा ढगाळ वातावरण हवे, अशी अपेक्षा शेतकऱ्यांची आहे. खानदेशात सुमारे पाच टक्के पेरण्या झाल्या आहेत. यात पूर्वहंगामी कापूस लागवड अधिक आहे. कोरडवाहू पिकांची पेरणी शनिवारीच सुरू झाली. पण पेरण्या रखडत सुरू असून, सर्वत्र पेरणी नसल्याची स्थिती आहे.


इतर ताज्या घडामोडी
राज्यात सरासरीच्या २४ टक्के अधिक पाऊसपुणे ः जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीसदृश्य...
शेकापचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार...सोलापूर : शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते,...
अकोला झेडपीची सभा ऑनलाइन, तरीही नाश्‍...अकोला ः कोरोनामुळे बहुतांश सभा, बैठका ऑनलाइन होत...
खासगी पदविकाधारक, पशुधन पर्यवेक्षकांचे...मंचर, जि. पुणे : पशुसंवर्धन विभागातील खासगी...
सांगलीत अतिवृष्टीचा १८१ गावांना फटकासांगली : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेली...
पूरग्रस्तांना ठाकरे सरकारने तातडीने मदत...कोल्हापूर : सध्याची पूरस्थिती बिकट आहे,...
नगरमधील शेतकऱ्यांना मिळणार साडेेआठ...नगर : नगर जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षी खरिपात...
ठाकरे, फडणवीस समोरासमोरकोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी...
शिरोळमध्ये मुख्यमंत्र्यांचा फक्त पाच...शिरोळ, जि. कोल्हापूर : पूरस्थितीचा जिल्ह्यात...
पंढरपूरला जिल्हा करावासोलापूर ः गेल्या अनेक दिवसांपासून मागणी होत...
जल, मृद्‍संधारण कामांवर भर द्यावा ः एस...बुलडाणा : गावाची समृद्धी माती आणि पाणी यावरच...
खासगीकरणाविरोधात वीज कामगारांचा...नागपूर ः वीज उद्योगाच्या खासगीकरणाच्या...
युरियाची विषबाधा टाळण्यासाठी काळजी...युरियाची विषबाधा ही सर्व पाळीव प्राण्यांमध्ये...
जळगाव जिल्ह्यात ५७ टक्के पाऊसजळगाव : जिल्ह्यात आतापर्यंत ५७ टक्के पाऊस झाला...
शनिवारपर्यंत सुरू राहणार मका, ज्वारीची...औरंगाबाद : राज्यात रब्बीतील मका व ज्वारी खरेदीला...
परभणी जिल्ह्यात पीकविमा तक्रारींचा...परभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत टोल फ्री...
नाशिक जिल्ह्यात धरणसाठा ४६ टक्क्यांवरनाशिक : गत सप्ताहात जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट...
सोलापूर ःविमा कंपनी शेतकऱ्यांपर्यंत...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात पीकविम्यासाठी भारती...
अकोला ः नैसर्गिक आपत्तीनंतर पीकविमा...अकोला ः पीकविमा हा आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांना...
मंगळवेढ्यात सूर्यफूल पीकविम्यातून वगळलेमंगळवेढा, जि. सोलापूर ः मंगळवेढा तालुक्यात...