agriculture news in Marathi,delegation from china will visit Nagpur soon, Maharashtra | Agrowon

चीनमधील संत्रा खरेदीदारांचे शिष्टमंडळ लवकरच नागपुरात

टीम अॅग्रोवन
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

नागपूर ः चीनची बाजारपेठ मोठी असल्याने संत्रा उत्पादकांचा यात शिरकाव झाल्यास उत्पादकांचे व्यापक हित साधले जाईल, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संत्रा विषयावरील बैठकीतूनच थेट चीनमधील भारतीय आर्थिक दूत प्रशांत लोखंडे यांना मोबाईलवरून संपर्क साधला. चीनमधील खरेदीदारांसोबत नागपूरला याच आठवड्यात भेटीचा आग्रहही त्यांनी धरला. त्यामुळे लवकरच नागपुरी संत्र्याच्या निर्यातीला चालना मिळण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

नागपूर ः चीनची बाजारपेठ मोठी असल्याने संत्रा उत्पादकांचा यात शिरकाव झाल्यास उत्पादकांचे व्यापक हित साधले जाईल, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संत्रा विषयावरील बैठकीतूनच थेट चीनमधील भारतीय आर्थिक दूत प्रशांत लोखंडे यांना मोबाईलवरून संपर्क साधला. चीनमधील खरेदीदारांसोबत नागपूरला याच आठवड्यात भेटीचा आग्रहही त्यांनी धरला. त्यामुळे लवकरच नागपुरी संत्र्याच्या निर्यातीला चालना मिळण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

रवी भवन येथे संत्रा उत्पादकांच्या समस्यांवर चर्चेकरिता शुक्रवारी (ता.१५) बैठक पार पडली. माजी कृषिमंत्री रणजित देशमुख, माजी आमदार आशिष देशमुख, काटोलचे आमदार अनिल देशमुख, जैविक शेती मिशनचे प्रमुख प्रकाश पोहरे, माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर, लिंबूवर्गीय फळसंशोधन संस्थेचे संचालक डॉ. मिलिंद लदानिया, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे, महाऑरेंजचे कार्यकारी अध्यक्ष श्रीधर ठाकरे, मनोज जवंजाळ यांची या वेळी उपस्थित होते. 

या वेळी शरद पवार म्हणाले, की संत्रा उत्पादकांच्या समस्यांना घेऊन महाऑरेंज आणि अभ्यासू शेतकऱ्यांचा समावेश असलेल्या शिष्टमंडळासोबत पुढील आठवड्यात दिल्लीत केंद्रीय कृषी मंत्रालय; तसेच वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्याशी चर्चा केली जाईल. संत्रा उत्पादकांचे प्रश्‍न आणि शेतीनुकसानीच्या मदतीसंदर्भाने चर्चा होईल. संत्र्यात सद्या एकच वाण आहे. स्पेन आणि इस्त्राईलमधील वाण दर्जेदार असतील, तर तेथील संशोधन संस्थांशी, सरकारशी चर्चा करून ते देखील संत्रा उत्पादकांसाठी उपलब्ध करून देता येतील. त्याकरिता या देशांचा दौरा करण्याची गरज असल्यास शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत जाता येईल.

फळांची गुणवत्ता सुधारा
निर्यात करण्यापूर्वी संत्रा फळांची गुणवत्ता सुधारण्याची गरज शरद पवार यांनी संत्रा उत्पादकांच्या सभेत मांडली. फळांची गुणवत्ता सुधारल्याशिवाय कोणीच खरेदीदार तुमच्या दारात येणार नाही. त्याकरिता मोठे प्रयत्न होणे अपेक्षित असल्याचेही त्यांनी सांगीतले.

बैठकीतील प्रमुख मुद्दे

  • संत्रा लागवड कर्जावरील व्याजदर कमी व्हावा.
  • द्राक्षाप्रमाणे संत्र्याच्या सिडलेस वाणांचे संशोधन.
  • नागपुरी संत्रा हेच एकच वाण असल्याने इतर वाण विकसित व्हावेत.
  • देशांअतर्गत बाजारपेठेसाठी रेल्वे वॅगची सुविधा.
  • ठिबक व कुंपणाकरिता अनुदान व त्यात वाढ.
  • संत्राप्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन मिळावे याकरिता संसाधनाची उपलब्धता.
  • तांत्रिक मार्गदर्शनासाठी आधुनिक संसाधनांचा उपयोग.
     

इतर अॅग्रो विशेष
व्यापक धोरणात श्रमिकांचा काय फायदा? चार सप्टेंबर २०२० रोजी राज्य शासनाने...
आव्हानात्मक गळीत हंगाममहाराष्ट्रातील ऊस गाळप हंगाम अगदी तोंडावर येऊन...
साखर कामगारांचा संपाचा इशारा  पुणे/कोल्हापूर  ः गळीत हंगाम सुरू होण्यासाठी...
मॉन्सून परतीवर पुणे ः गेल्या तीन महिन्यांपूर्वी पश्चिम...
मराठवाड्यातील ४८६ प्रकल्पांत ७५...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७६ प्रकल्पांपैकी ४८६...
अकरा सोयाबीन बियाणे कंपन्यांचे परवाने...पुणे: राज्यातील शेतकऱ्यांना सोयाबीनचे गुणवत्ताहिन...
नगर जिल्ह्यातील धरणे तुडूंबनगर ः दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या आणि पाणी...
खानदेशातील प्रकल्पांतून पाणी विसर्गात घटजळगाव ः गेले चार दिवस खानदेशात अपवाद वगळता जोरदार...
राज्यात पावसाची उघडीप; शेतीकामांना वेगपुणे ः पावसाने उघडीप दिल्याने ओढ्या- नाल्याच्या व...
गुणवत्तापूर्ण संत्रा वाण निर्मितीसाठी...अकोला/नागपूर ः आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चवीसाठी...
राहुरी विद्यापीठातील बदल्या अखेर रद्दपुणे: महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पुणे ः राज्यातील काही भागांत अंशतः ढगाळ हवामानाची...
कापूस हंगाम लांबणीवर?नागपूर: पावसाचा वाढलेला कालावधी, ढगाळ वातावरण...
मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत रब्बी...परभणी ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बियाणे खरेदीसाठी...
देशी गोपालनातून शेती केली शाश्वतकिणी (ता.हातकणंगले,जि.कोल्हापूर) येथील सुमित अशोक...
रेशीम शेतीने दिली आर्थिक साथपांगरा शिंदे (ता.वसमत,जि.हिंगोली) येथील प्रयोगशील...
मॉन्सूनने मुक्काम हलविला; राजस्थानातून...पुणे : पश्चिम राजस्थानात २५ जूनच्या दरम्यान दाखल...
कृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरीनवी दिल्ली : संसदेने मंजूर केलेल्या तिन्ही कृषी...
कृषी विधेयकांत शेतकऱ्यांचाच फायदा : मन...नवी दिल्लीः ‘मन की बात’ या मासिक रेडिओ...
कोकण कृषी विद्यापीठ कारळा पिकाच्या...दापोली, जि.रत्नागिरी  : कमी मेहनत, कमी...