`गोकुळ`ने पशुखाद्याची दरवाढ रद्द करण्याची मागणी

संघाचे नेतृत्व करणारे भाजपचे जिल्ह्याचे नेते म्हणणारे आता कुठे आहेत? गोकुळ वाचवायचा असेल तर गाय आणि म्हशीच्या दुधाला दर देण्यासह पशुखाद्याचे दर कमी केले पाहिजेत. संघ टिकवायचा असेल तर पशुखाद्याची दरवाढ मागे घेतलीच पाहिजे, नाही तर तीव्र आंदोलन छेडू. - बाबासाहेब देवकर, गोकुळ बचाव कृती समिती प्रमुख
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाने पशुखाद्याच्या विक्रीचा दर वाढविल्याने गोकुळ बचाव कृती समितीतर्फे ‘गोकुळ’च्या मुख्य कार्यालयासमोर दूध उत्पादक व शेतकऱ्यांनी मोर्चा काढला. अध्यक्ष रवींद्र आपटे यांना दरवाढ रद्द करण्याचे निवेदन दिले. 

बचाव कृती समितीचे प्रमुख बाबासाहेब देवकर म्हणाले, की गोकुळ संघ शेतकऱ्यांचा संघ आहे. पशुखाद्यात केलेली दरवाढ पशुपालकांना न परवडणारी आहे. दरवाढ रद्द केली नाही तर दूध उत्पादक ‘अमूल’सारख्या संघाकडे वळायला वेळ लागणार नाही. लोकसभेची निवडणूक झाल्याबरोबर लगेच दरवाढ करून उत्पादक सभासदांना वेठीस धरण्याचे काम केले. दूध खरेदी दरात उत्पादकांना दोन रुपये दरवाढ करून पुन्हा पशुखाद्याच्या दरात वाढ करून शेतकऱ्यांना आर्थिक संकटात ढकलले आहे. किरण पाटील म्हणाले, की आठवडाभरात पशुखाद्याची केलेली दरवाढ रद्द नाही केली तर तीव्र आंदोलन छेडले जाईल.

मुंबईच्या विक्रेत्याला कमिशन वाढवून देण्याच्या बोलीवर त्याच्याकडून सात कोटी घेऊन निवडणुकीत मतं मिळविण्यासाठी खर्च केले. हेच सात कोटी जर शेतकऱ्यांसाठी पशुखाद्यात घातले असते तर, शेतकऱ्यांवर वाईट वेळ आली नसती. मात्र, ‘गोकुळ’च्या चोरांनी हे पैसे मतासाठी खर्च केले, असल्याचे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत यांनी सांगितले.

या वेळी बाबासाहेब चौगुले, किरण पाटील, किशोर पाटील, तानाजी सासणे, सदाशिवराव चरापले, राहुल देसाई, रावसाहेब पाटील, बयाजी शेळके, श्रीपती पाटील, शंकर पाटील, बाबासाहेब शिंदे, विद्याधर गुरबे, विश्वास कामिरे, मधुकर देसाई, विजय चौगले, प्रदीप झांबरे, युवराज गवळी, प्रकाश पाटील (नेर्ली), सरपंच सुधीर कांबळे, कृष्णात जोंधळेकर, विठ्ठल पुजारी आदींसह दूध उत्पादक उपस्थित होते.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com