Agriculture news in marathi;Demand for increased expansion in Washim district | Page 2 ||| Agrowon

वाशीम जिल्ह्यात पीकविम्याची मुदत वाढून देण्याची मागणी
टीम अॅग्रोवन
बुधवार, 24 जुलै 2019

वाशीम ः जिल्ह्यातील शेतकरी गेले वर्षभर विविध अडचणींनी त्रस्त आहेत. अनेकांना मागील वर्षाचा पीकविमाही मिळाला नाही. त्यामुळे आगामी पीकविम्याची मुदत तरी आता वाढवून द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे. या वर्षी पीकविमा भरण्यासाठी बुधवार (ता.२४) पर्यंत मुदत देण्यात आलेली होती. 

वाशीम ः जिल्ह्यातील शेतकरी गेले वर्षभर विविध अडचणींनी त्रस्त आहेत. अनेकांना मागील वर्षाचा पीकविमाही मिळाला नाही. त्यामुळे आगामी पीकविम्याची मुदत तरी आता वाढवून द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे. या वर्षी पीकविमा भरण्यासाठी बुधवार (ता.२४) पर्यंत मुदत देण्यात आलेली होती. 

नैसर्गिक आपत्तीत पीक नुकसान झाले तर शेतकऱ्यांना भरपाई मिळावी, यासाठी पंतप्रधान पीकविमा योजना राबवली जात आहे. कर्जदार तसेच बिगर कर्जदार सभासदांना या तारखेच्या आत आपला विमा हप्ता भरायचा आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी फक्त दोन दिवस उरले आहेत. असंख्य शेतकऱ्यांना कागदपत्रांची पूर्तता करताना विलंब लागलेला आहे. काही ठिकाणी तांत्रिक अडचणींमुळे विमा हप्ता भरता आलेला नाही. अशा परिस्थितीत पीकविम्याचा हप्ता भरू न शकलेले शेतकरी योजनेपासून वंचित राहू शकतात. 

नैसर्गिक आपत्ती तसेच इतर कारणांमुळे नुकसान झाले तर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ही योजना फायदेशीर ठरू शकते, अशी भावना शेतकऱ्यांमध्ये आहे. त्यामुळेच शेतकरी पीकविमा भरण्यासाठी धडपड करीत आहेत. पीकविमा भरण्याची प्रक्रिया आनलाइन असल्यामुळे त्यामध्ये दोन ते तीन तास जात आहेत. सातबारा उतारा ऑनलाइन काढला तरी तलाठ्याच्या स्वाक्षरीसाठी दोन तीन चकरा माराव्या लागतात. शिवाय, पीकविमा भरण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरावे लागत असल्याने सेतू केंद्रावर गर्दी होत आहे. त्यासाठी ही मुदत किमान १५ दिवसांनी वाढविण्याची मागणी समोर आली आहे. 
 

गेल्या वर्षात पीकविम्याची तारीख ३१ जुलै होती. मात्र या वर्षी ही तारीख सात दिवस कमी आहे.  ही तारीख किमान पंधरा दिवस वाढवून मिळावी.
- गजानन गोरले, 
शेतकरी, विठोली, जि. वाशीम

या वर्षी  पीकविमा मिळेल असे 
शासनाने जाहीर करूनही व शेतकऱ्यांनी आंदोलन केलेले असताना मदत मिळालेली नाही. तरीही शेतकरी या वर्षी पीकविमा भरण्यासाठी पुढे येत आहेत. मात्र, पीकविमा भरण्याच्या प्रक्रियेत अडचणी येत असल्याने ही मुदत वाढविण्याची गरज आहे. 
- अभिजित राऊत, शेतकरी, विठोली, जि. वाशीम

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
कापूस उत्पादकांचा दसऱ्याचा मुहूर्त...अकोला  ः ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून...
पहुर्जीरा गावात पाण्यात बैलगाडी उलटलीबुलडाणा  : जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात...
चांदा ते बांदा योजनेअंतर्गत विविध करारः...मुंबई: राज्यात चांदा ते बांदा योजनेअंतर्गत...
पुणे जिल्ह्यात हलक्या ते मध्यम...पुणे ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून पुणे...
मालेगाव तालुक्यात पावसामुळे पिके भुईसपाटनाशिक : मालेगाव तालुक्यातील सौंदणे गावाच्या...
पुणे जिल्ह्यात दोन हजार ३५४ पीककापणी...पुणे ः पिकांची उत्पादकता आणि पीकविमा नुकसानभरपाई...
छावण्या सुरू ठेवण्यासाठी शेवगावात आंदोलननगर ः शेगाव तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये अजूनही...
आघाडीचे सरकार आल्यास सरसकट कर्जमाफी ः...जालना : केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या...
नगरमध्ये कांदा प्रतिक्विंटल कमाल पाच...नगर : नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नाशिकच्या सभेत पंतप्रधानांकडून ज्वलंत...नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...
साताऱ्याच्या दुष्काळी भागात दुसऱ्या...सातारा : जिल्ह्यातील दुष्काळी माण, खटाव तालुक्‍...
विधानसभा निवडणुकीसाठी मनसे १०० जागा...मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र...
विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची...मुंबई ः चौदाव्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता...
परभणीत शेवगा ३५०० ते ५००० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
उन्हाळ कांद्याचा आलेख चढाचनाशिक : मागील दोन आठवड्यांपासून उन्हाळ कांद्याची...
औरंगाबाद, जालना जिल्ह्यांत पावसाचा कमी-...औरंगाबाद  : मराठवाड्यातील ४२१ पैकी तब्बल २७५...
कोल्हापूर, सिंधुदुर्गात पावसाची रिपरिपकोल्हापूर, सिंधुदुर्ग : सप्टेंबरच्या पहिल्या...
शेतीमाल तारण कर्ज योजनेसाठी एक कोटीपरभणी : ‘‘परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे...
पाचोरा, जामनेरातही १०० टक्के पाऊसजळगाव ः खानदेशात जळगाव, धुळ्यात या...
‘टेंभू‘चे पाणी आटपाडीत, शेतकऱ्यांना...आटपाडी जि. सांगली :  टेंभू पंपगृहातील पंपात...