Agriculture news in marathi;Directorate of Agriculture Department to take samples of pesticides | Agrowon

त्या कीटकनाशकांचे नमुने घेण्याचे कृषी विभागाचे निर्देश
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 11 जुलै 2019

वाशीम : फवारणीमुळे विषबाधा झालेल्या रुग्णांच्या नातेवाइकांना कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेटी देऊन त्यांच्या प्रकृतीबाबत चौकशी केली आहे. या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याबाबत त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे. बाधित व्यक्तींच्या कुटुंबीयांकडून कृषी अधिकाऱ्यांनी कीटकनाशकांच्या वापराबद्दल माहिती घेतली आहे. विषबाधा झालेल्या शेतकऱ्यांनी वापरलेल्या कीटकनाशकांचे नमुने घेण्याबाबत संबंधित कीटकनाशक निरीक्षकांना सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली. 

वाशीम : फवारणीमुळे विषबाधा झालेल्या रुग्णांच्या नातेवाइकांना कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेटी देऊन त्यांच्या प्रकृतीबाबत चौकशी केली आहे. या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याबाबत त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे. बाधित व्यक्तींच्या कुटुंबीयांकडून कृषी अधिकाऱ्यांनी कीटकनाशकांच्या वापराबद्दल माहिती घेतली आहे. विषबाधा झालेल्या शेतकऱ्यांनी वापरलेल्या कीटकनाशकांचे नमुने घेण्याबाबत संबंधित कीटकनाशक निरीक्षकांना सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली. 

कीटकनाशकांच्या फवारणीमुळे शेतकऱ्यांना विषबाधा झाल्याची प्रकरणे समोर येऊ लागली आहे. ही प्रकरणे कीटकनाशकांच्या वापराशी संबंधित आहेत अथवा नाही, याची शहनिशा करण्याचे काम कृषी विभागातर्फे सुरू आहे. जिल्हा प्रशासन बाधित शेतकरी व त्यांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करीत आहे. कीटकनाशक फवारणी करताना विषबाधा होऊ नये, यासाठी शेतकरी व शेतमजुरांनी काळजी घ्यावी, असे आवाहनही कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. सध्या जिल्ह्यात सोयाबीन पिकांमध्ये तणनाशकांची फवारणी सुरू आहे. शिवाय नजीकच्या काळात कीटकनाशकांची फवारणीही सुरू होईल. फवारणी करताना विषबाधा होऊ नये, याकरीता कृषी विभागातर्फे मोठ्या प्रमाणात प्रचार-प्रसार मोहीम राबवून जनजागृती करण्यात येत असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी कळविले आहे.
 

इतर बातम्या
सोलापूर जिल्ह्यात `सन्मान`ची पाच लाख...सोलापूर : जिल्ह्यात ‘आठ अ’नुसार असलेल्या ११...
सोलापुरात यंदाही खरीप कोरडाचसोलापूर : खरीप हंगाम सुरू होऊन दीड महिना उलटला....
नाशिक बाजार समितीची सुरक्षा वाढविण्याचा...नाशिक : नाशिक कृषी बाजार समितीत वाढलेल्या...
नाशिक जिल्ह्यात पावसाअभावी फळबागांवर...नाशिक : कळवण, देवळा, मालेगाव, नांदगाव,...
परभणी जिल्ह्यात १३ लघू तलावांतील...परभणी : यंदा पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी...
टंचाईस्थितीची वस्तुनिष्ठ माहिती सादर...हिंगोली : टंचाईस्थितीत शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत...
जालना जिल्ह्यात दुधाचे पैसे दोन...जालना : जिल्ह्यातील जामवाडी, गणेशपूर, नळणी, येवता...
औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली...औरंगाबाद  : मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर...
सांगली जिल्ह्यात पावसाची उघडीपसांगली ः जिल्ह्यात जून आणि जुलैमध्ये झालेल्या...
कंडारी पाणी योजनेतील गैरव्यवहारप्रकरणी...जळगाव ः कंडारी (ता. भुसावळ) येथील ग्राम...
शेततळ्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित...नागपूर ः विकासाच्या संकल्पनांमध्ये रस्ते, नाले व...
सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागातील शेती...सातारा : जिल्ह्यात पश्चिमेकडे दमदार पाऊस, तर...
कापसाच्या हमीभावात ५०० रुपयांनी वाढ...अमरावती   ः राज्याची कमी असलेली कापूस...
दमदार पावसाअभावी पुणे जिल्ह्यातील पूर्व...पुणे  ः जिल्ह्याच्या पूर्व भागातील शिरूर,...
पावसाअभावी पेरण्या रखडल्यानांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा...
नगर जिल्ह्यात ऐन पावसाळ्यातही...नगर  ः दुष्काळाने होरपळ झालेल्या नगर...
पावसाअभावी धुळे, जळगाव जिल्ह्यांत...जळगाव  ः खानदेशात सुरवातीला पावसाने जोरदार...
नागपूर विभागात पावसाअभावी पिकांची वाढ...नागपूर  ः निम्मा जुलै महिना संपत आला असतानाच...
वऱ्हाडात पावसाने वाढवली खरिपाची चिंताअकोला ः या हंगामात जून महिन्याच्या दुसऱ्या...
भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत...मुंबई  : भाजपचे ज्येष्ठ नेते, मंत्री...