दुधी अळिंबी लागवडीसाठी जागेची निवड, वाढीसाठी लागणारे माध्यम आणि वातावरण तसेच काडाचे निर्ज
ताज्या घडामोडी
एकरकमी ‘एफआरपी’चे वाटप कोल्हापुरात प्रलंबित
कोल्हापूर ल्ह्यात हंगाम सुरू होऊन पंधरा दिवसांचा कालावधी उलटून गेला तरीही अद्याप अपवाद वगळता बहुतांशी साखर कारखान्यांनी एफआरपीची रक्कम जमा केली नाही. जिल्ह्यातील २३ कारखान्यांनी यंदा ऊस गाळपास प्रारंभ केला आहे.
कोल्हापूर : जिल्ह्यात हंगाम सुरू होऊन पंधरा दिवसांचा कालावधी उलटून गेला तरीही अद्याप अपवाद वगळता बहुतांशी साखर कारखान्यांनी एफआरपीची रक्कम जमा केली नाही. जिल्ह्यातील २३ कारखान्यांनी यंदा ऊस गाळपास प्रारंभ केला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात २३ नोव्हेंबर अखेर सुमारे १७ लाख टनांचे गाळप या कारखान्यांनी केले आहे. एका कारखान्यानेच फक्त तोडणीच्या पंधरा दिवसानंतरही एफआरपी शेतकऱ्यांना दिली आहे.
गेल्या वर्षी साखर निर्यात केलेली रक्कम अद्याप कारखान्यांना मिळालेली नाही. याचबरोबर साखर विक्रीही वेगवान होत नसल्याने कारखान्यांकडे सध्या शेतकऱ्यांना तातडीने देण्यासाठी पैसे नसल्याने एफआरपी देण्यास दिरंगाई होत असल्याची माहिती कारखाना सूत्रांनी दिली.
यंदाच्या हंगामात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एक रकमी एफआरपीच्या मुद्यावर कोणतेही आंदोलन केले नाही. नियमाप्रमाणे पंधरा दिवसांत एफआरपी द्यावी लागते. पण काही कारखाने सुरू होऊन पंधरा दिवसांपेक्षा जास्त अवधी लोटला आहे. अनेकांनी महिन्यापूर्वीपासून गाळप सुरू केले आहे. पण अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत. बॅंक कर्ज आणि साखरेचे दर याच गर्तेत सध्या साखर कारखाने अडकले आहेत.
एकरकमी एफआरपीचा वायदा केल्याने त्याचे तुकडे पाडता येत नसल्याने कारखान्यांनी एफआरपी देणेच प्रलंबित ठेवले आहेत. ज्यावेळी पूर्ण रक्कमेची जुळणी होइल त्याच वेळी एफआरपी देण्याचा विचार कारखान्यांचा आहे.
एफआरपीचे तुकडे पाडून दिल्यास पुन्हा शेतकऱ्यांत रोष होइल या भीतीने कारखान्यांनी एफआरपीच उशिरा देण्याची मानसिकता केली असल्याचे चित्र सध्या आहे. मजूर टंचाईमुळे यंदाचा हंगाम हळूवार चालत आहे. वाफसा वेगात येत असला तरी मजुरांमुळे कारखाने कमी क्षमतेवर चालत आहेत. यातच आता कारखान्यांवर वेळेत एफआरपी देण्याचा दबावही वाढत
आहे.
- 1 of 1023
- ››