Agriculture news in marathiDistribution of lump sum FRP pending in Kolhapur | Agrowon

एकरकमी ‘एफआरपी’चे वाटप कोल्हापुरात प्रलंबित

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 26 नोव्हेंबर 2020

कोल्हापूर  ल्ह्यात हंगाम सुरू होऊन पंधरा दिवसांचा कालावधी उलटून गेला तरीही अद्याप अपवाद वगळता बहुतांशी साखर कारखान्यांनी एफआरपीची रक्कम जमा केली नाही. जिल्ह्यातील २३ कारखान्यांनी यंदा ऊस गाळपास प्रारंभ केला आहे.

कोल्हापूर  : जिल्ह्यात हंगाम सुरू होऊन पंधरा दिवसांचा कालावधी उलटून गेला तरीही अद्याप अपवाद वगळता बहुतांशी साखर कारखान्यांनी एफआरपीची रक्कम जमा केली नाही. जिल्ह्यातील २३ कारखान्यांनी यंदा ऊस गाळपास प्रारंभ केला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात २३ नोव्हेंबर अखेर सुमारे १७ लाख टनांचे गाळप या कारखान्यांनी केले आहे. एका कारखान्यानेच फक्त तोडणीच्या पंधरा दिवसानंतरही एफआरपी शेतकऱ्यांना दिली आहे.

 गेल्या वर्षी साखर निर्यात केलेली रक्कम अद्याप कारखान्यांना मिळालेली नाही. याचबरोबर साखर विक्रीही वेगवान होत नसल्याने कारखान्यांकडे सध्या शेतकऱ्यांना तातडीने देण्यासाठी पैसे नसल्याने एफआरपी देण्यास दिरंगाई होत असल्याची माहिती कारखाना सूत्रांनी दिली.

यंदाच्या हंगामात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एक रकमी एफआरपीच्या मुद्यावर कोणतेही आंदोलन केले नाही. नियमाप्रमाणे पंधरा दिवसांत एफआरपी द्यावी लागते. पण काही कारखाने सुरू होऊन पंधरा दिवसांपेक्षा जास्त अवधी लोटला आहे. अनेकांनी महिन्यापूर्वीपासून गाळप सुरू केले आहे. पण अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत. बॅंक कर्ज आणि साखरेचे दर याच गर्तेत सध्या साखर कारखाने अडकले आहेत.

एकरकमी एफआरपीचा वायदा केल्याने त्याचे तुकडे पाडता येत नसल्याने कारखान्यांनी एफआरपी देणेच प्रलंबित ठेवले आहेत. ज्यावेळी पूर्ण रक्कमेची जुळणी होइल त्याच वेळी एफआरपी देण्याचा विचार कारखान्यांचा आहे. 

एफआरपीचे तुकडे पाडून दिल्यास पुन्हा शेतकऱ्यांत रोष होइल या भीतीने कारखान्यांनी एफआरपीच उशिरा देण्याची मानसिकता केली असल्याचे चित्र सध्या आहे. मजूर टंचाईमुळे यंदाचा हंगाम हळूवार चालत आहे. वाफसा वेगात येत असला तरी मजुरांमुळे कारखाने कमी क्षमतेवर चालत आहेत. यातच आता कारखान्यांवर वेळेत एफआरपी देण्याचा दबावही वाढत 
आहे.


इतर बातम्या
कृषी कायद्यांना एकसंध विरोध; मुंबईत...मुंबई : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा,...
नगरमध्ये पन्नास हजार क्विंटल मका खरेदी...नगर ः शासनाने बंद केलेली मका खरेदी सुरू केली. नगर...
सांगली बाजार समितीत नव्या हळदीचे सौदेसांगली ः सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे विभागात गहू क्षेत्रात ३६ हजार...पुणे ः गहू पेरणीस पोषक हवामान उशिराने तयार झाले....
संघटित कुक्कुटपालनातून ‘बर्ड फ्लू’चा...नाशिक : विभागात संघटित व शास्त्रीय पद्धतीने...
अण्णांच्या शेतकरी आंदोलनाला चार...नगर ः पीपल्स हेल्पलाइन, भारतीय जनसंसद व ‘मेरे देश...
महाराष्ट्राच्या चित्ररथावर संत...राळेगणसिद्धी, जि. नगर : प्रजासत्ताकदिनी (ता. २६)...
मराठवाड्यातील उपयुक्‍त पाण्यात दोन...औरंगाबाद : मराठवाड्यातील एकूण प्रकल्पांमधील...
जालना जिल्ह्यातील दोन केंद्रांत अडीच...जालना : येथील कृषी उत्पन्न बाजारसमिती व उपबाजार...
पाणीपुरवठ्यापासून एकही गाव वंचित...परभणी ः  ‘‘‘हर घर नल से जल’ योजनेअंतर्गत...
लिंबूवर्गीय फळांच्या आयातीवरील बंधने...२०२१ च्या सुरवातीस ब्रिटनने युरोपीय संघाच्या एकल...
पीकविमा सरसकट द्या; ‘प्रहार जनशक्ती’ची...नांदेड : पीकविमा मंजूर व्हावा म्हणून यापूर्वी...
मनमाडमध्ये शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर...नाशिक : मनमाड येथे किसान सभेच्या वतीने ...
नगर जिल्हा बँकेची निवडणूक महाविकास...नगर :  नगर जिल्हा मध्यवर्ती सहकार बॅंकेची...
समन्यायी पाणी वाटप आव्हानात्मक विषय : ...नांदेड : समन्यायी पाणी वाटप हा दिवसेंदिवस अत्यंत...
`मका खरेदीची प्रक्रिया शुक्रवारपर्यंत...नाशिक: ‘‘मका खरेदीसाठी शासनाने ३२ जानेवारी पर्यंत...
तीन हजार महिलांना देणार रोजगार : विजय...चंद्रपूर : ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाला...
पत्र्या ठोकण्याची वेळ आणू नका : राजू...सांगली : केंद्र सरकार कृषी कायदे शेतकऱ्यांवर...
मका खरेदीचे कमी उद्दिष्ट, शेतकऱ्यांसमोर...बुलडाणा : मका खरेदीसाठी शासनाने नवे उद्दिष्ट देऊन...
मागील वर्ष ठरले आजवरचे सर्वाधिक उष्णपुणे : कोरोनाचे संकट, बर्ड फ्लूची साथ आणि शेतकरी...