agriculture news in marathi,distrubance in crop harvesting due to rain, kolhapur, maharashtra | Agrowon

कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या काढणीत पावसामुळे अडथळे
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 18 ऑक्टोबर 2018

कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात असतानाच मंगळवारी (ता.१७) दुपारनंतर विविध ठिकाणी झालेल्या जोरदार पावसामुळे पीक काढणीत मोठे अडथळे आले. अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची धांदल उडाली. मळणीसाठी तयारी केलेले पीक झाकून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची त्रेधा तिरपीट उडाली. गगनबावडा, पन्हाळा, आजरा, हातकणंगलेसह शिरोळ तालुक्‍यांत जोरदार पाऊस झाला. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने भाताची काढणी करणे अशक्‍य झाले. जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांना कापणी अर्धवट ठेवावी लागली.

कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात असतानाच मंगळवारी (ता.१७) दुपारनंतर विविध ठिकाणी झालेल्या जोरदार पावसामुळे पीक काढणीत मोठे अडथळे आले. अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची धांदल उडाली. मळणीसाठी तयारी केलेले पीक झाकून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची त्रेधा तिरपीट उडाली. गगनबावडा, पन्हाळा, आजरा, हातकणंगलेसह शिरोळ तालुक्‍यांत जोरदार पाऊस झाला. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने भाताची काढणी करणे अशक्‍य झाले. जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांना कापणी अर्धवट ठेवावी लागली.

गगनबावडा तालुक्‍यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. सुमारे तासापेक्षाही अधिक काळ झालेल्या या पावसामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी कापणी केलेले भात पीक भिजले. पावसामुळे कापून टाकलेले भात रचून ठेवण्यासही शेतकऱ्यांना वेळ मिळाला नाही. राशिवडे, शिरगाव परिसरात अचानक झालेल्या पावसामुळे शेतकरी वर्गाची धांदल उडाली. भात कापणीवर परिणाम झाला. परिसरात भात कापणी, मळणी, वाळवणे, पिंजर वाळवणे अशी कामे सुरू आहेत. दुपारी पावसाने जोरदार सुरवात केली. यामुळे भात कापणी मळणीची कामे अर्धवट स्थितीत बंद केली.

शाहूवाडी तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात दुपारपासून पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात उन्हाचा तडाखा जाणवत होता. दुपारनंतर ढगाळ वातावरण होऊन पावसाला अचानक सुरवात झाली. त्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. या पावसाने काढणीयोग्य भात पिके, तसेच मळणी सुरू असलेल्या भात पिकाला फटका बसला असून, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भाताचे पिंजरही भिजल्याने ते कुजण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत पाऊसऔरंगाबाद / जालना : औरंगाबाद, जालना या दोन...
सोलापुरातील कांदा उत्पादकांच्या...सोलापूर : राज्यातील कांदा उत्पादक...
कोयना धरणात ४४.७० टीएमसी उपयुक्त...सातारा  ः कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात...
पुणे जिल्ह्यातील पूर्व भागात पावसाची...पुणे  : जवळपास आठवडाभराच्या विश्रांतीनंतर...
`कुकडी`तून घोड धरणात पाणी सोडण्याची...न्हावरे, जि. पुणे   ः पावसाळा सुरू होऊन...
विद्राव्य खतांना अनुदान देण्याची मागणीकापडणे, जि. धुळे   ः विद्राव्य खतांना...
नगर जिल्ह्यात पाचशे वैयक्तिक पाणीयोजना...नगर  ः पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला;...
सोलापुरात कृषी विभाग शेतकऱ्यांना देणार...सोलापूर : जिल्हा परिषदेच्या कृषी समितीने...
जळगाव बाजार समितीत ज्वारी, बाजरी,...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीत...
नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनासाठी...रत्नागिरी  ः नाणार येथे ग्रीन रिफायनरी...
मुख्यमंत्री कोण होणार हे जनता ठरवेल ः...नाशिक  : मुख्यमंत्री कोण होणार हे जनता ठरवेल...
द्राक्ष शेतीत संघटनात्मक कार्यपद्धती...नाशिक : जागतिक द्राक्ष निर्यातीत नाशिक जिल्ह्याचा...
बुलडाणा जिल्ह्यात दुष्काळी स्थितीचा...नांदुरा, जि. बुलडाणा   ः तालुक्यात...
नांदेड, परभणी, हिंगोलीत पाऊसनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २८...
सांगली जिल्ह्यातील ४६८ गावांमधील...सांगली  : जिल्ह्यात ४६८ गावांमधील गावठाणांचा...
लातूर, उस्मानाबाद, जालना, बीड...लातूर : लातूर, उस्मानाबाद, जालना आणि बीड...
अकोला जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअकोला ः पावसाचा खंड आणि त्यातच दिवसाचे...
जलसंधारण कामासाठी जलशक्ती योजना :...वाल्हे, जि. पुणे  : राज्यात जलयुक्त...
अनधिकृत बंधारे काढण्यासाठी ‘स्वाभिमानी’...नगर  : भंडारदरा धरणापासून ते ओझर...
बचत गटांना प्रोत्साहनासाठी ‘हिरकणी...सोलापूर  : राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक...