अकोला : कृषी विद्यापीठात सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्‍घाटन

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्‍घाटन
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्‍घाटन

अकोला ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील अपारंपरिक ऊर्जास्रोत, विद्युत अभियांत्रिकी विभाग व मुंबई येथील क्लीन मॅक्स इनव्हायरो एनर्जी सोल्युशन कंपनीच्या संयुक्त विद्यमाने साकारलेल्या १९५ किलोवॉट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पाचे नुकतेच कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी उद्‍घाटन केले. विद्यापीठात वेगवेगळ्या ठिकाणी १२३.५० किलोवॉट आणि ७१.५० किलोवॉट क्षमतेचे छतावरील वीजवाहक सोलर पीव्ही ऊर्जा प्रकल्प लावण्यात आले आहेत. सौरऊर्जेचा दैनंदिन कामकाजात उपयोग होण्याच्या उद्देशाने हे दोन प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत. याद्वारे वर्षात दोन लाख ७६ हजार ९०० युनिट विद्युतनिर्मिती होईल. यामुळे विद्यापीठाची वार्षिक बचत १६ ते १७ लाख रुपये एवढी राहणार आहे. या प्रकल्पाचे डॉ. बोंडे यांनी कौतुक केले. या वेळी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, कुलगुरू डॉ. व्ही. एम. भाले, कुलसचिव डॉ. पी. आर. कडू, संचालक डॉ. व्ही. के. खर्चे, डॉ. दिलीप मानकर, डॉ. एम. बी. नागदेवे यांच्यासह इतर उपस्थित होते. या वेळी विभागप्रमुख डॉ. सुरेंद्र काळबांडे यांनी सौरऊर्जा तंत्रज्ञान, सोलर इन्सेक्ट लाइट ट्रॅप याविषयी तांत्रिक माहिती दिली.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com