agriculture news in marathi,drought situation in west shirur taluka, pune, maharashtra | Page 2 ||| Agrowon

शिरूरच्या पश्‍चिम भागात पाण्याबाबत शेतकरी चिंतेत

टीम अॅग्रोवन
बुधवार, 8 मे 2019

टाकळी हाजी, जि. पुणे ः उन्हाच्या तीव्र झळा आणि पाणीटंचाई यामुळे दुष्काळाची तीव्रता वाढत आहे. सुकलेली पिके आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करताना दिसू लागला आहे. अनेक गावे तहानलेली आहेत. शिरूर तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात कुकडी व घोड नदी कोरडी पडल्याने नागरिकांमध्ये पाण्याबाबत चिंता निर्माण झाली आहे. 

टाकळी हाजी, जि. पुणे ः उन्हाच्या तीव्र झळा आणि पाणीटंचाई यामुळे दुष्काळाची तीव्रता वाढत आहे. सुकलेली पिके आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करताना दिसू लागला आहे. अनेक गावे तहानलेली आहेत. शिरूर तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात कुकडी व घोड नदी कोरडी पडल्याने नागरिकांमध्ये पाण्याबाबत चिंता निर्माण झाली आहे. 

जुन्नर, आंबेगाव, राजगुरुनगर या परिसरात तयार झालेल्या धरणांमुळे दुष्काळात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होत असते. दरवर्षी कुकडी व घोडनदीला आठही महिने पाणी मिळत असते. त्यातून ऐन उन्हाळ्यात या भागात कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यामध्ये पाणी पहावयास मिळते. या वेळी मात्र मे महिन्यात या परिसरात सगळीकडे पाणी गायब झाल्याचे दिसून येत आहे. विहिरींनी देखील तळ गाठला आहे. 

या परिसरात कुलदैवत श्री मळगंगा देवीच्या यात्रेच्या काळात भाविकांना पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या भेडसावली होती. राज्यातून भाविक येथे दर्शनासाठी येत असल्याने येथे पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी विविध स्तरांतून होऊनही येथे पाण्याची समस्या कायम राहिल्याने भाविकांमध्ये नाराजी व्यक्त केली गेली. दुष्काळाची व पिण्याच्या पाण्याच्या समस्याबाबत नुकतीच विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. 

कवठे येमाई चारीला पाणी नाही 
डिभां उजव्या कालव्याला पाणी सोडण्यात आले होते. गेली दोन महिने यासाठी व्यवस्थापन करण्यात आले होते. शेवटच्या टोकाला पाणी गेल्यावर टप्प्याटप्याने पाणी देऊन ही भूमिका पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी  घेतली होती. गेल्या वर्षी पाणी देऊ म्हणूनही कवठे येमाई येथील चारीला पाणी दिलेच नाही. या वेळी देखील अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करीत या चारीला पाणी न देताच वरच्या भागात पाणी वळवून घेतले आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी या आवर्तनातही पाण्यापासून वंचित आहेत. 


इतर ताज्या घडामोडी
आमदार भुयार यांनी स्वतः केली गावात...अमरावती  ः कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव...
नुकसानग्रस्तांना हेक्टरी ५० हजार...औरंगाबाद  : अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या...
रावळगावच्या भावसा जाधव यांनी गरजूंना...नाशिक : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन...
अकोला ‘झेडपी‘चा ३६ कोटींचा अर्थसंकल्प अकोला : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर बैठकांना आळा...
कापशीत शेतकरी गटातर्फे भाजीपाल्याचे...अकोला ः कृषी तंत्रज्ञान व्यवथापन यंत्रणा (...
साताऱ्यात जिल्हा बँकेकडून पीककर्जास ३०...सातारा : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी...
पवना फुल उत्पादक संघाचे दररोज सव्वा...पुणे ः ‘कोरोना’मुळे सर्व देशात लाॅकडाऊन आहे....
ऊसतोड कामगारांसाठी शंभर कोटींचे पॅकेज...नगर  ः `कोरोना`च्या पार्श्वभूमीवर ...
पुणे जिल्हा परिषदेतर्फे कर्मचाऱ्यांना...पुणे : ‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
वसमतमध्ये व्हाॅट्सअॅप ग्रुपवरून घरपोच...हिंगोली ः हिंगोली जिल्ह्यातील वसमत...
वालसावंगी परिसरात पावसाने पिके आडवीवालसावंगी, जि. जालना : ‘कोरोना’चे मोठे संकट...
लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी,...मुंबई  : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर...
बेजबाबदारपणे वागणाऱ्यांची आता खैर नाही...मुंबई : इटली, अमेरिका, स्पेनमधील ‘कोरोना’...
डॉक्टर, कर्मचारी युद्धातील आघाडीचे...मुंबई : ‘कोरोना’च्या रुग्णांची सेवा करणाऱ्या...
अमरावती ‘झेडपी’चे पदाधिकारी देणार दोन...अमरावती : कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव...
कारखानदारांनी कामगारांची सोय न केल्यास...कोल्हापूर  ः सर्व कारखानदारांनी त्यांचे काम...
नगर जिल्ह्यात रोज २६ लाख लिटर दूध संकलननगर  ः कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव...
तीन जिल्ह्यांतील ३९ मंडळात पावसाची...औरंगाबाद : एकीकडे ‘कोरोना’चा प्रादुर्भाव...
शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी दूर करा ः विजय... नागपूर  ः कोरोना विषाणू नियंत्रणासाठी...
‘कृषी निविष्ठा विक्री केंद्र सम-विषम...परभणी ः कृषी निविष्ठा विक्री केंद्रावर...