agriculture news in Marathi,dry weather condition possibility in state ,Maharashtra | Agrowon

राज्यात कोरड्या हवामानाचा अंदाज

टीम अॅग्रोवन
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

पुणे (प्रतिनिधी) ः गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत पावसाने उघडीप दिली आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत हवामान ढगाळ असले तरी आज (ता. ९) आणि उद्या (ता. १०) काही अंशी हवामान ढगाळ राहणार आहे. पुढील आठवड्यापासून राज्यात हवामान कोरडे राहणार असून, काही प्रमाणात किमान तापमान कमी होण्यास सुरवात होईल, अशी शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे.  

पुणे (प्रतिनिधी) ः गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत पावसाने उघडीप दिली आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत हवामान ढगाळ असले तरी आज (ता. ९) आणि उद्या (ता. १०) काही अंशी हवामान ढगाळ राहणार आहे. पुढील आठवड्यापासून राज्यात हवामान कोरडे राहणार असून, काही प्रमाणात किमान तापमान कमी होण्यास सुरवात होईल, अशी शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे.  

‘महा’ चक्रीवादळ शमल्याने राज्यातील अनेक भागांत हवामान कोरडे होते. त्यामुळे सकाळपासून ऊन पडले. दुपारी उन्हाचा चांगलाच चटका वाढला होता. त्यामुळे कमाल तापमानात काही प्रमाणात वाढ झाली होती. शुक्रवारी (ता. ८) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत ब्रह्मपुरी येथे ३३.६ अंश सेल्सिअसची सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली होती. कोरड्या हवामानामुळे किमान तापमानात चढउतार होत असले तरी नगरमध्ये सर्वात कमी १६.४ अंश सेल्सिअसची सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली.
 
कोरड्या हवामानामुळे कोकणातील कमाल तामपानात सरासरीच्या तुलनेत एक ते दोन अंश सेल्सिअसने घट झाली असली तरी कमाल तापमान ३० ते ३२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. मध्य महाराष्ट्रातही २४ ते ३१ तर खान्देशात ३३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान कमाल तापमान होते. मराठवाड्यात ३१ ते ३३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान होते. विदर्भात कमाल तापमान कमी अधिक असले तरी कमाल तापमान २८ ते ३३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते.    

बुलबुल चक्रीवादळाच्या तीव्रतेत हळहूळू वाढ
बंगालच्या उपसागरात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून तयार झालेल्या बुलबुल चक्रीवादळाची तीव्रता हळूहळू वाढत आहे. शुक्रवारी (ता. ६) या चक्रीवादळाच्या वाऱ्यांचा वेग ताशी बारा किलोमीटर एवढा होता. हे चक्रीवादळ परादीपपासून ३५०, पश्चिम बंगालच्या सागर बेटापासून ४९० किलोमीटर अंतरावर आहे. हे चक्रीवादळ बांगलादेशाच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे या चक्रीवादळाच्या वाऱ्यांचा वेग ताशी ११० ते १२० किलोमीटरच्या दरम्यान राहणार असून जास्तीत जास्त वेग १३५ किलोमीटरपर्यंत जाण्याची शक्यता आहे.  

शुक्रवारी (ता. १) सकाळी आठ वाजेपर्यंत विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत झालेली वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) ः पुणे ३१.७ (०.९), लोहगाव ३१.१ (०.१), नगर ३१.६ (०.५), जळगाव ३३.५, कोल्हापूर २९.७ (-१.१), महाबळेश्वर २४.५ (-१.१), मालेगाव ३१.६ (-०.७), नाशिक ३२.४ (१.०), सांगली ३२.०  (०.४), सातारा ३०.८ (१.३), सोलापूर ३२.८ (१.१), मुंबई ३१.६ (-२.४), सांताक्रूझ ३२.८ (-१.४), अलिबाग ३०.५ (-२.९), रत्नागिरी ३३.२ (-०.९), डहाणू ३२.० (-१.०), औरंगाबाद ३१.४ (०.८), परभणी ३२.१ (१.०), नांदेड ३३.० (१.२), अकोला ३३.३ (१.०), अमरावती ३४.२ (२.१), बुलडाणा २८.० (-१.१), ब्रह्मपुरी ३३.९ (-२.८), चंद्रपूर ३२.६ (१.२), गोंदिया ३१.० (-०.१), नागपूर ३३.३ (२.१), वाशीम ३०.०, वर्धा ३३.० (१.५), यवतमाळ ३२.० (१.६).


इतर अॅग्रो विशेष
कहर ‘कोरोना’चाकोरोना विषाणूच्या वाढत्या उद्रेकाने जगभर दहशतीचे...
नदी संवर्धनाचा केरळचा आदर्शकेरळ हे भारताच्या दक्षिण टोकाचे एक राज्य. अरबी...
शेतमजुराच्या मुलीने पटकावला ‘शिवछत्रपती...अकोला ः प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर एका खेड्यातील...
साडेआठ हजार कोटी खर्चूनही 'जलयुक्त' फेल...मुंबई : फडणवीस सरकारची महत्त्वाकांक्षी जलयुक्त...
पीक विमा योजना यापुढे ऐच्छिक; केंद्र...नवी दिल्ली : केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा...
राज्यात तापमानात चढ-उतार शक्यपुणे : राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ...
सेंद्रिय धान्य महोत्सवातून हक्काची...तीन-चार वर्षांपासून कृषी विभागातर्फे पुणे येथे...
प्रयोगशीलतेने घडविली समृद्धी..अवर्षणग्रस्त कर्जत तालुक्यातील पाटेगाव (जि. नगर)...
राज्यासह देशात शिवजयंती उत्साहात साजरीपुणे : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी...
शिवरायांची भविष्यवेधी ध्येयधोरणेछत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने रयतेचा राजा...
आपणच आपला करावा उद्धारशेती फायद्याची करायची असेल, तर शेतकऱ्यांनी एकत्र...
हवामानबदलाशी लढण्यासाठी एक हजार कोटी...पुणे ः जागतिक हवामानबदलाची समस्या संपूर्ण जगासमोर...
राज्यात उन्हाच्या झळा वाढल्यापुणे : राज्यात कमाल तापमानात मोठी वाढ झाल्याने...
कापसाचे ६४७ कोटींचे चुकारे थकीतअमरावती ः बाजारात दर कोसळल्याने महाराष्ट्र राज्य...
‘पणन’ची कापूस खरेदी उच्चांकी दिशेनेऔरंगाबाद : महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन...
शिवजयंतीनिमित्त मिरवणुकीत ८५ स्वराज्यरथ...पुणे : ‘‘पुण्यात शिवजयंती महोत्सव समितीतर्फे आज...
सेवानिवृत्त पोलिस उपअधीक्षकाची...औरंगाबाद शहरापासून सुमारे बारा किलोमीटरवर...
कापूस उद्योगाचे चीनमध्ये पाच हजार कोटी...जळगाव ः देशातील सूत व कापूस गाठींचा मोठा खरेदीदार...
हमीदराने खरेदीसाठी तुरीचे संपूर्ण...वाशीम ः तुरीचे स्वतंत्रपणे पीक घेण्याची पद्धत...
पंधरा लाख कापूस गाठींची खानदेशातील...जळगाव ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...