कोल्हापूर : गार्डन्स क्लब आणि कोल्हापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ४९
अॅग्रो विशेष
राज्यात कोरड्या हवामानाचा अंदाज
पुणे (प्रतिनिधी) ः गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत पावसाने उघडीप दिली आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत हवामान ढगाळ असले तरी आज (ता. ९) आणि उद्या (ता. १०) काही अंशी हवामान ढगाळ राहणार आहे. पुढील आठवड्यापासून राज्यात हवामान कोरडे राहणार असून, काही प्रमाणात किमान तापमान कमी होण्यास सुरवात होईल, अशी शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे.
पुणे (प्रतिनिधी) ः गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत पावसाने उघडीप दिली आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत हवामान ढगाळ असले तरी आज (ता. ९) आणि उद्या (ता. १०) काही अंशी हवामान ढगाळ राहणार आहे. पुढील आठवड्यापासून राज्यात हवामान कोरडे राहणार असून, काही प्रमाणात किमान तापमान कमी होण्यास सुरवात होईल, अशी शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे.
‘महा’ चक्रीवादळ शमल्याने राज्यातील अनेक भागांत हवामान कोरडे होते. त्यामुळे सकाळपासून ऊन पडले. दुपारी उन्हाचा चांगलाच चटका वाढला होता. त्यामुळे कमाल तापमानात काही प्रमाणात वाढ झाली होती. शुक्रवारी (ता. ८) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत ब्रह्मपुरी येथे ३३.६ अंश सेल्सिअसची सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली होती. कोरड्या हवामानामुळे किमान तापमानात चढउतार होत असले तरी नगरमध्ये सर्वात कमी १६.४ अंश सेल्सिअसची सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली.
कोरड्या हवामानामुळे कोकणातील कमाल तामपानात सरासरीच्या तुलनेत एक ते दोन अंश सेल्सिअसने घट झाली असली तरी कमाल तापमान ३० ते ३२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. मध्य महाराष्ट्रातही २४ ते ३१ तर खान्देशात ३३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान कमाल तापमान होते. मराठवाड्यात ३१ ते ३३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान होते. विदर्भात कमाल तापमान कमी अधिक असले तरी कमाल तापमान २८ ते ३३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते.
बुलबुल चक्रीवादळाच्या तीव्रतेत हळहूळू वाढ
बंगालच्या उपसागरात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून तयार झालेल्या बुलबुल चक्रीवादळाची तीव्रता हळूहळू वाढत आहे. शुक्रवारी (ता. ६) या चक्रीवादळाच्या वाऱ्यांचा वेग ताशी बारा किलोमीटर एवढा होता. हे चक्रीवादळ परादीपपासून ३५०, पश्चिम बंगालच्या सागर बेटापासून ४९० किलोमीटर अंतरावर आहे. हे चक्रीवादळ बांगलादेशाच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे या चक्रीवादळाच्या वाऱ्यांचा वेग ताशी ११० ते १२० किलोमीटरच्या दरम्यान राहणार असून जास्तीत जास्त वेग १३५ किलोमीटरपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
शुक्रवारी (ता. १) सकाळी आठ वाजेपर्यंत विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत झालेली वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) ः पुणे ३१.७ (०.९), लोहगाव ३१.१ (०.१), नगर ३१.६ (०.५), जळगाव ३३.५, कोल्हापूर २९.७ (-१.१), महाबळेश्वर २४.५ (-१.१), मालेगाव ३१.६ (-०.७), नाशिक ३२.४ (१.०), सांगली ३२.० (०.४), सातारा ३०.८ (१.३), सोलापूर ३२.८ (१.१), मुंबई ३१.६ (-२.४), सांताक्रूझ ३२.८ (-१.४), अलिबाग ३०.५ (-२.९), रत्नागिरी ३३.२ (-०.९), डहाणू ३२.० (-१.०), औरंगाबाद ३१.४ (०.८), परभणी ३२.१ (१.०), नांदेड ३३.० (१.२), अकोला ३३.३ (१.०), अमरावती ३४.२ (२.१), बुलडाणा २८.० (-१.१), ब्रह्मपुरी ३३.९ (-२.८), चंद्रपूर ३२.६ (१.२), गोंदिया ३१.० (-०.१), नागपूर ३३.३ (२.१), वाशीम ३०.०, वर्धा ३३.० (१.५), यवतमाळ ३२.० (१.६).