नाशिक जिल्ह्यात पावसाच्या आगमनाने शेतकरी सुखावला

नाशिक जिल्ह्यात पावसाच्या आगमनाने शेतकरी सुखावला
नाशिक जिल्ह्यात पावसाच्या आगमनाने शेतकरी सुखावला

नाशिक : गेल्या आठवड्यापासून काही ठिकाणी पावसाचे आगमन झाले होते. मात्र, अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा लागली असताना सोमवारी (ता. १) दुपारी ३ वाजेनंतर जिल्ह्यात विविध ठिकाणी दमदार पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात सुमारे तीन ते चार तास सर्वदूर पावसाच्या सरी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. तुरळक होत असलेल्या पावसाने सोमवारी (ता. १) जिल्ह्यातील अनेक भागांत जोरदार हजेरी लावली. नाशिक शहर व परिसरात मुसळधार पाऊस झाला. गंगापूर धरण क्षेत्रातही पाऊस झाल्याने नाशिककरांना दिलासा मिळाला आहे. नाशिक शहरात अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याने वाहतुकीला अडचण निर्माण झाली होती.  जिल्ह्यात इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, दिंडोरी, निफाड, नांदगाव, मालेगाव, बागलाण, चांदवड तालुक्यातदेखील दमदार पाऊस झाला. इगतपुरी आणि पेठ वगळता जिल्ह्यात पुरेसा पाऊस होऊ शकलेला नाही.  पेठ तालुक्यात अनेक भागांत पावसाने जोरदार मुसंडी घेतली होती. यात अनेक ठिकणी नुकसान होऊन रस्ते व पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळित झाली होती, तर काही ठिकाणी शेतीमालाचे नुकसान झाले. इगतपुरीत तालुक्यातील घोटी व परिसरात पावसाचा जोर कायम दिसून आला. मालेगाव तालुक्यात रावळगाव, वडगाव, दाभाडी, अजंग वडेल, सोनज, पिंपळगाव परिसरात पावसाचा जोर दिसून आला. चांदवड तालुक्यात वडाळीभोई, सोग्रस, धोडांबे, मालसाने या भागात पाऊस होता. बागलाण तालुक्यात चिराई महड परिसरात समाधानकारक पाऊस झाला. दिंडोरी शहर व तालुक्यात खतवड, राजापूर, परिसरात सायंकाळी जोरदार पावसाला सुरवात झाली. नांदगाव तालुक्यातील लोहशिंगवे व परिसरात मुसळधार पाऊस झाला. सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातही मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. निफाड तालुक्यात सावरगाव व परिसरात अनेक ठिकाणी झालेल्या जोरदार पावसामुळे शेतांमध्ये पाणी तुंबले होते. पावसामुळे काही ठिकाणी जनजीवन विस्कळित झाले होते. काही ठिकाणी वादळामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. जुलै महिन्याच्या सुरवातीला जिल्ह्यातील अनेक भागांत मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. मात्र, अनेक भागांत अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे. शेतकऱ्यांना पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. तालुकानिहाय जुलै महिन्याचे सरासरी पर्जन्यमान (मिमी) ः नाशिक २२३.५०, इगतपुरी १३३९.८०, दिंडोरी २५६.५०, पेठ ९३६.४०, त्र्यंबकेश्वर ९३६.४०, मालेगाव ११२.३०, नांदगाव १११.५०, चांदवड १४५.१०, कळवण २२३.९०, बागलाण ९७.६०, सुरगाणा ७११.८०, देवळा १९८.१०, निफाड ११८.१०, सिन्नर १५२.६०, येवला १०७.४०  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com