agriculture news in marathi,Due to lack of payment, disappointment among the growers of sugarcane | Page 2 ||| Agrowon

पेमेंट न मिळाल्याने वसाकाच्या ऊस उत्पादकांत निराशा

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 18 एप्रिल 2019

नाशिक : देवळा तालुक्यातील वसंतदादा सहकारी साखर कारखाना धाराशिव साखर कारखान्याला भाडेतत्त्वावर दिला आहे. या हंगामात जिल्ह्यासह धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी ऊस दिला. मात्र, चार महिन्यांचा कालावधी उलटला, तरीही ऊस उत्पादकांचे पेमेंट मिळाले नाही, त्यामुळे साखर आयुक्तालयाने कारखाना प्रशासनावर कारवाई केली आहे. 

नाशिक : देवळा तालुक्यातील वसंतदादा सहकारी साखर कारखाना धाराशिव साखर कारखान्याला भाडेतत्त्वावर दिला आहे. या हंगामात जिल्ह्यासह धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी ऊस दिला. मात्र, चार महिन्यांचा कालावधी उलटला, तरीही ऊस उत्पादकांचे पेमेंट मिळाले नाही, त्यामुळे साखर आयुक्तालयाने कारखाना प्रशासनावर कारवाई केली आहे. 

याबाबत कारखान्याचे शेतकी अधिकारी साळुंखे यांनी ऊस उत्पादकांना आपले पेमेंट घेण्यासाठी कारखाना कार्यस्थळावर बोलविले होते. मात्र, कार्यस्थळावर कारखाना प्रशासन व व्यवस्थापन यंत्रणाच उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांची मोठी निराशा झाली.  धुळे व जळगाव जिल्ह्यातू शिरपूर, अमळनेर, शबरीधाम येथून आलेले ऊस उत्पादक, ट्रॅक चालक - मालक यांना व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे रिकाम्या हाताने परत फिरण्याची वेळ आली. ऊसपुरवठादार शेतकऱ्याची घोर फसवणूक करण्यात आल्याचा आरोप या वेळी शेतकऱ्यांनी केला. इतर कारखान्यापेक्षा १ एक रुपया अधिक दर देऊ, हे आश्वासन खोटे ठरले. 

वसाका कार्यक्षेत्रासह गेटकेनच्या ऊसपुरवठादार शेतकऱ्याची व्यवस्थापनाने घोर फसवणूक केली. नवापूर, शहादा, शिरपूर, चाळीसगाव, पिळखोड, निफाड, आदी ठिकाणांहून ऊस गाळपास आणण्यात आला. कारखाना प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे ऊस उत्पादक अडचणीत सापडला आहे.

ऊसपुरवठादार शेतकरी, ऊसतोड कामगार, ऊस वाहतूकदारांकडे व्यवस्थापनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. वेळोवेळी संपर्क साधूनही कारखाना प्रशासनाकडून प्रतिसाद मिळाला नाही. पेमेंटबाबत दिलेले धनादेश माघारी घेण्यात आले आहेत. काहींना तर चार महिन्यांत एक रुपयाही मिळाला नाही. 

ऊस उत्पादकांचा सपत्नीक आत्महत्येचा प्रयत्न 

धाराशिव साखर कारखान्याला हंगामात ५५.९३६ टन ऊस दिलेल्या विलास पाटील हे सपत्नीक (रा. जापोरा ता. शिरपूर) शेतकरी पेमेंट घेण्यासाठी आले होते. मात्र, पैसे न मिळाल्याने विषाची बाटली घेऊन वसाकाच्या गेटवर आत्महत्या करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. या वेळी कुबेर जाधव व प्रहारचे तालुकाध्यक्ष विनोद आहेर यांनी तात्काळ तहसीलदारांना ही माहिती दिली. त्यांनी पेमेंट मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले. आरआरसी नोटीस कारखाना प्रशासनाला बजावली अाहे, असे देवळ्याचे तहसीलदार शेजुळ यांनी सांगितले.


इतर बातम्या
पावसाचा जोर वाढण्याची शक्यता  पुणे ः  बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे...
दूध प्रश्न बाजूला; शेतकरी संघटनांमधील...कोल्हापूर  : दूध दरप्रश्नी सरकारवर दबाव...
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक;...मुंबई : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या...
राज्यात धरणांमध्ये ३८ टक्के साठापुणे : मॉन्सूनचा पाऊस सुरू झाल्यानंतर जून...
मागण्यांसाठी मराठवाड्यात दूध...औरंगाबाद : दूध उत्पादन खर्चाच्या तुलनेत परवडणारा...
परभणी जिल्ह्यात रास्ता रोको, दूध संकलन...परभणी : दूध दरवाढीसाठी भाजपतर्फे शनिवारी (ता.१)...
दूध दरप्रश्नी आंदोलनाला विदर्भात...नागपूर : दूध दरप्रश्नी भाजपच्या वतीने...
दूध दरप्रश्नी भाजपचे सातारा जिल्ह्यात...सातारा  : गाईच्या दुधाला प्रतिलिटर १० रुपये...
जुलैअखेर पावसाने सरासरी गाठलीपुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) हंगामाची...
नगर जिल्ह्यात दूध दरप्रश्नी आंदोलननगर  ः गायीच्या दुधाला ३० रुपये प्रतिलिटर दर...
नांदेडमध्ये दूध दरप्रश्नी एल्गारनांदेड : रयत क्रांती संघटनेतर्फे शनिवारी (ता...
सांगलीत दूध रस्त्यावर ओतून, सरकारचा...सांगली  : ‘सरकारची माया आटली, दूध...
काटेपूर्णा प्रकल्पात ८६ टक्के पाणीसाठाअकोला  : जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांपैकी एक...
महायुतीचे वऱ्हाडात दूध दरप्रश्नी आंदोलनअकोला  ः दूध उत्पादकांनासरसकट १० रुपये...
सांगली जिल्ह्यात २६ हजार हेक्टरने ऊस...सांगली : जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यासह अन्य...
मुगावर काय फवारायचे?अकोला ः कडधान्य वर्गीय पिकांपैकी एक प्रमुख...
दूध दरप्रश्नी कोल्हापुरात भाजपचा ‘...कोल्हापूर  : दुधाला प्रतिलिटर १० रुपये तर...
दूध दरप्रश्नी महायुतीचे नाशिक जिल्ह्यात...नाशिक  : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर दूध...
रत्नागिरीत साडेसहा हजार हेक्टरवर फळबाग...रत्नागिरी  ः राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी...
पुणे विभागीय आयुक्तपदाची सूत्रे सौरभ...पुणे: पुणे विभागीय आयुक्तपदी ज्येष्ठ सनदी अधिकारी...