Agriculture news in marathi;Due to lack of rain in Gondia district, sowing can be avoided at 2 lakh hectares | Agrowon

गोंदिया जिल्ह्यात २ लाख हेक्‍टरवर पेरण्या खोळंबल्या
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 20 जून 2019

गोंदिया ः राइससिटी असा लौकिक असलेल्या गोंदिया जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने १ लाख ९१ हजार हेक्‍टरवरील पेरण्या खोळंबल्या आहेत. जून महिना संपत आला असताना वरुणराजा न बरसल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत.

गोंदिया ः राइससिटी असा लौकिक असलेल्या गोंदिया जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने १ लाख ९१ हजार हेक्‍टरवरील पेरण्या खोळंबल्या आहेत. जून महिना संपत आला असताना वरुणराजा न बरसल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत.

पूर्व विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात धानाची लागवड सर्वाधिक होते. कृषी विभागाने या वर्षी १ लाख ९१ हजार हेक्‍टर क्षेत्रावर पिकाच्या लागवडीचे नियोजन केले आहे. दरवर्षी शेतकरी मृगाचा दमदार पाऊस झाल्यानंतर पेरणीला सुरवात करतात. त्याकरिता सुरवातीला पऱ्हे (रोपवाटिका) तयार केली जाते. त्यानंतर लवकरच रोवणी करण्यावर शेतकऱ्यांचा भर राहतो. ही प्रक्रियाच उत्पादन वाढ किंवा उत्पादकता कमी करण्यास पूरक ठरते. त्यामुळे रोवणीची वेळ चुकू नये, अशी अपेक्षा शेतकऱ्यांची राहते. 

यंदा मृग नक्षत्र कोरडा गेला असून मॉन्सून अद्यापही सक्रिय झालेला नाही. त्यामुळे पावसाबाबत अनिश्चिततेचे वातावरण आहे. काही शेतकरी धूळपेरणी करून जोखीम स्वीकारण्याच्या मानसिकतेत आहेत; परंतु अपेक्षित ओल नसल्याने ही जोखीम पत्करू नये, असा सल्लावजा आवाहन कृषी विभागाने केले आहे. काही शेतकऱ्यांनी हा सल्ला मानत पुन्हा आठ ते दहा दिवस पावसाची प्रतीक्षा करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, पाऊस लांबल्यास, पेरण्या लांबतील, असे जाणकार सांगतात. त्याचा उत्पादकतेवरही परिणाम होणार आहे. शेतीची कामे खोळंबल्याने मजुरांनादेखील रोजगाराची प्रतीक्षा लागून आहे.

इतर बातम्या
गिरणा नदीवरील बलून बंधाऱ्यांसाठी आर्थिक...जळगाव ः जिल्ह्यातील सतत दुष्काळाशी झगडणाऱ्या...
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...
गोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...
पेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...
नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून २८...नांदेड : जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत...
पुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे  : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...
`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई   : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...
नवती केळी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
युवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करारपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
महाराष्ट्राला ‘स्किल कॅपिटल' बनवावेः...मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम...
कोकण, घाटमाथ्यावर हलक्या सरींचा अंदाज पुणे ः  उत्तर भारतामध्ये असलेल्या कमी...
तीन हजार शेतकऱ्यांच्या मूल्यांकनाचा...कोल्हापूर ः कृषी कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण...
सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे...सांगली : जिल्ह्यातील एक हजारांवर द्राक्ष उत्पादक...