Agriculture news in marathi;Due to lack of rain in Varadha market, Shuksukkat | Agrowon

वऱ्हाडातील बाजारपेठेत पावसाअभावी शुकशुकाट
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 18 जून 2019

अकोला ः  खरीप तोंडावर आलेला असतानाही बाजारपेठांमध्ये शुकशुकाट आहे. कुठेच फारशी हालचाल नाही. शेतकऱ्यांजवळही बी-बियाणे, खते खरेदीसाठी पैसा नाही. कुणी पीकविम्याच्या मदतीची तर कुणी पीक कर्ज हातात पडण्याची प्रतीक्षा करीत आहे. त्यातच पाऊसही लांबत असल्याने चिंतेचे ढग वाढू लागले आहेत. 

अकोला ः  खरीप तोंडावर आलेला असतानाही बाजारपेठांमध्ये शुकशुकाट आहे. कुठेच फारशी हालचाल नाही. शेतकऱ्यांजवळही बी-बियाणे, खते खरेदीसाठी पैसा नाही. कुणी पीकविम्याच्या मदतीची तर कुणी पीक कर्ज हातात पडण्याची प्रतीक्षा करीत आहे. त्यातच पाऊसही लांबत असल्याने चिंतेचे ढग वाढू लागले आहेत. 

वऱ्हाडात अकोला, बुलडाणा जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. बुलडाणा जिल्हा तर काही वर्षे सलग दुष्काळात होरपळत आहे. अर्धा जून महिना लोटला, तरी पाऊस नसल्याने उलाढाल ठप्प पडलेली आहे. शेतकऱ्यांनी शेतीची मशागत करून ठेवली असून प्रत्येक जण पावसाची प्रतीक्षा करीत थांबला आहे. वऱ्हाडातील तीनही जिल्ह्यांमध्ये पीककर्ज वाटपाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. बुलडाणा जिल्ह्यात सरासरी १० टक्केही पीककर्ज वाटप अद्याप झालेले नाही. अकोला, वाशीममध्येही उद्दिष्टाच्या २५ टक्क्यांपर्यंत पीककर्ज वाटप पोचलेले नाही. 

सध्या सर्वच कृषी केंद्रांमध्ये बी-बियाणे, रासायनिक खते मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. विक्रेत्यांनी कोट्यवधींचा माल साठवून ठेवलेला आहे, तर शेतकरी या महिनाअखेरपर्यंत तरी पीककर्ज मिळेल अशी अपेक्षा बाळगून आहे. 
पाऊस अधिक लांबत गेल्यास पेरणी नियोजन बदलण्याची चिन्हे अधिक आहेत. प्रामुख्याने या विभागाचे मुख्य पीक असलेल्या सोयाबीनच्या लागवड क्षेत्रावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. असे झाले तर विक्रेत्यांना मोठी झळ सहन करावी लागू शकते. 

जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून सतत दुष्काळ आहे. या वषी पीकविमा जाहीर झाला मात्र, तो हेक्टरी अवघा पाच हजार रुपयांपर्यंत मिळत आहे. सरसकट सर्वच शेतकऱ्यांना हा विमा मिळालेला नाही. पीककर्जासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करीत आहोत. वेळेत आर्थिक मदत न झाल्यास अनेकांसमोर पेरणी कशी करावी, हा प्रश्न उभा आहे. 
- श्रीकृष्ण ढगे, शेतकरी, वरवट बकाल, जि. बुलडाणा. 

बाजारपेठेत सध्या शांतता आहे. काहीच खरेदी होत नाही. थोडीबहुत जी बियाणे खरेदी आहे ती कपाशी बियाण्याची होत आहे. पाऊस लांबत असल्याने सोयाबीन लागवडीकडे कल कमी होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना भेडसावत असलेली आर्थिक टंचाई हेसुद्धा खरेदी न होण्याचे कारण आहे. सध्या सर्वच कृषी विक्रेते बसून आहेत. ना बियाण्याची विक्री सुरू आहे ना खताची विक्री होत आहे. कृषी केंद्रचालकांनी सर्वच बी-बियाणे, खतांचा साठा केलेला असून मालाची उचल नसल्याने हा पैसा अडकून पडला आहे. व्यवहार ठप्प झालेले आहेत. 
- मोहन सोनोने, कार्याध्यक्ष, कृषी व्यावसायिक संघटना, अकोला.

इतर बातम्या
नांदेड, परभणी, हिंगोलीत पाऊसनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २८...
सांगली जिल्ह्यातील ४६८ गावांमधील...सांगली  : जिल्ह्यात ४६८ गावांमधील गावठाणांचा...
यवतमाळ जिल्ह्यातील सात दुष्काळग्रस्त...यवतमाळ ः जनरेट्यामुळे दुष्काळ यादीत नव्याने...
लातूर, उस्मानाबाद, जालना, बीड...लातूर : लातूर, उस्मानाबाद, जालना आणि बीड...
अकोला जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअकोला ः पावसाचा खंड आणि त्यातच दिवसाचे...
जलसंधारण कामासाठी जलशक्ती योजना :...वाल्हे, जि. पुणे  : राज्यात जलयुक्त...
अनधिकृत बंधारे काढण्यासाठी ‘स्वाभिमानी’...नगर  : भंडारदरा धरणापासून ते ओझर...
बचत गटांना प्रोत्साहनासाठी ‘हिरकणी...सोलापूर  : राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक...
केरळच्या धर्तीवर काजू प्रक्रिया ...रत्नागिरी  ः परदेशी चलन मिळवून देणाऱ्या काजू...
`गोकुळ` मल्टिस्टेटमुळे शेतकऱ्यांचा...मुंबई : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
संगमनेर तालुक्यातील लिंबू बागांना घरघर संगमनेर, जि. नगर : दर्जेदार कागदी लिंबांच्या...
दूध वाहतुकीतून रेल्वेला ६ कोटी १२ लाख...दौंड, जि. पुणे  : दौंड रेल्वे स्थानकावरून...
कृषक विकिरण केंद्रातून अमेरिका, ...नाशिक  : जिल्ह्यातील लासलगाव येथील कृषक...
आसाम, बिहारमध्ये पुराचे ११४ बळीनवी दिल्ली: आसाम आणि बिहारमध्ये पुराचे थैमान...
सौरऊर्जेमुळे शेतकऱ्यांना मुबलक वीज...कोल्हापूर ः शेतकऱ्यांना दिवसा व उद्योगांना स्वस्त...
परीक्षा शुल्क परतीचा खर्च सात लाख रुपयेयवतमाळ ः परीक्षा रद्द झाल्यानंतर उमेदवारांचे पैसे...
दुबार पेरणीसाठी सरकारची तयारीः डाॅ....पुणे: पावसाचा काही प्रमाणात खंड पडला आहे....
डोणगावात होणार खजूर लागवडअकोला ः पारंपरिक पिकांना पर्याय शोधण्यासाठी...
रक्तक्षय दूर करण्यासाठी लोहयुक्त तांदूळनाशिक : दैनंदिन आहारातून अत्यल्प प्रमाणात लोह...
असंमत बियाणे लागवडीला बोंडअळी कारणीभूत...नवी दिल्ली : देशात २०१८ मध्ये गुलाबी...