Agriculture news in marathi;Due to poor construction, the dam was demolished | Agrowon

निकृष्ट बांधकामामुळे साकोऱ्यातील बंधारा फुटला

टीम अॅग्रोवन
रविवार, 18 ऑगस्ट 2019

नाशिक : नांदगाव तालुक्यातील साकोरा येथे पांझण नदीवर वाघदरा वस्तीजवळ लोकवर्गणीतून बांधलेल्या बंधाऱ्याची भिंत ढासळल्याने पाणीगळती झाल्याने बंधारा फुटला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बंधाऱ्याच्या बांधकामासाठी लोकवर्गणीतून केलेला लाखो रुपयांचा खर्च वाया गेला आहे. 

नाशिक : नांदगाव तालुक्यातील साकोरा येथे पांझण नदीवर वाघदरा वस्तीजवळ लोकवर्गणीतून बांधलेल्या बंधाऱ्याची भिंत ढासळल्याने पाणीगळती झाल्याने बंधारा फुटला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बंधाऱ्याच्या बांधकामासाठी लोकवर्गणीतून केलेला लाखो रुपयांचा खर्च वाया गेला आहे. 

सन २०१० मध्ये या परिसरातील २० शेतकऱ्यांनी एकत्रित येत येथे बंधाऱ्याच्या मंजुरीसाठी ८० हजार रुपये जमा केले होते. त्यात आमदार निधीतून ३० लाख रुपये खर्च करून कोल्हापूर टाइप १३ फूट उंचीचा बंधारा बांधण्यात आला. याचा फायदा थेट शेतकऱ्यांना होऊन सिंचनासाठी तो उपयुक्त ठरला. गेल्या दोन वर्षांपूर्वी पडलेला दुष्काळ व पाण्याची वाढलेली मागणी, याचा विचार करून पुन्हा २०१६ मध्ये येथील २० शेतकऱ्यांनी एकत्र येऊन प्रत्येकी दोन लाख रुपये एकूण ४० लाख रुपये जमा केले.

या लोकवर्गणीतून तब्बल ३२ फूट उंचीच्या बंधाऱ्याचे काम केले. त्यामुळे पाणीसाठ्यात वाढ झाली. त्यामुळे नवीन येथील शेतकाऱ्यांसाठी ही बाब फायदेशीर होती. मात्र, हे केलेले काम निकृष्ट झाल्याने बंधारा फुटला. परिणामी, केलेला खर्च व साचलेले पाणी वाहून गेले आहे. त्यामुळे बंधाऱ्यांचे झालेले काम तंत्रशुद्ध व बांधकामाचे निकष न पाळता केल्यामुळे बंधारा फुटण्याचा प्रकार घडल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.


इतर ताज्या घडामोडी
नगर झेडपीची पहिल्यांदाच झाली लेखी...नगर : कोरोनामुळे लॉकडाउन असल्याने जिल्हा...
पिचकारी मारणाऱ्यांवर आता दंडात्मक...नगर : सार्वजनिक ठिकाणी पिचकारी मारणाऱ्यांवर...
'दोन वर्षांपर्यंतचे शेतकऱ्यांचे...नगर, : कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांत गंभीर...
पुणे बाजार समितीत भाजीपाला, फळ विभाग...पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव बाजार समितीलगतच्या...
टोळधाड निर्मूलनासाठी कृषी विभागाचा...नगर : महाराष्ट्रात चार दिवसांपूर्वी टोळधाड...
नाशिक बाजार समितीचे कामकाज आजपासून सुरूनाशिक : स्वच्छता व निर्जंतुकीकरण प्रक्रिया...
जळगाव ‘झेडपी’चे कामकाज रुळावर जळगाव : जिल्हा परिषदेचे कामकाज रुळावर येत आहे....
औरंगाबादमध्ये थेट फळे, भाजीपाला...औरंगाबाद : जिल्ह्यातील शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी...
जळगावात पीककर्जासाठी बॅंका पोटखराब...जळगाव : पीक किंवा शेती कर्ज देताना पोटखराब...
परभणी जिल्ह्यात कापूस विक्रीची दुबार...परभणी : भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) आणि कापूस...
यवतमाळ जिल्ह्यात ५० लाख क्विंटल कापसाची...यवतमाळ : जिल्ह्यात वैध नोंदणी केलेल्या...
रब्बी मका पाहून उताऱ्यावर नोंद करणार :...येवला : शासकीय हमीभावाने मका खरेदीसाठी रब्बी...
खारपाण पट्ट्यातील उत्पादकता वाढ याविषयी...अकोला ः राज्य शासन व जागतिक बँकेच्या...
यवतमाळमध्ये साडेचार लाख हेक्‍टरवर कपाशी...यवतमाळ : जिल्ह्यात खरीप हंगामात यंदा नऊ लाख हेक्‍...
यवतमाळ जिल्ह्यातील भूजल पातळी...यवतमाळ : गेल्यावर्षी झालेला पाऊस, कोरोनामुळे...
आंबेओहळ प्रकल्पासाठी निधीची मागणी कोल्हापूर : उत्तूरसह परिसरातील जवळपास २२हून अधिक...
नीरा उजव्या कालव्यावरील पिके करपली लवंग, जि. सोलापूर ः भाटघर, वीर, नीरा-देवधर ही...
चारा छावण्यांच्या धर्तीवर क्वारंटाइन,...सोलापूर ः चारा छावणीच्या धर्तीवर संस्थांच्या...
पशुचिकित्सा शिबिरे रद्द, जनावरांच्या...कोल्हापूर : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी गेली दोन...
पॉप्युलर स्टिलचे दिलीप जाधव यांचे निधन कोल्हापूर : पश्‍चिम महाराष्ट्राच्या उद्योग...