Agriculture news in marathi;During the Ashadhi ware, the government's Mahapuja will be reduced by half an hour | Agrowon

आषाढी वारीत शासकीय महापूजेचा वेळ अर्ध्या तासाने कमी होणार
टीम अॅग्रोवन
रविवार, 23 जून 2019

सोलापूर : आषाढी एकादशी दिवशीची श्री विठ्ठल-रुक्‍मिणीची पाद्यपूजा व मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणारी शासकीय महापूजा एकाच वेळी घेण्याचा विचार सुरू आहे. यामुळे पूजेसाठी लागणारा कालावधी किमान अर्ध्या तासाने कमी होईल, अशी माहिती पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पंढरपुरात दिली. या निर्णयामुळे वारकऱ्यांना दर्शनासाठी अर्धा-पाऊण तासाचा जादा वेळ मिळणार आहे.

सोलापूर : आषाढी एकादशी दिवशीची श्री विठ्ठल-रुक्‍मिणीची पाद्यपूजा व मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणारी शासकीय महापूजा एकाच वेळी घेण्याचा विचार सुरू आहे. यामुळे पूजेसाठी लागणारा कालावधी किमान अर्ध्या तासाने कमी होईल, अशी माहिती पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पंढरपुरात दिली. या निर्णयामुळे वारकऱ्यांना दर्शनासाठी अर्धा-पाऊण तासाचा जादा वेळ मिळणार आहे.

आषाढी यात्रा नियोजनासाठी पंढरपुरातील येथील विश्रामगृहात शासकीय अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. या वेळी विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, सोलापूर ग्रामीण पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, प्रांताधिकारी सचिन ढोले, तहसीलदार मधुसूदन बर्गे आदी उपस्थित होते. 

डॉ. म्हैसेकर म्हणाले, दरवर्षी आषाढी एकादशी दिवशीची विठ्ठल-रुक्‍मिणीची पाद्यपूजा व मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणारी महापूजा वेगवेगळी केली जाते. या वर्षी प्रशासनाने सुचविलेल्या बदलानुसार विठ्ठल-रुक्‍मिणीची एकावेळी महापूजा केली जाणार आहे. महापूजा स्वतंत्र केल्यास अधिक वेळ लागतो. त्यामुळे प्रशासनाने महापूजेसाठी लागणारा वेळ कमी करण्यासाठी हा बदल सुचवला आहे.

यंदाची आषाढी वारी ही "पर्यावरणपूरक वारी" करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याप्रमाणे सर्व शासकीय विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. या वर्षी संत तुकाराम पालखी मार्गावर ६००, तर संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी मार्गावर ७०० स्वच्छतागृहे उपलब्ध करून दिली जाणार आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था, फेरीवाल्यांचे अतिक्रमण, वाळवंटातील वाळूचोरी, नदीपात्रातील पाणीपातळी याविषयी अधिक लक्ष घालून संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने त्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्याचे म्हैसेकर यांनी नमूद केले.
 

इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...
पावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...
पशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर  : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...
मराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
विद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...
बारामतीत मुसळधार पाऊसपुणे  : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...
नगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...
कोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद   : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...
विधानसभा निवडणुकीत महायुतीने  २२० जागा...मुंबई  : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...
सोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...
नाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...
मराठवाड्यात ४१ हजार हेक्टरवरील मक्यावर...औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने औरंगाबाद व जालना...
सांगली जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीने...सांगली ः जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा...
लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगर...नगर   ः गेल्या वर्षभरात दुष्काळाशी...
मोताळा, देऊळगावराजा तालुक्यात शंभर...बुलडाणा : खरिपात विदर्भात मका उत्पादनात...
साताऱ्यात अकराशे हेक्टरवरील मका पिकावर...सातारा : जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाची...
इंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर...पुणे   ः गेल्या काही दिवसांपासून...
गुलटेकडीत टोमॅटोचे आवकेसह दरही वाढलेपुणे ः गेल्या आठ दिवसांत पावसाने दिलेल्या...
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत पाऊसऔरंगाबाद / जालना : औरंगाबाद, जालना या दोन...
सोलापुरातील कांदा उत्पादकांच्या...सोलापूर : राज्यातील कांदा उत्पादक...