अकोल्यात अकरा कोटींच्या निविष्ठा पोचविल्या बांधावर

अकोला ः आगामी हंगामासाठी शेतकऱ्यांना बांधावर निविष्‍ठा पोचविण्याचे काम शेतकरी गटांमार्फत केले जात आहे. ही चळवळ जोमाने सुरू झाली असून आत्तापर्यंत ११ कोटी १७ लाख ५८४० रुपयांच्या निविष्ठा थेट बांधावर पोचविण्यात आल्या आहेत.
Eleven crore agricultural inputs delivered to the dam in Akola
Eleven crore agricultural inputs delivered to the dam in Akola

अकोला ः आगामी हंगामासाठी शेतकऱ्यांना बांधावर निविष्‍ठा पोचविण्याचे काम शेतकरी गटांमार्फत केले जात आहे. ही चळवळ जोमाने सुरू झाली असून आत्तापर्यंत ११ कोटी १७ लाख ५८४० रुपयांच्या निविष्ठा थेट बांधावर पोचविण्यात आल्या आहेत.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शेतकरी गटांकडून थेट निविष्ठा पोचविण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांना कृषी केंद्रावर जाण्याची आवश्‍यकता पडू नये या हेतूने हा उपक्रम जोमाने सुरू करण्यात आला. कृषी विभागाच्या आत्मा अंतर्गत जिल्ह्यात स्थापित करण्यात आलेले शेतकरी गट या चळवळीचे केंद्रबिंदू ठरले आहेत. हे गट आता शेतीच्या उत्पादन ते विक्री ही साखळी विकसित करीत आहेत.

जिल्ह्यातील २५३ शेतकरी गटांनी आत्तापर्यंत ११ हजार २६२ शेतकऱ्यांना त्यांच्या घरपोच चार कोटी ५१ लाख १४ हजार ६१५ रुपये किमतीचे २७३३.७८ टन खते पोहोच केले. तसेच सहा कोटी ६५ लाख ९१ हजार २२५ रुपये किमतीचे ८९२७.५ क्विंटल बियाणेसुद्धा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले. असे आत्तापर्यंत एकूण ११ कोटी १७ लाख पाच हजार ८४० रुपयांच्या कृषी निविष्ठा पोचविण्यात आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ यांनी दिली.

दहा कोटींचा शेतमालही विकला जिल्ह्यातील शेतकरी गटांनी याच लॉकडाऊनच्या काळात तब्बल १० कोटी २९ लाख रुपयांची उलाढाल करुन कृषी उत्पादित माल हा ग्राहकांपर्यंत पोहोचला. या शेतकरी गटांनी जिल्ह्यात ७२८ टन, जिल्ह्याबाहेर २२४५ टन तर परराज्यात १८८५ टन इतका शेतमाल पाठवला. या मालाची किंमत १० कोटी २९ लाख रुपये इतकी झाली आहे. या मालाच्या विक्रीसाठी जिल्ह्यात ९३ ठिकाणी थेट विक्रीची केंद्र सुरू करण्यात आली आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com