agriculture news in marathi,evm, vivipat machine problems, jalgaon, maharashtra | Agrowon

जळगाव, पुणे जिल्ह्यात ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशिन पडल्या होत्या बंद
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019

जळगाव  ः जिल्ह्यात सोमवारी मतदानाच्या दिवशी १४ ईव्हीएम मशिन, १४ कंट्रोल युनिट, तर ६६ ठिकाणी व्हीव्हीपॅट मशिन बंद पडल्याने काही वेळ मतदान बंद पडले होते. लागलीच रिझर्व्ह असलेले ईव्हीएम मशिन, कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट मशिन बदलण्यात आले आहेत. बंद पडलेल्या काळात मतदान केंद्रांवर फारशी गर्दी नसल्याने मतदारांना अधिक वेळ वाट पाहावी लागली नसल्याची माहिती निवडणूक उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे यांनी दिली. 

जळगाव  ः जिल्ह्यात सोमवारी मतदानाच्या दिवशी १४ ईव्हीएम मशिन, १४ कंट्रोल युनिट, तर ६६ ठिकाणी व्हीव्हीपॅट मशिन बंद पडल्याने काही वेळ मतदान बंद पडले होते. लागलीच रिझर्व्ह असलेले ईव्हीएम मशिन, कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट मशिन बदलण्यात आले आहेत. बंद पडलेल्या काळात मतदान केंद्रांवर फारशी गर्दी नसल्याने मतदारांना अधिक वेळ वाट पाहावी लागली नसल्याची माहिती निवडणूक उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे यांनी दिली. 

सर्वांत अगोदर रावेर मतदारसंघात काही मशिन बंद पडल्याच्या घटना घडल्या. नंतर तांत्रिक अडचणीमुळे मशिन बंद झाल्याचे प्रकार घडले. मात्र लागलीच ईव्हीएम मशिन, कंट्रोल युनिट, व्हीव्हीपॅट मशिन बदलून देण्यात आले. 

खानापुरातील केंद्रात व्हीव्हीपॅट पडले बंद 
दरम्यान, पुणे जिल्ह्यातील खानापूर (ता. भोर) येथील मतदान केंद्रातील व्हीव्हीपॅट मशिन बंद पडल्याने मतदारांच्या रांगा लागल्या. प्रशासनाने त्वरित हालचाली करून पंधरा मिनिटांमध्ये नवीन व्हीव्हीपॅट मशिन बसविले आणि मतदान प्रक्रिया पुन्हा सुरू केली. 

उरळगावात ईव्हीएम मशीन पडले बंद
शिरूर तालुक्‍याच्या पूर्व भागातील उरळगावात एक तास ईव्हीएम मशिन बंद पडल्याने नागरिकांना एक तास ताटकळत बसावे लागले. नवीन ईव्हीएम मशिन आणल्यानंतर एक तासाने मतदान सुरू झाले. 

इतर ताज्या घडामोडी
पेरणीपूर्व मशागतीय पद्धतीने करा...रब्बी हंगामात ज्वारी, गहू, हरभरा, करडई व सूर्यफूल...
कांदा पिकासाठी संतुलित अन्नद्रव्य...कांदा उत्पादकता कमी होण्यासाठी असंतुलित खत...
जळगाव जिल्हा परिषदेत निधीवाटपावरून आरोप...जळगाव : जिल्हा परिषद सेस फंड, शिक्षण, महिला-...
वऱ्हाडला पीक नुकसानभरपाईचा २६५ कोटींचा...अकोला : ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिपावसाचा फटका...
पुणे विभागात रब्बीसाठी अडीच लाख टन खते...पुणे : रब्बी हंगामात शेतकऱ्यांना खतांची अडचण येऊ...
सांगली जिल्ह्यात भूजल पातळी ५८...सांगली : जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांपेक्षा यंदा...
नाशिक : भिजलेल्या पिकांमुळे चाऱ्याचा...नाशिक : जिल्ह्यात झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसाने...
धक्कादायक, एकाच गावातल्या ६०० मेंढ्या...नगर  ः मागील महिन्यात अतिवृष्टीने पारनेर...
अधिक उपसा केला तर पाणी टंचाईची शक्यता...लातूर : जिल्ह्यात पावसाळ्याच्या चारही महिन्यांत...
नाशिक जिल्ह्यात नुकसानीपोटी १८१ कोटींची...नाशिक : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे...
नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी कॉंग्रेस...नागपूर : मॉन्सूनोत्तर पावसामुळे शेतकऱ्यांना...
नाशिक जिल्ह्यात टोमॅटोला गेले तडे ! ५०...नाशिक  : मॉन्सूनोत्तर पावसाच्या तडाख्यामुळे...
...'या' सिंचन योजनेची पाणीपट्टी होणार...सांगली : ताकारी उपसा सिंचन योजनेच्या पाणीपट्टीची...
किसान सभेकडून विमा कंपनीला २८...पुणे : पुण्यातील दि ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीकडून...
हैबतबाबांच्या पायरीपूजनाने आळंदीत...आळंदी, जि. पुणे  ः टाळ-मृदंगाचा निनाद आणि...
गूळ सौदे सुरू करण्यासाठी दोन्ही घटकांना...कोल्हापूर  : गेल्या दोन दिवसांपासून व्यापारी...
सांगली जिल्ह्यात ऊस दरासाठी ‘स्वाभिमानी...सांगली : जिल्ह्यात गळीत हंगाम सुरू होताच...
कोल्हापुरात कारखान्यांकडून ऊसतोड सुरू...कोल्हापूर  : गेल्या चार दिवसांपासून...
जळगावात भरताची वांगी १५०० ते २६०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (...
बटाटा, टोमॅटोतील उशिरा येणाऱ्या करपा...बटाटा आणि टोमॅटो यांसारख्या पिकांमध्ये प्रचंड...