‘पशुसंवर्धन’ची उद्या होणारी परीक्षा स्थगित

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नागपूर ः राज्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर पशुसंवर्धन विभागाच्या वतीने शनिवारी (ता. १०) होणाऱ्या पशुधन पर्यवेक्षक (गट-क) आणि परिचर (गट-ड) या संवर्गातील परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. महापरीक्षा, महाआयटी यांच्या वतीने ही प्रक्रिया राबविण्यात येणार होती. 

राज्यात अतिवृष्टीमुळे कोल्हापूर, सांगली, सातारा व पुणे परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले असून, पूरग्रस्त जिल्ह्यातील परिवहन व्यवस्था व इंटरनेट सेवा विस्कळित झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यातील काही भागांत आणखी काही दिवस अतिवृष्टी होण्याची शक्‍यता आहे. अशा परिस्थितीत परीक्षा घेतल्यास अनेकांना परीक्षेपासून वंचित राहण्याची वेळ येणार आहे.

त्या पार्श्‍वभूमीवर कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाचे अवर सचिव विकास कदम यांनी परीक्षा तात्पुरती स्थगित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. स्थगित केलेल्या परीक्षा १९ ऑगस्टपासून घ्याव्यात, असे सांगण्यात आले असून, नव्याने वेळापत्रक तयार करून उमेदवारांना कळविण्याबाबत निर्देश दिले आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com