agriculture news in Marathi,export contract onion gave permission , Maharashtra | Page 2 ||| Agrowon

सीमेवरील कांदा निर्यातीस अखेर परवानगी

टीम अॅग्रोवन
रविवार, 6 ऑक्टोबर 2019

नाशिक  : कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा निर्यात बंदी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनतर या निर्णयाची तत्काळ कार्यवाही झाल्याने भारत-बांगलादेश सीमेवर पुढे जाणारा निर्यात कांदा अडकून पडला होता.  यावर तोडगा निघाल्याने काही दिवसांपासून भारत-बांगलादेशाच्या सीमेवर अडकून पडलेले कांद्याचे ट्रक शुक्रवार (ता. ४) रवाना करण्यात आले. 

नाशिक  : कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा निर्यात बंदी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनतर या निर्णयाची तत्काळ कार्यवाही झाल्याने भारत-बांगलादेश सीमेवर पुढे जाणारा निर्यात कांदा अडकून पडला होता.  यावर तोडगा निघाल्याने काही दिवसांपासून भारत-बांगलादेशाच्या सीमेवर अडकून पडलेले कांद्याचे ट्रक शुक्रवार (ता. ४) रवाना करण्यात आले. 

निर्यात बंदीचा निर्णय होण्यापूर्वी राज्यातील अनेक कांदा व्यापाऱ्यांनी निर्यातीच्या ऑर्डर घेतल्या होत्या. त्यासंबंधीच्या सर्व शासकीय कागदपत्रांची पूर्तता करून माल पुढे पाठविण्यात आला. मात्र, कांदा निर्याती बंदीच्या तत्काळ कारवाईमुळे तो माल पुढे जाऊ देण्यास बंदी आणली होती. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा कांदा सीमेवर अडकून होता. याठिकाणी २०० हून अधिक ट्रकमध्ये माल होता. 

अनेक व्यापाऱ्यांनी बाहेर देशातील आयतदारांकडून मागणी नोंदवून घेत त्या बदल्यात आगाऊ पैसे घेतले होते. त्यामुळे ऑर्डरनुसार कांदा पाठविण्यात आला होता. मात्र, कांदा निर्यात बंदीच्या तत्काळ निर्णयानंतर कांदा भारत-बांगलादेशच्या सीमेवर अडकून पडला होता. याबाबत कांदा व्यापाऱ्यांनी धसका घेतला होता. कांदा खराब होण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. मात्र, कांदा काही प्रमाणात खराब झाला असे व्यापाऱ्यांचे म्हणणे होते. 

या सर्व घडामोडीनंतर कांदा उत्पादक व व्यापाऱ्यांनी दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ. भारती पवार व भाजपचे वरिष्ठ नेते सुरेश पाटील यांची भेट घेऊन यासंदर्भात त्यानुसार तातडीने मार्ग काढण्याची विनंती केली. खासदार डॉ. भारती पवार यांनी गांभीर्य समजून तातडीने केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याकडे कांदा उत्पादक व व्यापाऱ्यांची अडचण मांडली. त्यानुसार सर्व बाजू लक्षात घेत वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी भारत बंगाल सीमेवर उभ्या असलेल्या कांद्याचे ट्रक तत्काळ पुढे निर्यातीकरिता सोडण्याबाबत संबंधिताना आदेश दिले. 

मोठे नुकसान टळले
जर कांदा पुढे गेला नसता तर तो मोठ्या प्रमाणावर खराब होण्याची भीती होती. त्यात तेजीत घेतलेली ऑर्डर रद्द होऊन माल व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले असते. मात्र, आता व्यापारी या अडचणीतून बाहेर आल्याने त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे.


इतर अॅग्रो विशेष
मॉन्सून मालदिवात दाखल; १ जूनलाच केरळात...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) सोमवारपर्यंत...
भारतीय किसान संघामार्फत शेतकऱ्यांनी...कोल्हापूर: भारतीय किसान संघाने लॉकडाउनच्या काळात...
लॉकाडाउनमध्येही शेतकऱ्यांकडून शेतमालाची...पुणे (प्रतिनिधी)ः कोरोना टाळेबंदी मध्ये शेतमालाची...
खानदेशात साठा वाढल्याने कापूस, सरकी...जळगाव : कापसाची शासकीय खरेदी खानदेशात मागील ६ मे...
राज्यातील २८० बाजार समित्या अडचणीत;...लातूर ः राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा...
उष्णतेच्या लाटेमुळे अकोल्यात केळीचे घड...अकोला  ः जिल्ह्यात या आठवड्यात वाढलेल्या...
विदर्भात टोळधाडीची दहशत कायम;...नागपूर ः अमरावती जिल्ह्यातील पुसला गावातून...
राजस्थानातील चुरूत ५० अंशांवर तापमान;...पुणे  : सूर्य अक्षरश: आग ओकत असल्याने...
मॉन्सून ४८ तासांमध्ये दक्षिण अरबी...पुणे  : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
एसटीव्दारे शेतीमाल वाहतूक सुरु...पुणे  ः ‘कोरोना’मुळे महाराष्ट्र राज्य परिवहन...
तंत्रज्ञान आत्मसात करीत प्रयोगशील शेतीत...अकोला जिल्ह्यातील आस्टुल येथील संतोष घुगे यांनी...
मॉन्सूनची अंदमानात चाल;...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बुधवारी...
कापूस उत्पादनात २४ लाख गाठींनी घट शक्यजळगाव ः देशात कापसाच्या उत्पादनात सुमारे २४ लाख...
टोळधाडीकडून भाजीपाल्याचे सर्वाधिक...नागपूर : राजस्थान, मध्यप्रदेशनंतर टोळधाडीचा...
उन्हाच्या झळांनी काहीली वाढली पुणे : सुर्य चांगलाच तळपत असल्याने...
केळी ‘रायपनिंग चेंबर’ व्यवसाय झाला पूरक...सातारा जिल्ह्यातील अनवडी (ता. वाई) येथील प्रवीण...
अंदमानात उद्या मॉन्सूनची प्रगती शक्य पुणे: बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘अम्फान’...