हिंगोली ः जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात ३ लाख ५८ हजार ४०३ हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे.
ताज्या घडामोडी
बुलडाण्यातील मका उत्पादकांसमोर संकट अमेरिकन लष्करी अळीचे
वऱ्हाडात बुलडाणा जिल्ह्यात खरीप; तसेच रब्बीत हजारो हेक्टरवर मक्याचे पीक घेतले जाते. या शेतकऱ्यांना अमेरिकन लष्करी अळीमुळे हे पीक पेरावे की नाही, असा पेच निर्माण झाला आहे. रब्बीत आमच्या धाड भागातील अनेक शेतकऱ्यांना मक्यावरील लष्करी अळीमुळे नुकसान सहन करावे लागले. काहींसमोर पीक उपटून टाकण्याची स्थिती निर्माण झाली होती.
- राजू बैरागी, शेतकरी, धाड, जि. बुलडाणा.
बुलडाणा ः यंदाच्या रब्बीत मका उत्पादकांना अमेरिकन लष्करी अळीने (स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा) फटका दिला आहे. यामुळे आगामी काळात बुलडाणा जिल्ह्यात घाटावरील तालुक्यांमधील शेतकऱ्यांपुढे मक्याचे पीक पेरावे की नाही, असा पेच उभा ठाकला आहे; तर दुसरीकडे सध्या उन्हाळी लागवड असलेल्या काही शेतांमध्ये ही अळी आढळून आलेली आहे. बुलडाणा जिल्ह्यात रब्बीत प्रामुख्याने मराठवाडा, खानदेशला लागून असलेल्या सीमावर्ती गावांमध्ये मका पिकावर या अळीचा प्रादुर्भाव दिसून आला होता.
बुलडाणा तालुक्यातील धाड, जामठी या परिसरात दरवर्षी हजारो हेक्टरवर रब्बीत मका पेरला जातो. या वर्षातही शेतकऱ्यांनी रब्बीत मका पेरणी केली होती. मात्र पहिल्यांदाच अमेरिकन लष्करी अळीचा सामना या शेतकऱ्यांना करावा लागला. अळीच्या प्रादुर्भावामुळे अनेक शेतकऱ्यांचा लागवड खर्चही निघाला नसल्याचे आता समोर आले आहे. प्रशासनाने या अळीच्या अनुषंगाने कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांची प्रक्षेत्रांना भेट घडवून आणली होती. अळी नियंत्रणासाठी उपाययोजना सांगण्यात आल्या; परंतु शेतकऱ्यांनी प्रयत्न करूनही फारसा फायदा झाला नव्हता.
आता उन्हाळ्यातील लागवडीवर या अळीचा प्रादुर्भाव; तसेच दुष्काळी परिस्थितीचा परिणाम झाला आहे. यंदा केवळ २७५ हेक्टरवर उन्हाळी मक्याची लागवड झाली. आता उन्हाळी मक्याची लागवड झालेल्या क्षेत्रावर या अळीचा प्रादुर्भाव तितकासा नसल्याचा दावा यंत्रणा करीत आहेत.
बुलडाणा जिल्ह्यात धाड व इतर भागातील मका पिकावर मोठ्या प्रमाणात या अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे रब्बीत दिसून आले होते. या प्रादुर्भावानंतर तातडीने विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी पाहणी करीत मार्गदर्शन केले. या अळीचा प्रथमच मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्याचे शेतकरी सांगत होते, असे कृषी संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ डॉ. सी. पी. जायभाये यांनी सांगितले.
रब्बीत लागवड झालेल्या मक्याच्या २०० हेक्टर क्षेत्रात तुरळक ठिकाणी अमेरिकन अळीचा प्रादुर्भाव दिसून आला होता. तेव्हा डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी भेटही दिली. त्यानंतर ही अळी नियंत्रणातही आली होती. सध्या जिल्ह्यात मक्याचे पीक फारसे पेरले गेलेले नाही, अशी माहिती बुलडाणा जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक यांनी दिली.
- 1 of 1099
- ››