agriculture news in Marathi,farm visit started of dr. panjabrav deshmukh agricultural University, Maharashtra | Agrowon

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शिवारफेरीला प्रारंभ

टीम अॅग्रोवन
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

विद्यापीठात सुरू असलेले नवनवीन संशोधन, वाण, तंत्र, यंत्राची माहिती घेण्यासाठी शेतकऱ्यांना ही सुवर्णसंधी चालून आलेली आहे. सामान्य शेतकरी डोळ्यांसमोर ठेवत विद्यापीठाचे संशोधन होत असते. ते प्रत्यक्ष बघण्यास या ठिकाणी मिळू शकते. विदर्भातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने या शिवारफेरीत सहभागी झाले तर त्याचा फायदा निश्चित होऊ शकेल.
- डॉ. व्ही. एम. भाले, कुलगुरू, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला

अकोला  ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात दरवर्षी होणाऱ्या तीनदिवसीय शिवारफेरीला मंगळवारी (ता. ५) सुरवात झाली. कुलगुरू डॉ. विलास भाले आणि शिवारफेरीसाठी प्रथम नोंदणी करणारे शेतकरी वासुदेव राऊत (रा. कौलखेड) व महिला शेतकरी दुर्गाताई टावरी( तेल्हारा) यांच्या हस्ते फीत कापून उद्‍घाटन झाले. 

विदर्भातील शेतकऱ्यांसाठी ही शिवारफेरी नवीन तंत्र, यंत्र, वाण, संशोधनाची माहिती देणारी असते. विधानसभा निवडणूक आचारसंहितेच्या कारणामुळे  ऑक्टोबरमध्ये घेतली जाणारी ही शिवारफेरी या वर्षी आता ५ ते ७ नोव्हेंबरदरम्यान होत आहे. दररोज सकाळी शिवारफेरीमध्ये प्रक्षेत्र भेट आणि दुपारी ४ ते ५ दरम्यान कृषी महाविद्यालयाच्या डॉ. के. आर. ठाकरे सभागृहात चर्चासत्र असे कार्यक्रमाचे स्वरूप आहे. 

शिवारफेरीच्या उद्‍घाटन कार्यक्रमाला विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य गणेश कंडारकर, प्रगतिशील शेतकरी अप्पाजी गुंजकर, शेतकरी कीर्तनकार महादेवराव भुईभार, मोहन जगताप, नामदेवराव अढाऊ, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रकाश कडू, संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, शिक्षण विस्तार संचालक डॉ. दिलीप मानकर, कृषी अभियांत्रिकी अधिष्ठाता डॉ. महेंद्रे नागदेवे, उद्यानविद्या अधिष्ठाता डॉ. प्रकाश नागरे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. डी. बी. उंदीरवाडे, डॉ. ययाती तायडे यांच्यासह विभागप्रमुख, प्राध्यापक उपस्थित होते. शिवारफेरीच्या पहिल्या दिवशी अकोल्यासह बुलडाणा, वाशीम आणि अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समावेश होता. 

शिवारफेरीच्या वाहनाला हिरवी झेंडी दर्शविल्यानंतर कुलगुरूंसह शेतकऱ्यांनी उद्यानविद्या विभागाला भेट देऊन सुरवात केली. या ठिकाणी फळे, रोपे, भाजीपाला या संदर्भात माहिती घेतली. प्रामुख्याने फळझाड रोपांचे कलमीकरण, नवनवीन जाती, फळांवरील प्रक्रिया आदींबाबत माहिती घेतली.

शेतकरी या प्रक्षेत्रांना देत आहेत भेटी
उद्यानविद्या विभाग, सेंद्रिय शेती, कापूस संशोधन केंद्र, संशोधन प्रकल्प (फळे), ज्वारी संशोधन केंद्र, कोरडवाहू शेती संशोधन केंद्र, कडधान्य संशोधन केंद्र, तेलबीया संशोधन केंद्र, डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती केंद्र, कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय येथे अवजारे प्रदर्शन, नागार्जुन वनौषधी उद्यान व दुग्धशास्त्र विभाग येथे देशी गायींचे दालन.

शिवारफेरीत आज आणि उद्या सहभागी होणारे जिल्हे
बुधवार (ता. ६)ः   
 चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया 
गुरुवार (ता. ७)ः     यवतमाळ, वर्धा व गडचिरोली 
 


इतर ताज्या घडामोडी
पुणे विभागात गव्हाचा १ लाख ६८ हजार...पुणे  ः पुणे विभागात गव्हाच्या पेरण्या...
खासदार औद्योगिक महोत्सवाच्या माध्यमातून...नागपूर  ः खासदार औद्योगिक महोत्सवाच्या...
अकोला कृषी विद्यापीठात विद्यार्थ्यांचे...अकोला  : ‘कृषी’चे पदव्युत्तर शिक्षण हे...
तीन जिल्ह्यांत तूर विक्रीसाठी २९...नांदेड  ः मराठवाड्यातील नांदेड, परभणी,...
आळसंद येथील पशुवैद्यकीय दवाखाना उद्‌...आळसंद, जि. सांगली : आळसंद (ता. खानापूर) येथे...
तीन जिल्ह्यांत सतरा लाख ४१ हजार क्विंटल...नांदेड  ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...
जावळी तालुक्यात वन्यप्राण्यांकडून... मेढा, जि. सातारा : जावळी तालुक्‍यात...
कातळावरील गोड्या पाण्यातील मत्स्यशेतीचा...सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील कांदळगाव (ता. मालवण)...
सुरक्षित प्रवासासाठी प्रवाशांना सुविधा...नाशिक : प्रवाशांना अधिकाधिक सुविधा देऊन त्यांचा...
महाशिवरात्रीनिमित्त पुण्यात रताळी,...पुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...
बदलत्या हवामानात कृषी जैवविविधतेचे...संयुक्त राष्ट्रसंघाच्या कृषी जैवविविधता आणि अन्न...
हरितगृह वायू कोणते?मागील लेखामध्ये हरितगृह परिणाम म्हणजे काय, ते आपण...
जागतिक तापमानवाढीवर हरितगृह वायूंचा...सध्या सर्वत्र तापमानवाढीची चर्चा असली, तरी...
गिरणा परिसरात कांदा लागवडीकडे कलमेहुणबारे, जि. जळगाव  ः चाळीसगाव तालुक्‍यात...
घराघरांत पोचणार नळ कनेक्‍शन, बसणार मीटर...जळगाव  : जिल्ह्यात ग्रामीण भागातील जनतेला...
जळगाव जिल्ह्यात कर्जमुक्ती योजनेतून...जळगाव : राज्यातील महाविकास आघाडी शासनाने महात्मा...
शेतकऱ्यांना सन्मानपूर्वक कर्जमुक्तीचा...अकोला ः शेतकरी कर्जदार नसून तो भूमीचा राजा आहे....
केंद्राच्या पथकाकडून लासलगावला कांदा...नाशिक  : कांद्याचे घसरते बाजार भाव पाहता...
`रेशीम प्रकल्पाच्या मंजुरीसाठी...औरंगाबाद : राज्यातील रेशीम उद्योगाच्या एकूणच...
अमरावती येथे जिल्हा परिषद अधिकाऱ्यांना...अमरावती ः जिल्हा परिषदेत आठवड्यातील दोन दिवस...