द्राक्षबाग वाचविण्यासाठी मणिमंगळसूत्र मोडले

चार लाख रुपयांची कीडकनाशके खरेदी करून बागेवर फवारली. परंतु पावसाने झटका दिला. त्यामुळे दुकानदार कीटकनाशके उधार देण्यास नकार देऊ लागले. त्यामुळे नाइलाजाने पत्नीचे मणिमंगळसूत्र मोडले. - दादासो पवार, शेतकरी
द्राक्षबाग नुकसान
द्राक्षबाग नुकसान

विटा, सांगली ः खानापूर तालुक्यात मॉन्सूनोत्तर पावसाचा निर्यातक्षम द्राक्षांना मोठा फटका बसला. द्राक्षबाग वाचावी यासाठी महागडी कीटकनाशके खरेदी करण्यासाठी पत्नीचे मणिमंगळसूत्र मोडण्याची वेळ सुळेवाडी (ता. खानापूर) येथील दादासो पांडुरंग पवार या शेतकऱ्यावर आली. मात्र, तरीही बागेचे होत्याचे नव्हते झाले. त्यामुळे पवार यांच्या दीड एकर निर्यातक्षम बागेचे सुमारे पंधरा लाख रुपयांचे नुकसान झाले. शासनाने झालेली नुकसानभरपाई तातडीने द्यावी, अशी पवार यांनी मागणी केली आहे. सुळेवाडी येथील दादासो व संतोष पांडुरंग पवार या बंधूंची दीड एकर निर्यातक्षम द्राक्षबाग आहे. आतापर्यंत या बागेचे चार हंगाम मिळाले. मात्र पाचव्या हंगामाला अति झालेल्या पावसाचे ग्रहण लागले. फुलोऱ्यात आलेल्या बागेत पावसाच्या पाण्याने फळकुज, मणिगळ झाली. बागेत साठलेल्या अति पाण्याने मुळकुज झाली. परिणामी बागेच्या ओलांड्यावर मुळ्या फुटल्या आहेत. नुकसान झाले व द्राक्ष घड नाहीत म्हणून बाग सोडताही येत नाही.  आमदार अनिल बाबर, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, प्रांताधिकारी शंकर बर्गे यांच्यासह अधिकाऱ्यांनी नुकसानीची पाहणी केली. पंचनामे केले. पीक विम्यासाठी अर्ज, भरा असे त्यांनी सांगितले. त्यानुसार पवार यांनी नुकसानभरपाई मिळण्यासाठी धावपळ सुरू केली आहे. शासनाने तातडीने नुकसानीचे पैसे बँक खात्यावर जमा केल्यास बागेचे पुढील नियोजन करता येईल, असे पवार सांगत होते.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com