agriculture news in Marathi,Farmer sold gold for Vineyard, Maharashtra | Agrowon

द्राक्षबाग वाचविण्यासाठी मणिमंगळसूत्र मोडले
टीम अॅग्रोवन
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

चार लाख रुपयांची कीडकनाशके खरेदी करून बागेवर फवारली. परंतु पावसाने झटका दिला. त्यामुळे दुकानदार कीटकनाशके उधार देण्यास नकार देऊ लागले. त्यामुळे नाइलाजाने पत्नीचे मणिमंगळसूत्र मोडले. 
- दादासो पवार, शेतकरी

विटा, सांगली ः खानापूर तालुक्यात मॉन्सूनोत्तर पावसाचा निर्यातक्षम द्राक्षांना मोठा फटका बसला. द्राक्षबाग वाचावी यासाठी महागडी कीटकनाशके खरेदी करण्यासाठी पत्नीचे मणिमंगळसूत्र मोडण्याची वेळ सुळेवाडी (ता. खानापूर) येथील दादासो पांडुरंग पवार या शेतकऱ्यावर आली. मात्र, तरीही बागेचे होत्याचे नव्हते झाले. त्यामुळे पवार यांच्या दीड एकर निर्यातक्षम बागेचे सुमारे पंधरा लाख रुपयांचे नुकसान झाले. शासनाने झालेली नुकसानभरपाई तातडीने द्यावी, अशी पवार यांनी मागणी केली आहे.

सुळेवाडी येथील दादासो व संतोष पांडुरंग पवार या बंधूंची दीड एकर निर्यातक्षम द्राक्षबाग आहे. आतापर्यंत या बागेचे चार हंगाम मिळाले. मात्र पाचव्या हंगामाला अति झालेल्या पावसाचे ग्रहण लागले. फुलोऱ्यात आलेल्या बागेत पावसाच्या पाण्याने फळकुज, मणिगळ झाली. बागेत साठलेल्या अति पाण्याने मुळकुज झाली. परिणामी बागेच्या ओलांड्यावर मुळ्या फुटल्या आहेत. नुकसान झाले व द्राक्ष घड नाहीत म्हणून बाग सोडताही येत नाही. 

आमदार अनिल बाबर, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, प्रांताधिकारी शंकर बर्गे यांच्यासह अधिकाऱ्यांनी नुकसानीची पाहणी केली. पंचनामे केले. पीक विम्यासाठी अर्ज, भरा असे त्यांनी सांगितले. त्यानुसार पवार यांनी नुकसानभरपाई मिळण्यासाठी धावपळ सुरू केली आहे. शासनाने तातडीने नुकसानीचे पैसे बँक खात्यावर जमा केल्यास बागेचे पुढील नियोजन करता येईल, असे पवार सांगत होते.
 

इतर बातम्या
किमान तापमानात किंचित वाढपुणे  : राज्यात थंडीची चाहूल लागल्यानंतर...
बाजार समित्यांना सक्षम पर्याय द्याः...पुणे ः केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी...
पावसाने संत्र्यात ४० टक्के फळगळ; ४००...नागपूर : राज्याचे मुख्य फळपिकांत महत्त्वाचे स्थान...
हमीभावाने कापूस खरेदी २० नोव्हेंबरपासून...जळगाव : भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) व...
राजकीय अस्थिरतेमुळे पूरग्रस्तांना मदतीस...कोल्हापूर: महापुरात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना...
नवनवीन प्रपत्र, जिओ टॅगिंगच्या...बुलडाणा  ः अवकाळी पावसामुळे झालेल्या...
बारा लाख टन साखर निर्यातीचा मार्ग मोकळापुणे : केंद्र शासनाने मुदतवाढ दिल्यामुळे देशातील...
विमा कंपन्यांचे आस्ते कदम; पंचनाम्याकडे...पुणे : राज्यातील लाखो हेक्टरवरील पिके जमीनदोस्त...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नी ‘...अकोला ः राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना एकरी...
पंचनाम्यांसाठी संभाजी ब्रिगेड, किसान...पुणे : नैसर्गिक आपत्ती व अतिवृष्टीमुळे बाधित...
शरद पवार करणार विदर्भातील पीक नुकसानीची...नागपूर ः राज्यात सत्तास्थापनेचे गुऱ्हाळ सुरू...
महाशिवआघाडीत सत्तास्थापनेसाठी वाटाघाटी...मुंबई ः राज्यात भाजपला वगळून शिवसेना, राष्ट्रवादी...
शेतकऱ्यांवर रब्बी ज्वारीचे पीक...औरंगाबाद : मकानंतर आता रब्बी ज्वारीवर लष्करी...
अकोला, बुलडाण्याला खरिपात ७२५ कोटींचा...अकाेला ः गेल्या महिन्यात झालेल्या संततधार पाऊस व...
खानदेशात रब्बीसाठी प्रकल्पांमध्ये...जळगाव  ः खानदेशात रब्बी हंगामाची शेतकरी...
पुणे : हरभरा उत्पादनवाढीसाठी ४००...पुणे ः हरभरा उत्पादनवाढीसाठी रब्बी हंगामात अकरा...
मांजरपाडा प्रकल्पग्रस्तांची पूल...नाशिक  : दिंडोरी तालुक्यातील मांजरपाडा वळण...
खारपाण पट्ट्यातील कापूस हंगामही अडचणीतअकोला ः सततच्या पावसाने खरिपातील सर्वच...
पुणे : पंचनाम्यापासून अद्यापही १५ हजार...पुणे ः पुणे जिल्ह्यात नुकसान झालेल्या पिकांचे...
कोल्हापूर जिल्ह्यात केवळ पाच टक्के...कोल्हापूर : पावसाचा फटका खरीप हंगामात बसल्याने...