अंबानी इस्टेटवर शेतकरी, शेतमजूर मोर्चा नेणार 

येत्या २२ डिसेंबरला राज्यातील शेतकरी, शेतमजूर आणि कष्टकारी मुंबईच्या अंबानी इस्टेटवर विराट मोर्चा नेतील, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी पत्रकारांना सांगितले.
अंबानी इस्टेटवर शेतकरी, शेतमजूर मोर्चा नेणार Farmers and agricultural workers will march on Ambani Estate
अंबानी इस्टेटवर शेतकरी, शेतमजूर मोर्चा नेणार Farmers and agricultural workers will march on Ambani Estate

पुणे : शेतकऱ्यांना चिरडून मोदी सरकारमार्फत नवे कृषी व पणन कायदे लादून भांडवलदार अंबानी-अदानी आपली पैशांची भूक भागवत आहेत. त्यामुळे येत्या २२ डिसेंबरला राज्यातील शेतकरी, शेतमजूर आणि कष्टकारी मुंबईच्या अंबानी इस्टेटवर विराट मोर्चा नेतील, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी पत्रकारांना सांगितले. 

‘स्वाभिमानी’ , ‘प्रहार’, ‘शेकाप’ व लोकसंघर्ष मोर्चा अशा चार संघटनांसमवेत शेट्टी यांनी राज्यव्यापी मोर्चाची घोषणा केली. या वेळी बाबा आढाव व प्रतिभा शिंदे यांनीही भूमिका मांडली. “जगातील पाचव्या क्रमांकाचा श्रीमंत उद्योगपती झाल्यानंतरही अंबानी यांची संपत्तीची भूक मिटली नाही. आता त्यांना शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करायच्या आहेत. त्यामुळे तुमची भूक आहे तरी किती, किमान गरीब शेतकऱ्यांना तरी तुम्ही मोकळे सोडणार आहात का, असे प्रश्न विचारण्यासाठी आम्ही मोर्चा नेत आहोत,” असे शेट्टी म्हणाले. 

“आम्हाला तीनही कृषी कायदे नको आहेत. उलट २३ पिकांना किमान हमी भाव हवा आहे. मात्र २० दिवसानंतर देखील दिल्लीतील शेतकरी आंदोलनाची दखल सरकारने घेतलेली नाही. सरकारला आंदोलन चिरडायचे असून, आता सतत बंदोबस्त वाढवला जातो आहे. आंदोलनात काही रक्तरंजित घडल्यास मोदी-शहांना किंमत चुकती करावी लागेल,” असा इशारा देखील शेट्टी यांनी दिला. 

भारतीय अन्न महामंडळाच्या डोक्यावर २.६३ लाख कोटी इतके अफाट कर्ज करून ठेवले आहे. महामंडळ बंद करून अदानी-अंबानीकडे देण्याचा डाव रचला गेला आहे. या कायद्याच्या माध्यमातून सरकारी यंत्रणा ताब्यात घेऊन शेतकरी लुटले जाणार आहेत. पावणे दोन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या करून देखील केवळ भांडवलदारांसाठी देश चालविला जात असेल तर आता शेतकरी गप्प बसणार नाहीत,” असेही शेट्टी यांनी स्पष्ट केले. 

शहिद शेतकऱ्यांना वाहणार श्रद्धांजली   “दिल्लीतील शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्या ३० शेतकऱ्यांना येत्या २० डिसेंबरला राज्यात प्रत्येक गावात मेणबत्ती पेटवून श्रध्दांजली अर्पण केली जाईल. तसेच, भाजप सरकारने लादलेले तीनही कृषी कायदे रद्द करण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष करण्याची शपथ शेतकऱ्यांना शपथ दिली जाणार आहे,” अशी घोषणा आंदोलकांनी केली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com