कृषी विद्यापीठाच्या यशात शेतकऱ्यांचे मोलाचे योगदान ः डॉ. भाले

अकोला ः कृषी दिनाच्या सोहळ्यात पंढरीअप्पा गुंजकर यांचा सपत्नीक सत्कार करताना डॉ. व्ही. एम.भाले, डॉ. डी. एम. मानकर, डॉ. नागरे, डॉ. नागदेवे, डॉ. तायडे आदी.
अकोला ः कृषी दिनाच्या सोहळ्यात पंढरीअप्पा गुंजकर यांचा सपत्नीक सत्कार करताना डॉ. व्ही. एम.भाले, डॉ. डी. एम. मानकर, डॉ. नागरे, डॉ. नागदेवे, डॉ. तायडे आदी.

अकोलाः शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी शासन, कृषी विभाग, कृषी विद्यापीठ आपापल्या स्तरावर काम करीत आहे. विद्यापीठाने शेतकऱ्यांसाठी विविध वाण, यंत्र, तंत्र शोधले आहेत. या जोरावर आजवर विद्यापीठाने मिळवलेल्या यशात शेतकऱ्यांचे योगदान खूप मोठे आहे, असे मत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एम. भाले यांनी व्यक्त केले.  कृषी दिनानिमित्त विद्यापीठाचा शिक्षण विस्तार संचालनालयाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात अध्यक्षपदावरून डॉ. भाले बोलत होते. या वेळी व्यासपीठावर शिक्षण विस्तार संचालक डॉ. डी. एम. मानकर, अधिष्ठाता डॉ. पी. के. नागरे, डॉ. महेंद्र नागदेवे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. ययाती तायडे उपस्थित होते.  डॉ. भाले पुढे म्हणाले, कृषी विद्यापीठाचा शेती शाश्वत बनविण्यावर जोर आहे. आज शेतकऱ्याचे उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी एकाच पीकपद्धतीवर अवलंबून राहणे योग्य नाही. डॉ. डी. एम. मानकर यांनी प्रास्ताविकामध्ये या कार्यक्रमाबाबतची पार्श्वभूमी सांगितली. या कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाद्वारे पुरस्कृत कृषी व संलग्न क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्रगतिशील शेतकऱ्यांचा कुलगुरू डॉ. व्ही. एम. भाले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  कृषी आयकॉन झळकले फलकांवर कृषी क्षेत्रात अतुलनीय कामगिरीचा गौरव म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने पाच शेतकऱ्यांचे फलक तयार केले आहेत. विद्यापीठ परिसरात दर्शनी भागात हे फलक लावण्यात आले असून, त्याचे कुलगुरूंच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.  सन्मानार्थी शेतकरी  पंढरीअप्पा गुंजकर (उंद्री, बुलडाणा), विजय इंगळे (चितलवाडी, अकोला), दिलीप फुके (वाशीम), नामदेवराव अढाऊ (देऊळगाव, अकोला), रवींद्र मेटकर (अमरावती), अरुण धुळे (सुनगाव, बुलडाणा), शशिकांत पुंडकर (येऊलखेड, बुलडाणा), हेमंत देशमुख (डोंगरकिन्ही, वाशीम),  भलू कायते (भंडारा), अतुल लकडे (अमरावती), नंदू चिमुटे, अमृत मदनकर (भंडारा), राजेंद्र ताले (डिग्रस, अकोला), सुरेश गरमले (वरोरा, चंद्रपूर), अशोक वानखडे (यवतमाळ) आणि अशोक धोटे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com