agriculture news in Marathi,farmers demand for declare Baglan Taluka as Wet drought, Maharashtra | Agrowon

नाशिक जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 15 ऑक्टोबर 2019

बागलाण तालुक्यातील द्राक्ष उत्पादक अर्ली बागा घेण्यात आघाडीवर आहेत. बागलाणचे नाव निर्यातीमुळे जगप्रसिद्ध झाले. नैसर्गिक संकटांमुळे द्राक्षबागा वाचविणे अवघड झाल्याने उत्पादक आर्थिक संकटात सापडला आहे. संबंधित लोकप्रतिनिधी, कृषी विभागाने बाराही महिने विमा कवच संरक्षणाची तरतूद करावी अशी मागणी आहे.
- जिभाऊ चिंतामण कापडणीस, द्राक्ष उत्पादक, टेंभे खालचे, जि. नाशिक

नाशिक : जिल्ह्यासह बागलाण तालुक्यात अतिवृष्टीमुळे फळबागा, खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आशा परिस्थितीत शासनाने सरसकट नुकसानीचे पंचनामे करून ''ओला दुष्काळ'' जाहीर करावा, अशी मागणी बागलाण तालुक्यातील शेतकऱ्यांनी खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्याकडे केली. 

बागलाण तालुक्यातील पिंगळवाडे येथे खासदार भामरे यांनी नुकतीच भेट दिली. या वेळी नामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक तथा संचालक द्राक्ष बागायतदार संघ (नाशिक) संचालक कृष्णा भामरे यांनी तालुक्यातील नुकसानीबाबत कैफियत मांडली. 

या वेळी खासदार भामरे यांनी नुकसानबाबत माहिती जाणून घेतली. यंदा पावसाळा उशिरा आल्याने त्यामुळे सुरवातीला पडलेला दुष्काळ व नंतर दोन महिन्यांच्या अतिवृष्टी होऊन द्राक्ष, डाळिंब, टोमॅटो, भाजीपाला पिकांसह मका, बाजरी, सोयाबीन, भुईमूग पिके खराब झाली आहेत. खरीप कांदा, उन्हाळी लागवडीचे टाकण्यात आलेले कांद्याचे बियाण्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सततच्या पावसामुळे द्राक्षाच्या घडांची कुज, भुरी, डाउनी, घड जिरणे इत्यादी प्रकार होऊन बागा कोलमडल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. तसेच, लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने मका उत्पादनावरही परिणाम झाला आहे.

सध्या अनेक ठिकाणी बाजरी व इतर पिके कापणी सुरू असल्याने पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. अतिवृष्टीमुळे शेतीपिकांसह पशुधन इत्यादी नदीनाल्यात वाहून शेती अवजारांसह घरांची पडझड झाली. या सर्व गंभीर परिस्थितीचा आढावा घेऊन सरसकट नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देऊन बागलाण तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी कृष्णा भामरे, खंडेराव शेवाळे, जिभाऊ कापडणीस ,युवराज कापडणीस, सुनील भामरे, भाऊसाहेब भामरे, बापू अहिरे, दौलत बोरसे, शांताराम जाधव, शरद शेवाळे, प्रकाश भामरे, आनंदा गवळी, नानाजी जाधव, यांच्यासह तालुक्यातील नागरिकांनी केली आहे. 


इतर बातम्या
औसा तालुक्यात उडीद, मूग व्हायरसच्या...औसा, जि. लातूर : तालुक्यातील उडीद आणि मूग ही पिके...
आदिवासी तालुक्यांमध्ये कोरडा दुष्काळ...नाशिक: कोरोना विषाणूच्या फैलावामुळे राज्याचे...
शेतकरीविरोधी कायद्यावर ‘किसानपूत्र’चे...औरंगाबाद: किसानपूत्र आंदोलनाच्यावतीने...
शेतमजुरांसाठी कौशल्याधारीत प्रशिक्षण...नाशिक: बदलत्या पीक पद्धतीमध्ये कीडनाशक फवारणी,...
कोल्हापूर जिल्ह्यात वादळ, पुराचा उसाला...कोल्हापूर: जोरदार वाऱ्यासह सुरु असलेल्या पावसाने...
कोल्हापुरात नद्यांच्या पाण्यात वाढ...कोल्हापूर: जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पावसाचा...
राज्यात पावसाचा जोर ओसरला पुणे ः कोकण, मध्य महाराष्ट्रात गेल्या चार ते पाच...
शेतकरी विरोधी अध्यादेश रद्द करा मुंबई: केंद्र सरकारने ५ जून २०२० रोजी काढलेले...
राज्यात पावसाचा जोर सोमवारपासून वाढणार पुणे ः बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र...
पुणे जिल्ह्यात पावसामुळे भात लागवडीला...पुणे ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून पुणे...
किसान रेल्वेला नाशिकमधून प्रारंभ नाशिक: केंद्र सरकारने २०२० च्या अर्थसंकल्पात...
नाशवंत शेतमाल वाहतुकीसाठी किसान...नाशिक: कृषी क्षेत्रात प्रगत असलेल्या नाशिक...
पाथरूडच्या बंधाऱ्यांत मुबलक पाणीपाथरूड, जि. उस्मानाबाद : येथील दुधना नदीवर...
नंदुरबारमध्ये अनेक भागात पाऊस नंदुरबार ः जिल्ह्यात मागील दोन दिवसांत...
पुण्यातील धरणातून उजनीत १३ हजार ५६...सोलापूर ः उजनी धरणाच्या वरच्या बाजूला...
`पपईचा पिकविमा योजनेत समावेश करा`जळगाव ः खानदेशात कांद्यापाठोपाठ पपईचे...
बार्शीत रेशनचा १५१ पोती गहू, तांदूळ...सोलापूर ः बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीतील...
‘माढा, पंढरपूर, माळशिरसमधील...सोलापूर ः ‘‘गतवर्षी जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या...
परभणीत ऊस, चारा पिकांवर नाकतोड्याचा...परभणी : वांगी (ता.परभणी) येथील ऊस पीक झालेल्या...
पूर्ण कार्यक्षमतेने ऊस गाळप करण्याचे...नाशिक : ‘‘कादवा सहकारी साखर कारखान्याने जुन्या...