Agriculture news in marathiFarmers' farm produce No response to sales | Agrowon

शेतकऱ्यांचा शेतीमाल विक्रीला प्रतिसाद नाही

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 22 एप्रिल 2021

नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समिती सध्या शेतमालाचे लिलाव सुरू आहेत. मात्र गेल्या आठ दिवसांपासून कोरोना संसर्गाच्या धास्तीने शेतकऱ्यांचा शेतमाल विक्रीला फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही.

नगर : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समिती सध्या शेतमालाचे लिलाव सुरू आहेत. मात्र गेल्या आठ दिवसांपासून कोरोना संसर्गाच्या धास्तीने शेतकऱ्यांचा शेतमाल विक्रीला फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. आवकेवरही परिणाम झाला दिसत आहे. सोमवारी (ता. १९) केवळ चिंचेचे लिलाव झाले तर मंगळवारी (ता. २०) हरभरा, चिंचेचे लिलाव झाले. 

नगर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून कोरोना संसर्गाची बाधा झालेल्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. दर दिवसाला साडेतीन हजार रुग्णांना बाधा होत असल्याचे तपासणी आढळून येत आहे. याचा आरोग्य यंत्रणेवर ताण पडत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने दोन दिवसांपासून जनता कर्फ्यू लावला आहे. त्याचा परिणाम बाजार समितीमधील लिलावावर होत आहे. भाजीपाला बाजारात सोमवारी (ता. १९) लोकांनी गर्दी केल्याने भाजीपाल्याचे लिलाव बंद केले आहेत.

भुसारचे लिलाव सुरू असले तरी तेथेही शेतकरी शेतमाल विक्रीसाठी येत नाहीत. त्यामुळे सोमवारी (ता.२०) फक्त चिंचेचे लिलाव झाले. मंगळवारी हरभरा, चिंचेची अल्प आवक झाली. कोरोनाच्या धास्तीने बाजार समितीत आवकही घटली आहे, असे बाजार समितीतून सांगण्यात आले.


इतर ताज्या घडामोडी
सोयाबीन पेंडची आयात शुल्काविना करावीनागपूर : भारतात सोयाबीन पेंडचे दर गगनाला...
दूधदरात पुन्हा दोन रुपयांची कपातनगर ः कोरोना संसर्ग वरचेवर वाढत असल्याने लॉकडाउन...
देशातील पहिले कृषी निर्यात मार्गदर्शन...पुणे ः राज्यातील शेतकरी व उदयोन्मुख...
उत्तर भारतातील कापूस लागवड पूर्णत्वाकडेजळगाव ः देशात उत्तर भारतातील कापूस लागवडीने वेग...
कृषी खात्यातील बदल्या लांबणीवरपुणे ः ऐन कोरोना कालावधीत बदल्यांचा घाट रचलेल्या...
खाद्यतेल दरात गतवर्षीपेक्षा ८० टक्के वाढनागपूर : शेंगदाण्याची निर्यात तसेच पाम तेलावरील...
पूर्व विदर्भात ४५ लाख क्विंटल धान खराब...गोंदिया : भात उत्पादक पूर्व विदर्भातील पाच...
पशुवैद्यक करणार घरपोच सेवा बंदनागपूर : पशुवैद्यकांना फ्रंटलाइन वर्कर्स व कोरोना...
सोयाबीन बियाणे निर्बंध मध्य प्रदेशकडून...पुणे ः परराज्यांत सोयाबीन बियाणे विक्रीवर निर्बंध...
‘महाबीज’चे सोयाबीन बियाणे दर ‘जैसे थे’अकोला : खरीप हंगामासाठी ‘महाबीज’ने सोयाबीन...
देशाच्या तुलनेत निम्मी साखर एकट्या...कोल्हापूर : देशाच्या साखरनिर्यात कोट्यापैकी जवळ...
‘गोकुळ’चा कल सत्तांतराकडेकोल्हापूर : अत्यंत चुरशीने झालेल्या कोल्हापूर...
‘सह्याद्री’च्या पर्वतरांगेमधून...नाशिक : सह्याद्रीच्या पर्वतरांगेत पश्‍चिम घाट...
राज्यात आंब्याचा हंगाम ऐन बहरातअकोल्यात बदाम आंबा ४००० ते ४५०० रुपये क्विंटल...
सोशल मीडियाद्वारे ६५ टन कलिंगड विक्रीपुणे : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी एप्रिल...
मध्य प्रदेश सरकारकडून बियाणे विक्रीवर...पुणे ः सोयाबीन बीजोत्पादनात देशात सर्वात मोठा...
पशुखाद्य निर्मितीचा कच्चा माल दुपटीने...सांगली : पशुखाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या...
दक्षिण भागात गारपिटीची शक्यतापुणे :  गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका...
परभणी जिल्ह्यात कडक निर्बंध लागूपरभणी ः  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी...
परभणी जिल्ह्यात लघु तलावांत सरासरी १९...परभणी ः वाढते तापमान, बाष्पीभवनाचा वाढलेला वेग,...