चंद्रपूर जिल्ह्यात पीकविमा योजनेत ४१ हजार शेतकऱ्यांचा सहभाग

चंद्रपूर जिल्ह्यात पीकविमा योजनेत ४१ हजार शेतकऱ्यांचा सहभाग
चंद्रपूर जिल्ह्यात पीकविमा योजनेत ४१ हजार शेतकऱ्यांचा सहभाग

चंद्रपूर ः प्रधानमंत्री पीकविमा योजनेला धानपट्टयात वाढता प्रतिसाद असून सोमवार (ता. २९) पर्यंत सुमारे ४१ हजार ८९९ शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा उतरविला.  विमा परताव्यासाठी राजकीय पक्षांनी घेतलेला पुढाकार त्यासोबतच विमा कंपन्यांकडून तालुकास्तरावर प्रतिनिधी देण्यात आला आहे. त्यामुळेच यावर्षी शेतकऱ्यांचा विमा काढण्यासाठी वाढता प्रतिसाद असल्याचे चित्र आहे. २०१८-१९ या वर्षात ५२ हजार ४९२ शेतकऱ्यांनी विविध पिकांचा विमा उतरविला होता. २४.५० कोटी रुपये विमा हप्ता म्हणून त्यांच्याकडून भरण्यात आला. त्यापोटी ०४.९० कोटी रुपयांची भरपाई शेतकऱ्यांना मिळाली. यावर्षी आत्तापर्यंत ४१ हजार शेतकऱ्यांनीच विमा उतरविला असला तरी बुधवार (ता. ३१) पर्यंत विमा मुदत वाढवून देण्यात आली असल्याने यात आणखी काही शेतकऱ्यांची भर पडेल, अशी शक्‍यता प्रशासनाकडून वर्तविली जात आहे.  प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात सोयाबीन, कापूस, मूग, उडीद, तूर, आदी पिकांचा पीकविमा उतरविला असून विमा हप्त्यापोटी तीन कोटी ११ लाख ४७ हजार ०११ रुपये भरले आहेत. पेरण्या विलंबाने झाल्यामुळे पीकविमा प्रक्रिया विलंबाने होत आहे. खरीप हंगामातील पिकांसाठी शेतकऱ्यांना अन्नधान्य व गळीत धान्य पिकांकरिता विमा संरक्षित रकमेच्या दोन टक्‍के तर नगदी पिकांकरिता पाच टक्‍के हप्ता शेतकऱ्यांना भरावा लागणार आहे.  अशी आहे स्थिती  २०१५-१६ मध्ये ३९ हजार १६५ शेतकऱ्यांनी २२.८८ कोटी रुपये विमा हप्ता भरला होता. ०१.७५  कोटींची भरपाई मिळाली. २०१६-१७ मध्ये ९८ हजार ६५२ शेतकऱ्यांनी १७.०४ कोटी रुपये विमा हप्ता भरून ४४.२६ कोटीची भरपाई मिळाली. २०१७-१८ मध्ये ४१ हजार १३२ शेतकऱ्यांनी ५.३२ कोटी रुपये विमा हप्ता भरला होता. ४३.५२ कोटी रुपयांची भरपाई त्यांना मिळाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com