Agriculture news in marathi;Farmers' pollination for Waghur water | Agrowon

वाघूरच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांची वणवण
टीम अॅग्रोवन
बुधवार, 12 जून 2019

नशिराबाद, जि. जळगाव  : पूर्वहंगामी कापूस लागवडीसाठी दरवर्षीप्रमाणे पाण्याचे आवर्तन सोडणे शक्‍य असल्याचा अहवाल पाटबंधारे विभागाने नंतर घूमजाव करीत बदलला आहे. यामुळे कापूस लागवडीसाठी पाटातून पाणी मिळणे अशक्‍य झाले असून, पाटबंधारे विभागाने वस्तुस्थिती लक्षात घेऊन अहवाल द्यावा, अशी अशी मागणी लाभधारक सिंचन समितीतर्फे वाघूर धरण विभागाकडे करण्यात आली आहे, तसेच पाटचारीत कापूस लागवडीसंबंधी पाणी न सोडल्यास १३ जूनला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा लाभधारक सिंचन समितीने दिला आहे. 

नशिराबाद, जि. जळगाव  : पूर्वहंगामी कापूस लागवडीसाठी दरवर्षीप्रमाणे पाण्याचे आवर्तन सोडणे शक्‍य असल्याचा अहवाल पाटबंधारे विभागाने नंतर घूमजाव करीत बदलला आहे. यामुळे कापूस लागवडीसाठी पाटातून पाणी मिळणे अशक्‍य झाले असून, पाटबंधारे विभागाने वस्तुस्थिती लक्षात घेऊन अहवाल द्यावा, अशी अशी मागणी लाभधारक सिंचन समितीतर्फे वाघूर धरण विभागाकडे करण्यात आली आहे, तसेच पाटचारीत कापूस लागवडीसंबंधी पाणी न सोडल्यास १३ जूनला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा लाभधारक सिंचन समितीने दिला आहे. 

सुरवातीला वाघूर धरणातून आवर्तनाची मागणी केली असता पिण्याचे पाणी राखीव ठेवून शेतीसाठी आवर्तन सोडणे शक्‍य असल्याचे वाघूर धरण विभागातर्फे सांगण्यात आले. याच मागणीसाठी २० मे रोजी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांची भेट घेतली होती. त्यांनी वाघूर धरण विभागाकडून पाणीसाठ्याची माहिती मागवून निर्णय घेऊ, असे सांगितले होते; परंतु पाणी सोडण्याचा ठोस निर्णयच घेतलेला नाही, असेही शेतकऱ्यांनी म्हटले आहे. 

अहवालाचे गौडबंगाल 
२७ मेस समिती सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली असता, शेतीसाठी पाणी सोडणे शक्‍य असल्याचा अहवाल प्राप्त झाल्याचे स्पष्ट झाले. मात्र, ३१ मे अगोदर कापूस लागवड केल्यास गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होऊ शकतो, असे कृषी अधिकाऱ्यांचे मत असल्याने मे ऐवजी १ ते ७ जूनदरम्यान आवर्तन सोडू, असे सांगितले. दरम्यान, समितीने पुन्हा ३ जूनला आवर्तन सोडण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली असता, वाघूर धरण विभागाकडून पाणी सोडणे शक्‍य नसल्याचा अहवाल प्राप्त झाल्याचे कारण पुढे करण्यात आले. यामुळे पाटचारीत पाणीच सोडलेले नसल्याचे शेतकरी म्हणाले. 

वाघूरच्या पाणीसाठ्याची स्थिती 
वाघुर धरणातील सद्यःस्थितीत जिवंत पाणीसाठा १२०० दशलक्ष घनमीटर असून, त्यापैकी सिंचनासाठी फक्त १०० ते १५० दलघमी इतके पाणी लागणार आहे. शेतकऱ्यांच्या मागणीचा सहानुभूतिपूर्वक विचार करून येत्या दोन दिवसांत योग्य निर्णय घ्यावा, असे निवेदन लाभधारक सिंचन समितीने दिले आहे. निवेदनावर जिल्हा परिषद सदस्य लालचंद प्रभाकर पाटील, पंचायत समिती सभापती यमुनाबाई रोटे, मिलिंद चौधरी, किशोर चौधरी, राजेंद्र चौधरी, आदींची स्वाक्षरी आहे. 

इतर बातम्या
‘एफएमओ’चा सह्याद्री फार्म्सला १२०...नाशिक : शेतकरी उत्पादक कंपन्यांनी स्वतःच्या...
मानधनवाढीसाठी आशा कर्मचाऱ्यांचे मूक...नाशिक : आशा व गटप्रवर्तकांचे मानधन तिप्पट...
अकोल्यात पावसाळी वातावरणामुळे मूग...अकोला  ः गेल्या १५ दिवसांपासून कुठे रिमझिम...
ग्रामसेवकांच्या माघारीने...पुणे : राज्य शासनाकडून ग्रामसेवक संघटनेच्या...
हिंगोलीत खरिपात केवळ अकरा टक्के पीक...हिंगोली ः हिंगोली जिल्ह्यातील सर्वच बॅंकांनी यंदा...
नरोटेवाडीतील कालव्यातून हिप्परगा...सोलापूर  : शिरापूर उपसा सिंचन योजनेमधून...
रेशीम अळ्यांचे शास्त्रोक्‍त संगोपन आवश्...जालना : ‘‘चॉकी रेअरिंग सेंटरमुळे शेतकऱ्यांना...
परभणीत ८४९ कोटी ५६ लाख रुपयांची...परभणी ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
लष्करी अळीच्या नुकसानीचे पंचनामे का...औरंगाबाद : ‘‘शेती तोट्यात गेली, गावचं अर्थकारण...
‘कडकनाथ’प्रकरणी ‘स्वाभिमानी’ आक्रमकसातारा : कडकनाथ घोटाळ्याप्रकरणी तिघांना आरोपीऐवजी...
पुराचे पाणी दुष्काळी भागाला देणार ः...कऱ्हाड, जि. सातारा ः महापुरामुळे सांगली,...
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात सोडल्या...सांगली ः कडकनाथ कोंबडी घोटाळा प्रकरणांची चौकशी...
शरद पवार आजपासून राज्याच्या दौऱ्यावरमुंबई ः लोकसभा निवडणुकीपासून सुरू असलेली पक्षाची...
मोकाट जनावरांकडून पिकांचे नुकसान विंग, जि. सातारा ः अतिवृष्टीने खरीप धोक्‍यात...
जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्गजायकवाडी, जि. औरंगाबाद : जायकवाडी धरणामधून...
थकबाकीदार सूतगिरणीच्या संचालकांवर राज्य...मुंबई: कोट्यवधींचे कर्ज थकवल्याप्रकरणी राज्य...
रेशीम विभागाचा सुधारित आकृतीबंध...जालना: झपाट्याने वाढत असलेल्या रेशीम उद्योग व...
अमेरिकन लष्करी अळीकडून ४० टक्के मका फस्तपुणे: राज्यात मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचे...
लष्करी अळी आटोक्यात: कृषी विभागपुणे : राज्यात दोन लाख ६७ हजार हेक्टर क्षेत्रातील...
अनुदान अर्जांच्या पूर्वसंमतीची पद्धत...पुणे : राज्यातील शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी...