पुणे ः पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदासाठी शनिवारी (ता. १४) मुलाखती होणार आहे.
ताज्या घडामोडी
किसान सभेच्या दणक्यानंतर; परळीतील पीकविमा खात्यात जमा होण्यास प्रारंभ
पुणे ः परळी (जि. बीड) तालुक्यातील खरीप २०१८ मध्ये नुकसान झालेल्या पिकांची नुकसानभरपाई मिळण्यासाठी किसान सभेने बुधवारी (ता. १३) आंदोलन सुरू केले होते. त्यानंतर दि. ओरिएन्टल कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाग आल्याने कंपनीच्या प्रतिनिधीनी शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यास सुरुवात केली. लढ्याला यश येत असले तरी हा लढा सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत सुरूच राहणार असल्याचे ॲड. अजय बुरांडे यांनी सांगितले आहे.

बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मंजूर झालेला २०१८ चा खरीप व रब्बीचा पीकविमा अद्यापपर्यंत मिळालेला नाही. कोट्यवधी रुपये शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून मिळालेले नाही. बीड जिल्हा किसान सभेचे नेते कॉ. अजय बुराडे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी पुणे येथील दि. ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयासमोर जोपर्यंत आमच्या खात्यात जमा होणार नाही, तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. या निर्धाराने बुधवारपासून बेमुदत मुक्काम सत्याग्रह करत आहेत. रविवारी (ता. १७) आंदोलनाचा पाचवा दिवस होता.
या आंदोलनामुळे ज्यांना यापूर्वी ओरिएंटल कंपनीने पीकविमा नाकारला होता. त्यातील तीस शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळाली आहे. तसे एसएमएस शेतकऱ्यांना मिळतील, असे निवेदन क्षेत्रीय प्रबंधक पी. एस. मूर्ती यांनी किसान सभेच्या शिष्टमंडळासमोर केले, त्याप्रमाणे आत्तापर्यत १०० ते १२५ शेतकऱ्यांना जवळपास ४६ लाख रुपयांची रक्कम मिळाली असून अजून ३०० ते ४०० शेतकरी रकमेपासून दूर आहेत. सर्व शेतकऱ्यांना रक्कम मिळत नाही तोपर्यंत मुक्काम सत्याग्रह आंदोलन सुरूच ठेवले जाणार आहे. परळी तालुक्यातील तीनशे शेतकरी किसान सभेच्या नेतृत्वाखाली पुणे येथे पाच दिवसांपासून आंदोलन करित आहेत.
इतर राजकीय पक्ष सत्तास्थापनेच्या स्वार्थी राजकारणात मश्गुल असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर किसान सभा मात्र अत्यंत अभ्यासू आंदोलन करत असल्याबद्दल शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. आंदोलनाचे नेतृत्व अॅड. अजय बुरांडे, कॉ. अजित अभ्यंकर, कॉ. सुदाम शिंदे, कॉ. भागवत देशमुख, डॉ. ज्ञानेश्वर मोटे, कॉ. विशाल देशमुख, सखाराम शिंदे, अॅड. अशोक डाके हे करत आहेत.
- 1 of 586
- ››