नगरमधील बहुतांश भागात अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर  ः जिल्ह्यात अजूनही चांगल्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे. दोन दिवसांपासून सगळीकडे जोरदार पाऊस पडत असला, तरी नगर जिल्ह्याच्या सर्वच भागांत पाऊस नाही. त्यामुळे अल्प पावसावरच पेरणी, कापूस लागवड केली जात आहे. रविवारी (ता. ८) फक्त शहरात पाऊस झाला. जिल्ह्यामध्ये ९७ महसूल मंडळापैकी अवघ्या आठ मंडळात पावसाने हजेरी लावली.

जिल्ह्याच्या सर्वच भागांत जोरदार पाऊस अजून झालेला नाही. त्यामुळे पेरणी, कापूस लागवडीला वेग आलेला नाही. रविवारी पावसाने हजेरी लावली खरी; मात्र केवळ नगर शहरातच पाऊस झाला. ग्रामीण भागात मात्र अजूनही पाऊस नाही. रविवारी शहरात ६३ मि.मी. पावसाची नोंद झाली.

रविवारी दिवसभरात श्रीरामपूरला ६३ व उंदीरगावला ६०, अरणगाव (ता. नगर) येथे १६, वांबोरी (ता. राहुरी) येथे २२, ताहाराबाद येथे ३७, घोडेगाव येथे ३९, रुईछत्तीसी येथे २०, चिचोंडी पाटील येथे २१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पाथर्डी तालुक्‍यातील काही भागांत हलका पाऊस झाला. अकोले तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात पाऊस सुरू आहे. मात्र तेथेही दरवर्षीप्रमाणे पावसाचा जोर नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com