वर्ध्यात शेतकऱ्यांना ७२१ कोटींचे कर्ज वाटप

खरिपासह रब्बी हंगामात बॅंकांकडून जिल्ह्यातील शेतकऱ्याना ७२१ कोटी १५ लाख रुपयांच्या पीककर्जाचे वाटप करण्यात आले आहे. खरिपाकरीता बॅंकांना ९२४.९९ कोटी तर रब्बी हंगामासाठी १०३.९७ याप्रमाणे १०२८.९६ कोटी रुपयांच्या पीककर्ज वाटपाचे उद्दीष्ट्य होते.
वर्ध्यात शेतकऱ्यांना ७२१ कोटींचे कर्ज वाटप
वर्ध्यात शेतकऱ्यांना ७२१ कोटींचे कर्ज वाटप

वर्धा : खरिपासह रब्बी हंगामात बॅंकांकडून जिल्ह्यातील शेतकऱ्याना ७२१ कोटी १५ लाख रुपयांच्या पीककर्जाचे वाटप करण्यात आले आहे. खरिपाकरीता बॅंकांना ९२४.९९ कोटी तर रब्बी हंगामासाठी १०३.९७ याप्रमाणे १०२८.९६ कोटी रुपयांच्या पीककर्ज वाटपाचे उद्दीष्ट्य होते.

 जिल्ह्याचे खरीप क्षेत्र मोठे आहे. सुमारे ४ लाख २८ हजार ६१४ हेक्‍टरवर खरीप पिकांची लागवड होते. त्यामुळे पीककर्जाची मागणी देखील खरिपात सर्वाधिक राहते. त्यानुसार खरिपात ५८ हजार ७१७ शेतकऱ्यांनी पीककर्ज घेतले. मात्र खरीपाच्या सुरुवातीला पावसाची संततधार, त्यानंतरच्या काळात अतिवृष्टी यामुळे पिकांवर कीडरोगाचा प्रादुर्भाव वाढला.

परिणामी उत्पादकता आणि उत्पन्न प्रभावित झाले. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना सोयाबीनचा उतारा एकरी केवळ २ ते तीन पोतेच आला. काही भागात सोयाबीन शेंगाच भरल्या नसल्याच्या तक्रारी वाढीस लागल्या. खरिपातील संकटातून सावरत शेतकऱ्यांनी रबी हंगामाची तयारी केली. एकूण ६४ हजार ३०० हेक्‍टरवर रबी पिकांची लागवड झाली. त्यामध्ये १४ हजार ५०० हेक्‍टरवर गहू तर ४५ हजार हेक्‍टवर इतर पिके आहेत. रबी हंगामात ६८ हजार ७४५ शेतकऱ्यांनी पीककर्जाची उचल केली.

३१ जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांना एकूण ७२१ कोटी १५ लाख रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप करण्यात आल्याचे अग्रणी बॅंकेच्या सूत्रांनी सांगितले. बॅंक ऑफ इंडियाकडून मे महिन्यात सर्वाधिक ५०४ शेतकऱ्यांना ४०९.०९ कोटींचे कर्ज वितरण करण्यात आले. भारतीय स्टेट बॅंकेने याच महिन्यात १२ शेतकऱ्यांना १२ कोटी ९९ लाख रुपयांचे कर्ज वाटप केले, असेही सांगण्यात आले. या हंगामात हरभऱ्यावर घाटेअळीचा प्रादुर्भाव झाला. परिणामी या हंगामातही उत्पादकता प्रभावित होण्याची भीती शेतकऱ्यांच्या मनात आहे.

पीककर्ज घेणारे शेतकरी      खरीप     ५८७१७ रब्बी    ६८७४५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com