पुणे विभागात साडेचौदा हजारांवर शेततळी पूर्ण

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  ः पाणीटंचाईच्या कालावधीत शेतकऱ्यांनी घेतलेल्या पीक उत्पादनावर विपरित परिणाम होतो. यावर ठोस स्वरूपाच्या दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला शेततळे योजना राबविण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पुणे विभागातील पाच जिल्ह्यांत जूनअखेरपर्यंत १४, ५२७ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहे. सातारा जिल्ह्यात सर्वांत कमी म्हणजेच अवघी ५१ टक्के शेतततळ्यांची कामे पूर्ण झाली आहे. त्यामुळे हा जिल्हा मागेल त्याला शेततळ्यांच्या कामांमध्ये पिछाडीवर असल्याचे चित्र दिसते.  

पावसाचा खंड आणि पाणीटंचाई त्यामुळे होणारे पिकाचे नुकसान टाळण्यासाठी शासनाने योजनेच्या माध्यमातून शेततळी उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी करण्यात आली होती. मागील दोन वर्षांत या योजनेअंतर्गत पुणे विभागातील सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि पुणे या पाच जिल्ह्यांसाठी १७ हजार ३२० शेततळ्यांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यासाठी ८० हजार ३७३ अर्ज दाखल झाले होते. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केल्यानंतर ४१ हजार ७९७ शेततळ्यांसाठी तांत्रिकदृष्ट्या योग्य जागा उपलब्ध असल्याचे मंजूर केले होते. त्यानंतर प्रत्यक्षात ३१ हजार ६४० शेततळी खोदण्यासाठी कार्यरंभ आदेश देण्यात आले होते.

विभागात मे महिनाअखेर १३ हजार ७९ कामे, जून महिनाअखेर १४४८ कामे पूर्ण झाली आहेत. सध्या एक हजार २७ कामे सुरू असून, विभागात सरासरी ७६ टक्के कामे पूर्ण झाली आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यात ८४, सोलापूर जिल्ह्यात ६४, सातारा जिल्ह्यात ५१, सांगली जिल्ह्यात १०२, कोल्हापूर जिल्ह्यात ७० टक्के शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त कार्यालयातील सूत्रांनी दिली.  

पुणे विभागातील शेततळ्यांची स्थिती
जिल्हा लक्ष्यांक पूर्ण झालेली कामे
पुणे २५०० २२१३
सातारा २००० १०७०
सोलापूर  ८०००  ५५१०
सांगली ४५०० ५५०४
कोल्हापूर ३२० २३०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com