अकोल्यात रासायनिक खतांचा १८ हजार टन साठा उपलब्ध

खते
खते

अकोला : या हंगामासाठी जिल्ह्याला ८३ हजार ५२० टन खतांचा साठा मंजूर झाला असून, सध्या खते मुबलक प्रमाणात उपलब्ध अाहेत, अशी माहिती जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी डॉ. मुरली इंगळे यांनी दिली. ३० जूनअखेर जिल्ह्यात १८ हजार २६५ टन खतांचा साठा शिल्लक असल्याचे त्यांनी सांगितले.

खरीप हंगामासाठी युरिया, डीएपी, एमअोपी, एससपी, संयुक्त खते, मिश्रखते असे मिळून ८३ हजार ५२० टन खतांचे अावंटन मंजूर झाले होते. ३० जूनपर्यंत २३ हजार १५९ टन खतांचा पुरवठा झाला अाहे. यात प्रामुख्याने ११ हजार ३६५ टन संयुक्त खते उपलब्ध झाली अाहेत. याशिवाय जिल्ह्यासाठी डीएपी ३७०५, युरिया ३४१२, एसएसपी १७३७, मिश्रखते १११० टन मिळाले अाहे. शिवाय ३१ मार्चअखेर सर्व खते मिळून १० हजार १५९ टन साठा शिल्लक होता. या दोन्ही प्रकारच्या खतांचा मिळून एकूण ३३ हजार ७३४ टनसाठा झाला होता.

जिल्ह्यात पेरण्यांची कामे वेगाने सुरू असून, जूनमध्ये लागवड झालेली पिके अाता एक महिना कालावधीची होत अाहेत. या पिकांना खत मात्रा देण्याचे काम शेतकऱ्यांनी सुरू केले. शिवाय पेरणीसोबतही खताची मात्रा दिली जात अाहे. हंगामासाठी अातापर्यंत १५ हजार ४६९ टन खत विक्री झाली अाहेत. यात संयुक्त खतांची सर्वाधिक ६७२० टन विक्री झाली. शेतकरी पिकांना गरजेनुसार खत देत असल्याने पूर्वीसारखा मोठा उठाव नसल्याची बाबही श्री. इंगळे यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांना गरज असलेल्या खतांचा साठा उपलब्ध असून, नियोजनानुसार अाणखी वेळोवेळी मिळणार अाहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com