agriculture news in marathi,Flavor between Aurangabad 1000 to 2500 rupees per quintal | Agrowon

औरंगाबादेत फ्लाॅवर १००० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटल

टीम अॅग्रोवन
रविवार, 2 जून 2019

औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. १) फ्लॉवरची ९७ क्‍विंटल आवक झाली. त्यास १००० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

औरंगाबाद बाजार समितीमध्ये शनिवारी हिरव्या मिरचीची १६३ क्‍विंटल आवक झाली. तिला ४००० ते ५००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ३८५ क्‍विंटल आवक झालेल्या कांद्याचे दर ३०० ते ११०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. १५० क्‍विंटल आवक झालेल्या टोमॅटोला १००० ते २८०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ३५ क्‍विंटल आवक झालेल्या वांग्याचे दर ७०० ते १३०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले.

औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. १) फ्लॉवरची ९७ क्‍विंटल आवक झाली. त्यास १००० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

औरंगाबाद बाजार समितीमध्ये शनिवारी हिरव्या मिरचीची १६३ क्‍विंटल आवक झाली. तिला ४००० ते ५००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ३८५ क्‍विंटल आवक झालेल्या कांद्याचे दर ३०० ते ११०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. १५० क्‍विंटल आवक झालेल्या टोमॅटोला १००० ते २८०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ३५ क्‍विंटल आवक झालेल्या वांग्याचे दर ७०० ते १३०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले.

गवारची २१ क्‍विंटल आवक, तर दर १५०० ते ४००० रुपये, काकडीची ७८ क्‍विंटल आवक, तर दर ४०० ते १००० रुपये, भेंडीची ६३ क्‍विंटल आवक, तर दर १००० ते २५०० रुपये, पत्ताकोबीची आवक १४७ क्‍विंटल, तर दर ७०० ते १२०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. १४ क्‍विंटल आवक झालेल्या लिंबूला २५०० ते ३५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. 

शेवग्याची ३७ क्‍विंटल आवक झाली. त्यास १००० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटल दर राहिला. ४ क्‍विंटल आवक झालेल्या दुधी भोपळ्याला ६०० ते ८०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ढोबळ्या मिरचीची आवक ७५ क्‍विंटल, तर दर १००० ते १५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ३ क्‍विंटल आवक झालेल्या चवळीला ४००० ते ५००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. कारल्याची आवक ६ क्‍विंटल, तर दर २००० ते २५०० रुपये, मेथीची १५०० जुड्यांची आवक, तर दर ८०० ते १२०० रुपये प्रतिशेकडा राहिला. ६९०० जुड्यांची आवक झालेल्या पालकचे दर ६०० ते ८०० रुपये प्रतिशेकडा राहिले. 

कोथिंबिरीची १८ हजार जुड्यांची आवक, तर दर ५०० ते ७०० रुपये, आंब्याची १७३ क्‍विंटल आवक, तर दर  २००० ते ७००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ९ क्‍विंटल आवक झालेल्या मोसंबीला १५०० ते ४५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. डाळिंबाची आवक २० क्‍विंटल, तर दर ६०० ते १२०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले.

२७७ क्‍विंटल आवक झालेल्या कैरीला १००० ते १६०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ६०० क्‍विंटल आवक झालेल्या बटाट्याचे दर ९०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ३९ क्‍विंटल आवक झालेल्या खरबूजला १००० ते १८०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. १४० क्‍विंटल आवक झालेल्या टरबूजचे दर ८०० ते ९५० रुपये प्रतिक्‍विंटल राहिल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.


इतर ताज्या घडामोडी
स्वामीनाथन सूत्रानुसार हमीभाव दिल्याचा...नाशिक: स्वामीनाथन सुत्राप्रमाणे उत्पादन खर्च...
उस्मानाबाद, लातूर, बीडमध्ये पावसाचा जोर औरंगाबाद : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यात बुधवारी (...
नगरच्या ४० महसूल मंडळांत जोरदार पाऊसनगर : जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी बुधवारी (ता.३)...
परभणी, नांदेड, हिंगोलीत पावसामुळे कापूस...परभणी : परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यात गेल्या...
बुलडाण्यात पीककर्जाचे ७ टक्केच वाटप बुलडाणा : पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीच्या...
कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभर संततधार...कोल्हापूर : जिल्ह्यात दिवसभर संततधार पाऊस सुरूच...
निसर्ग चक्रीवादळाचा पुणे जिल्ह्याला...पुणे : निसर्ग चक्रीवादळाचा जिल्ह्यालाही फटका...
नाशिकच्या पूर्व भागात वादळामुळे नुकसान नाशिक : जिल्ह्यात बुधवार (ता.३) सकाळपासून सर्वदूर...
सांगली जिल्ह्यात बरसला मुसळधार सांगली : कोकणचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या...
विदर्भात सर्वदूर मान्सूनपूर्व पावसाची...नागपूर : विदर्भात सर्वदूर मान्सूनपूर्व पावसाने...
साताऱ्यात वाऱ्यासह मुसळधार पाऊस सातारा : जिल्ह्यात बुधवारी सकाळापासून...
‘निसर्ग’मुळे रत्नागिरी जिल्ह्यात...रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यात...
भाटी मिऱ्या समुद्रात नांगरलेली जहाज...चिपळूण, रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार...
जीएम पिकांच्या मान्यतेसाठी केंद्राकडे...नागपूर: जागतिकस्तरावर जीएम पिकांच्या लागवडीस...
विविध मागण्यांसाठी रेशन दुकानदार ...नाशिक: राज्यातील स्वस्त धान्य दुकानदार व...
मका खरेदी तातडीने सुरू कराबुलडाणा ः मोताळा तालुक्‍यात मागील दहा दिवसांपासून...
शेतकऱ्यांना त्रास झाल्यास भाजप आंदोलन...अकोला ः शेतकऱ्यांना बी-बियाणे, कर्जपुरवठा तसेच...
सिंधुदुर्गात पाऊस सुरूच सिंधुदुर्ग: जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही...
जादा खरेदी दर, नापासच्या अधिक ...अकोला ः महाबीजने सोयाबीन वाणाच्या प्रमाणित...
ऊस उत्पादक केंद्राचे वैरी आहेत काय? कोल्हापूर: केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या...