agriculture news in marathi,flood situation in district, gadchiroli, maharashtra | Agrowon

गडचिरोली जिल्ह्यात २०० गावांचा संपर्क तुटला
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 5 सप्टेंबर 2019

नागपूर : जून महिन्यात खंड देत शेतकऱ्यांसह सर्वांची चिंता वाढविणाऱ्या पावसाने ऑगस्ट महिन्यापासून जोरदार पुनरागमन केले. गत दोन दिवसांपासून पूर्व विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया तसेच चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुुरू आहे. जोरदार पावसामुळे नद्यांना पूर आला असून गडचिरोली जिल्ह्यातील तब्बल २०० गावांचा संपर्क तुटला आहे. पर्लकोटा, पामलगौतम, प्राणहितासह अनेक नद्या दुथडी भरून वाहत असल्याने गेल्या दोन दिवसांपासून पूरस्थिती कायम आहे. 

नागपूर : जून महिन्यात खंड देत शेतकऱ्यांसह सर्वांची चिंता वाढविणाऱ्या पावसाने ऑगस्ट महिन्यापासून जोरदार पुनरागमन केले. गत दोन दिवसांपासून पूर्व विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया तसेच चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुुरू आहे. जोरदार पावसामुळे नद्यांना पूर आला असून गडचिरोली जिल्ह्यातील तब्बल २०० गावांचा संपर्क तुटला आहे. पर्लकोटा, पामलगौतम, प्राणहितासह अनेक नद्या दुथडी भरून वाहत असल्याने गेल्या दोन दिवसांपासून पूरस्थिती कायम आहे. 

पूर्व विदर्भातील चंद्रपूर, भंडार, गोंदिया तसेच नागपूर जिल्हयाल्ह्याच्या काही भागांत धान लागवड होते. परंतू सुरवातीला पावसाने दडी मारल्याने भंडारा जिल्ह्यात धान रोवणीच्या कामांवर परिणाम झाला. त्यानंतर पावसाने हजेरी लावली. परिणामी पेरण्या कशाबशा ९४ टक्क्यांपर्यंत पोचल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. सुरवातीला कमी बरसलेल्या पावसाने त्यानंतर आपला अनुशेष भरून काढला.

पूर्व विदर्भासह पश्चिम विदर्भातील अकोला, अमरावती जिल्ह्यातही पावसाची संततधार सुरू आहे. गडचिरोली जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. पर्लकोटा नदीला आलेल्या पुरामुळे भामरागड तालुक्‍यातील तब्बल दोनशे गावांचा संपर्क तुटला आहे. गेल्या दोन दिवसांपासून ही गावे संपर्कहीन झाल्याने या भागातील ग्रामस्थांसमोरील अडचणीत वाढ झाली आहे. गडचिरोली शहरातील रस्तेदेखील जलमय झाले होते. गडचिरोली नगरपालिका कार्यालयात देखील पावसाचे पाणी शिरले. शेकडो घरे आणि वस्त्यांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांच्या अडचणीत वाढ झाली. बुधवारी दुपारनंतर गडचिरोली शहरात पावसाने उघडीप दिली होती. अमरावती जिल्हयाच्या काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. नागपुरातदेखील बुधवारी मुसळधार पाऊस झाला. 

इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यात उडदाचे उत्पादन यंदा ७०...नगर  ः जिल्ह्यात यंदा उडदाची उत्पादकता...
पीक उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न...पुणे  ः  कृषी विद्यापीठांकडून शेतकरी...
दुष्काळी स्थितीत आश्‍वासक ठरणारे ‘...सध्याच्या दुष्काळी स्थितीत वा बदलत्या हवामानात...
महाराष्ट्र दुष्काळमुक्त करणार ः...मुंबई : आगामी पाच वर्षांत महाराष्ट्र दुष्काळमुक्त...
आम्ही सत्तेत आल्यास चार महिन्यांत...वणी, जि. यवतमाळ  ः शेतकऱ्यांना कर्जमाफी...
नाशिकमध्ये वांगी २७०० ते ५००० रुपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
बहुगुणी अन्‌ बहुपयोगी जवस जवसाच्या बियांचा वापर खाद्य तेल आणि औद्योगिक...
नंदुरबार जिल्ह्यात पीक काढणी वेगातनंदुरबार  : जिल्ह्यात खरिपाच्या हंगामातील...
राज्यात साडेचार हजार सावकार अनधिकृतपुणे : शेतकरी आत्महत्येच्या समस्येवर प्रभावी उपाय...
सोयाबीन सुडी पेटविण्याच्या घटनांमध्ये...बुलडाणा  ः वैयक्तिक मतभेद, आपापसातील वाद आदी...
बिगर नोंदणीकृत उत्पादनासाठी हवा कायदा...सध्या खते, कीटकनाशके उत्पादन व विक्रीसाठी दोन...
आपल्या मताची किंमत दाखवून देण्याची वेळ...शेती, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि निवडणूक या विषयांचा...
भिवापूर येथे सोयाबीन खरेदीला सुरवातभिवापूर, नागपूर  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
महायुतीत आमची अवस्था इकडे आड तिकडे...नाशिक  : ‘‘महायुतीच्या जागावाटपात नाराज असलो...
निवडणुकीत शेतकरी प्रश्न शोधावे लागतात...निवडणुकांतून शेतकरी सोडून सारे राजकीय घटक...
जळगाव बाजार समितीत धान्याचे लिलाव बंदचजळगाव  ः जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या व...
बाजार सुधारणांपासून शेतकरी वंचितचशेतकरी आणि शेतीमालाला शोषित बाजार व्यवस्थेच्या...
कांदा खरेदी-विक्रीच्या व्यवहारांवर...धुळे  ः खानदेशात कांद्यासाठी प्रसिद्ध...
ग्रामविकासासाठी स्वतंत्र निधी, पाणी...महाराष्‍ट्रातील २८ हजार ग्रामपंचायतीपैकी २३ हजार...
मंडणगड : जंगली श्वापदांकडून भातशेतीचे...मंडणगड, जि. रत्नागिरी : शेतात तयार झालेल्या...