उस्मानाबाद, बीडमध्ये चारा छावण्यांत वाढ

उस्मानाबाद, बीडमध्ये चारा छावण्यांत वाढ
उस्मानाबाद, बीडमध्ये चारा छावण्यांत वाढ

औरंगाबाद : मराठवाड्यावरील दुष्काळाचे सावट अद्यापही कायम आहे. लांबलेल्या, असमान पावसामुळे हे संकट अधिक गडद होत आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत सोमवार (ता. २२) अखेरपर्यंत तीन जिल्ह्यांत ४१ छावण्यांची भर पडली. त्यात जनावरांची संख्या जवळपास दुपटीने वाढली. बीड व उस्मानाबाद जिल्ह्यात चारा छावण्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यामुळे दुष्काळाच्या झळा पुन्हा तीव्र होत असल्याचे चित्र आहे. 

मराठवाड्यात दुष्काळामुळे ११५३ चारा छावण्यांना मंजुरात देण्यात आली. त्यापैकी उन्हाळ्यात सुरू असलेल्या चारा छावण्या पावासाच्या आगमनानंतर मोठ्या प्रमाणात घटल्या. १६ जुलैअखेरपर्यंत औरंगाबाद, परभणी, बीड व उस्मानाबाद या चार जिल्ह्यांत ५४ चारा छावण्या सुरू होत्या. त्यामध्ये औरंगाबाद व परभरणीमधील प्रत्येकी एक, तर बीडमधील ११, उस्मानाबादमधील ४१ चारा छावण्यांचा समावेश होता. त्यात लहान मोठी ३७ हजार ८१९ जनावरे होती. 

पाऊस लांबल्याने अनेक गावांमधील शिवारात चाऱ्याची उगवणच झाली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा पशुपालकांना आपली जनावरे घेऊन छावणीचा रस्ता धरण्याची वेळ आली आहे. परभणी जिल्ह्यातील एकमेव चारा छावणी बंद झाली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील एक चारा छावणी सुरू आहे. तरीही बीड व उस्मानाबाद जिल्ह्यात चारा छावण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. १६ जुलैअखेर ११ वर असलेली बीड जिल्ह्यातील चारा छावण्यांची संख्या ३० वर, तर उस्मानाबादमधील ६४ वरील छावण्यांची संख्या ६४ वर पोचली आहे. 

या छावण्यांत ६२ हजार ७१९ मोठ्या, तर लहान ४८३७ अशी ६७ हजार ५५६ जनावरे छावणीत दाखल आहेत. औरंगाबाद, बीड, आष्टी, वडवणी, गेवराई, उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम, परंडा, कळंब, वाशी आदी तालुक्‍यातील या छावण्या आहेत. 

जिल्हानिहाय छावणीतील जनावरे

औरंगाबाद २२९८
बीड १८१३७
उस्मानाबाद ४७१२१ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com