agriculture news in Marathi,four lac heacter crop damage in Nanded District, Maharashtra | Agrowon

नांदेड जिल्ह्यात सव्वाचार लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान

टीम अॅग्रोवन
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

नांदेड: नांदेड जिल्ह्यात शुक्रवार (ता. १८ ) ते सोमवार (ता. २८ ऑक्टोबर) या कालावधीत झालेल्या पावसामुळे ४ लाख ११ हजार ३७५ हेक्टरवरील सोयाबीन, कापूस, तूर, ज्वारी, मका या पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पावसामुळे जिल्ह्यातील सोळा तालुक्यांतील १ हजार ४९० गावांतील ५ लाख ४३ हजार ५६३ शेतकरी बाधित झाले आहेत.

नांदेड: नांदेड जिल्ह्यात शुक्रवार (ता. १८ ) ते सोमवार (ता. २८ ऑक्टोबर) या कालावधीत झालेल्या पावसामुळे ४ लाख ११ हजार ३७५ हेक्टरवरील सोयाबीन, कापूस, तूर, ज्वारी, मका या पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पावसामुळे जिल्ह्यातील सोळा तालुक्यांतील १ हजार ४९० गावांतील ५ लाख ४३ हजार ५६३ शेतकरी बाधित झाले आहेत.

जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात ७ लाख ५८ हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली होती. त्यापैकी पावसामुळे ४ लाख ११ हजार ३७५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यंदा जिल्ह्यात सोयाबीनची ३ लाख ७० हजार हेक्टरवर पेरणी झाली होती. त्यापैकी २ लाख ४१ हजार ४९८ हेक्टरवरील पीकाचे ७० ते ८० टक्के नुकसान झाले आहे. कापणी करून शेतात ठेवलेल्या तसेच शेतातील उभ्या सोयाबीन पिकास मोड फुटले आहेत.

कापसाची एकूण २ लाख ३१ हजार हेक्टरवर लागवड झालेली असून त्यापैकी १ लाख १७ हजार १९८ हेक्टरवरील पिकांचे ३० ते ४० टक्के नुकसान झाले आहे. सखल भागातील शेतामध्ये पाणी साचून राहिल्याने कापसाची बोंडे सडली आहेत. फुटलेल्या बोंडातील कापसाला मोड फुटले आहेत. ज्वारीची ३५ हजार ६०० हेक्टरवर पेरणी झालेली आहे. त्यापैकी २२ हजार १२४ हेक्टरवरील ज्वारी पिकाचे ५० ते ६० टक्के नुकसान झाले आहे.

उभ्या ज्वारीची कणसे काळी पडली आहेत. शेतामध्ये कापून ठेवलेल्या ज्वारीच्या कणसांना मोड फुटले आहेत. नायगाव, उमरी तालुक्यातील तुरीचे ६ हजार ६ हेक्टर ७ क्षेत्र बाधित आहे. तसेच एकूण २४ हजार ५४९ हेक्टरवरील इतर पिकांचे यामध्ये भाजीपाला, फळपिकांचे नुकसान झाले आहे. 

जिल्ह्यातील सोळा  तालुक्यांतील १ हजार ५७० गावांमध्ये ७ लाख  ९५ हजार ८०० शेतकरी खातेदार आहेत. पावसामुळे १ हजार ४९० गावांतील ५ लाख ४३ हजार ५६३ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्याचा  प्राथमिक अंदाज आहे. नुकसाग्रस्त पिकांचे  पंचनामे सुरू आहे. पंचमाम्याचे काम   पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्षात नुकसान झालेल्या पिकांचे क्षेत्र तसेच बाधित शेतकऱ्यांची संख्या स्पष्ट होईल.


इतर ताज्या घडामोडी
शेती उत्पादन वाढीसाठी मधमाश्‍यांचा मोठा...नाशिक: मधमाश्‍यांचे संगोपन करून त्यांच्या...
कृत्रिम रेतनावर नियंत्रण योग्यचपुणे : कृत्रिम रेतन करताना शास्त्रोक्त...
कडधान्यवर्गीय बियाणे उत्पादकांना अनुदान...अकोला  ः कडधान्यवर्गीय पिकांच्या पायाभूत...
अमरावती ‘एसआयटी’कडूनही अजित पवार निर्दोषमुंबई : नागपूर विभागातील सिंचन घोटाळ्यापाठोपाठ...
नांदेड जिल्ह्यात कृषी योजनेंतर्गत १...नांदेड : जिल्हा परिषदेच्या कृषी...
पुणे विभागात गळीत हंगामात १८ साखर...पुणे : गळीत हंगाम सुरू होऊन जवळपास दीड महिना होत...
खानदेशात ज्वारीची आवक नगण्य, दरही...जळगाव  ः खानदेशातील प्रमुख बाजार...
नगर जिल्ह्यात पाण्याअभावी २४० पाणी...नगर : आक्टोबर महिन्यात जिल्हाभर जोरदार पाऊस...
जळगाव जिल्ह्यात सिंचनासाठी धरणांतून पाच...जळगाव  ः पावसाळ्यात सरासरीच्या तीस टक्के...
सोलापुरात दरवाढीनंतर कांद्याच्या आवकेत...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सातारा जिल्ह्यात रब्बी पीककर्जाचे सात...सातारा : जिल्ह्यात खरीप हंगामाप्रमाणेच रब्बी...
‘पांडुरंग', 'विठ्ठल’च्या निवडणुकांकडे...सोलापूर : आगामी वर्षात जिल्ह्यातील आघाडीच्या...
शेतीमधील गरज ओळखा ः डॉ. सिंगजालना : ‘‘कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांनी...
सिद्धेश्‍वर कारखान्याची चिमणी तीन...सोलापूर : सिद्धेश्‍वर साखर कारखान्याची चिमणी...
लोणंद बाजार समितीत कांद्याला ११...लोणंद, जि. सातारा : कांद्याची आवक घटल्याने लोणंद...
किमान तापमानात घसरण, थंडीत चढ-उतार...महाराष्ट्राच्या समुद्र किनारपट्टीवर उत्तर दिशेने...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ढगाळ वातावरणाचा...सिंधुदुर्ग : गेले पाच दिवस जिल्ह्यात असलेल्या...
उसाला प्रतिटन चार हजार रुपये दर द्यावासातारा : ‘‘उसाला प्रतिटन चार हजार रुपये द्या, दोन...
टेंभू, ताकारी, म्हैसाळच्या पूर्णत्वाची...सांगली : टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ योजनांच्या...
चोरट्यांपासून कांद्याच्या रक्षणासाठी...नगर ः बाजारात टंचाई असल्याने महिनाभरापासून...