प्रत्येक पात्र शेतकऱ्याला पीककर्जाचा लाभ द्या ः मोडक

प्रत्येक पात्र शेतकऱ्याला पीककर्जाचा लाभ द्या ः मोडक
प्रत्येक पात्र शेतकऱ्याला पीककर्जाचा लाभ द्या ः मोडक

वाशीम : जिल्ह्यातील खरीप पीककर्ज वाटपाचा जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आढावा घेण्यात आला. सर्व बँकांनी पीककर्ज वितरण मेळाव्यांचे आयोजन करून अद्याप कर्ज न घेतलेल्या प्रत्येक पात्र शेतकऱ्याला पीककर्जाचा लाभ देण्याची सूचना जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी केल्या. या वेळी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक विजय खंडरे यांच्यासह विविध बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या वेळी श्री. मोडक म्हणाले, शेतकऱ्याला पीककर्जाचा लाभ मिळवून देण्यासाठी बँकांनी कर्ज मेळावे घ्यावेत. या मेळाव्यामध्ये प्राप्त होणाऱ्या अर्जांची संख्या, पात्र अर्ज व वितरित करण्यात आलेले कर्ज, अपात्र अर्ज, नवीन पात्र शेतकरी याविषयीचा अहवाल सादर करावा. शेतकऱ्यांच्या गटशेतीस प्रोत्साहन व सबलीकरणासाठी चालना योजनेअंतर्गत शेतकरी उत्पादक गटाला १ कोटी रुपयांपर्यंत प्रकल्प मंजूर करण्यात येणार आहे. जिल्ह्यात अशा २० गटांना मान्यता मिळाली आहे. या शेतकरी गटांना अर्थसाह्या उपलब्ध करून देण्यासाठी बँकांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन मोडक यांनी या वेळी केले. बोरगाव येथील कृषिदीप शेतकरी उत्पादक कंपनीचे वसंता लांडकर व बाळखेड येथील बाळनाथ शेतकरी उत्पादक कंपनीचे विलास गायकवाड यांनी या वेळी आपल्या कंपनीमार्फत उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पाची माहिती दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com