Agriculture news in marathi;Give Orange growers a lot of help | Agrowon

‘संत्रा उत्पादकांना द्या भरीव मदत’
टीम अॅग्रोवन
बुधवार, 19 जून 2019

नागपूर ः उन्हामुळे संत्रा उत्पादकांचे झालेल्या नुकसानचीच्या भरपाईचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचा निर्णय जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. जिल्हा परिषद अध्यक्षा निशा सावरकर यांच्या अध्यक्षतेत ही सभा झाली.

नागपूर ः उन्हामुळे संत्रा उत्पादकांचे झालेल्या नुकसानचीच्या भरपाईचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचा निर्णय जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. जिल्हा परिषद अध्यक्षा निशा सावरकर यांच्या अध्यक्षतेत ही सभा झाली.

विरोधी पक्षनेते मनोहर कुंभारे यांनी दुष्काळ आणि उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे फळबागांच्या झालेल्या नुकसानीचा मुद्दा मांडला. त्यांनी संत्रा मोसंबीच्या बागांची अवस्था, त्यामुळे संत्रा बागायतदारांचे झालेले नुकसानीची स्थिती मांडली. अशा अवस्थेत शेतकरी जगावा याकरिता १०० टक्‍के नुकसानभरपाईची मागणी शेतकऱ्यांना मिळावी, अशी मागणी त्यांनी सभागृहाला केली. माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले म्हणाले, की जिल्हा परिषदेने या संदर्भात सभागृहात ठराव घेऊन तो शासनाकडे पाठवावा. संत्र्यांच्या करपलेल्या बागा संदर्भातील स्थिती शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजू हरणे यांनी मुख्यमंत्र्यांच्याही निदर्शनास आणून दिली.

काटोल, कळमेश्‍वर, नरखेड भागांत मोठ्या प्रमाणात संत्रा पिकाचे नुकसान झाले आहे. अर्थ सभापती उकेश चव्हाण म्हणाले, पाऊस लांबल्यामुळे संत्रा, मोसंबीची झाडे मरत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागते आहे. परिणामी, वाढीव आणि भरीव मदत शेतकऱ्यांना मिळावी, अशी मागणी त्यांनी केली. कॉँग्रेसच्या काळात संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्यात आली होती. अशीच भरीव मदत शेतकऱ्यांना जाहीर व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्‍त केली. या वेळी नुकसानभरपाईच्या संदर्भात सभागृहात एकमताने मंजूर केलेला ठराव, शासनाकडे पाठविण्यात येईल, अशी माहिती अध्यक्षा निशा सावरकर यांनी सभागृहाला दिली.
 

इतर ताज्या घडामोडी
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...
गोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...
पेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...
जळगावात लाल कांद्याचे दर आणि आवक टिकूनजळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...
नाशिकमध्ये हिरवी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक ः नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
पुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे  : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...
`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई   : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...
नवती केळी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
सांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...
‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी   : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
वृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
नांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
...तर रासायनिक खते, कीटकनाशकांचे ...पुणे  ः  केंद्र सरकारच्या वतीने झिरो...