साखर कारखान्यांसाठी कर्ज परतफेडीचा कालावधी वाढवला

देशातील साखर कारखान्यांसाठी केंद्र शासनाने आणलेल्या सॉफ्ट लोन योजनेमध्ये कर्जफेड सुरू करण्याचा कालावधी आता दीड वर्षाचा केल्याने सहकारी साखर कारखान्यांना दिलासा मिळेल. कारखाने अनेक समस्यांना तोंड देत आहेत. त्यामुळे कर्जफेड सुरू झाल्यास आणखी आर्थिक अडचणी वाढणार होत्या. त्यामुळे हा कालावधी किमान दोन वर्षांचा करण्यासाठी आमचा पाठपुरावा सुरू होता. मात्र, दोन ऐवजी दीड वर्ष करण्यास दिलेली संमतीदेखील फायदेशीर ठरेल. - प्रकाश नाईकनवरे, व्यवस्थापकीय संचालक,राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने महासंघ
साखर कारखाना
साखर कारखाना

नवी दिल्ली ः केंद्र सरकारने साखर कारखान्यांसाठी सुरू केलेल्या १५ हजार कोटींची सॉफ्ट लोन योजना कासव गतीने सुरू आहे. त्यामुळे केंद्राने साखर कारखान्यांसाठी कर्ज परतफेड सुरू करण्याच्या कालावधीत (मोरॅटरियम पीरियड) सहा महिन्यांची वाढ केली आहे. आता परतफेड सुरू करण्याचा कालावधी दीड वर्ष झाला आहे.  सॉफ्ट लोन हे अनुदानीत व्याज दरावर दिले जाते. तर, कर्ज परतफेड सुरू करण्याचा कालावधी, ज्या कालावधीत कारखान्यांना कर्जाची रक्कम परत देण्याची आवश्‍यता नसते. केंद्र सरकारने देशातील साखर कारखान्यांना शेतकऱ्यांची थकबाकी अदा करण्यासाठी आणि अतिरिक्त साखर इथेनॉल निर्मितीकडे वळविण्यासाठी सॉफ्ट लोन दिले आहे. हे कर्ज दोन टप्प्यांत दिले. पहिल्यांदा जून २०१८ मध्ये ४ हजार ४४० कोटी आणि दुसऱ्यांदा मार्च २०१९ मध्ये १० हजार ५४० कोटींचे कर्ज दिले.  ‘‘देशात इथेनॉल निर्मिती वाढविण्यासाठी एक वर्षाच्या कर्ज परतफेड सुरू करण्याच्या कालावधीने सॉफ्ट लोनची योजना सुरू करण्यात आली. आता मात्र या कालावधीत वाढ करून दीड वर्ष करण्यात आली आहे,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली.  सॉफ्ट लोन योजना अन्न मंत्रालयाकडून राबविली जाते. योजनेसाठी ४१८ अर्ज आले होते, त्यापैकी २८२ अर्ज पात्र ठरले आहेत. त्यातील ६ हजार १३९ कोटी कर्जासाठी ११४ अर्ज क्लीअर करण्यात आले आहेत. बॅंकांनी ४५ अर्जदारांना कर्ज मंजूर केले असून ३३ कारखान्यांना ९०० कोटींचे वाटपही केले आहे. केंद्राने १५ हजार कोटी जाहीर केले असले तरी केवळ त्यापैकी ५ ते ६ टक्केच कर्जवाटप केले आहे.  मंत्रालय पातळीवरच उशीर साखर कारखान्यांनी सॉफ्ट लोनसाठी अर्ज केल्यानंतर अन्न मंत्रालयात पडताळणी होऊन पात्र अर्जांची यादी बॅंकांकडे दिली जाते. त्यानंतर कारखान्यांना कर्जे मिळतात. मात्र, मंत्रालय पातळीवरच खूप उशीर होतो. त्यामुळे ही योजना धीम्या गतीने सुरू आहे. ही योजना जून २०१८ मध्ये सुरू झाली. मात्र अर्जांची पडताळणी अद्यापही सुरू आहे. परिणामी, कारखान्यांना या योजनेचा पूर्ण फायदा होत नाही. कारखान्यांना इथेनॉल प्रकल्प उभारणीसाठी किमान १८ महिने लागतात, अशी माहिती अन्न मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली. सॉफ्ट लोन योजनेचा आढावा

  •   थकबाकी परतफेड, अतिरिक्त साखर इथेनॉलकडे वळविण्याचे उद्दीष्ट
  •   ९ ते १० लाख टन साखर इथेनॉलकडे वळविण्याचे उद्दीष्ट 
  •   अन्न मंत्रालयाकडून योजना राबविली जाते
  •   केंद्राने १५ हजार कोटी दोन टप्प्यात जाहीर
  •   अर्ज पडताळणीसाठी मंत्रालय पातळीवरच उशीर
  •   जून २०१८ पासून अर्जांची पडताळणी सुरूच
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com