agriculture news in Marathi,gram seed available on subsidy for Rabbi, Maharashtra | Agrowon

रब्बीसाठी अनुदानित हरभरा बियाणे उपलब्ध
टीम अॅग्रोवन
सोमवार, 14 ऑक्टोबर 2019

पुणे: राज्यात गेल्या रब्बी हंगामात अनुदानित हरभरा बियाण्यांची झालेली टंचाई विचारात घेता यंदा ७१ हजार क्विंटल अनुदानित बियाण्यांचा पुरवठा करण्यात आला आहे. 

पुणे: राज्यात गेल्या रब्बी हंगामात अनुदानित हरभरा बियाण्यांची झालेली टंचाई विचारात घेता यंदा ७१ हजार क्विंटल अनुदानित बियाण्यांचा पुरवठा करण्यात आला आहे. 

कृषी आयुक्तालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चालू रब्बी हंगामात हरभरा लागवड चांगली राहण्याची शक्यता आहे. दमदार आणि उशिराच्या मॉन्सूनमुळे बियाणे बदलाचे प्रमाण वाढविण्याची संधी मिळते आहे. हरभरा उत्पादन वाढीला पोषक स्थिती असल्याने अनुदानित बियाणे टंचाई होऊ नये, यासाठी काळजी घेतली जात आहे. त्यामुळे बियाणे बाजारात मागणी असलेल्या वाणांचा पुरवठा करण्यासाठी कृषी विभाग व महाबीजकडून युध्दपातळीवर नियोजन केले जात आहे.

राजविजय २०२, राजविजय २०३ आणि फुलेविक्रम या दहा वर्षांच्या आतील वाणांचा अनुदानित बियाण्यांचा तुटवडा गेल्या हंगामात होता. यंदा ७१ हजार क्विंटल बियाण्यांची उपलब्धता झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय दूर होणार आहे.  

हरभऱ्याच्या या तीन वाणांच्या वीस किलोच्या बियाणे पिशवीची किंमत महाबीजने प्रतिक्विंटल आठ हजार रुपये ठेवली आहे. मात्र, कृषी विभागाच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातील कडधान्य आणि गहू उत्पादन योजनेतून ३५०० रुपये प्रतिक्विंटल अनुदान मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ ४५०० रुपये प्रतिक्विंटल दराने बियाणे मिळेल. 

हरभऱ्याच्या अनुदानित बियाण्यांमध्ये नव्या वाणांचे किमान ५४ हजार क्विंटल वाटप यंदा होईल. त्यासाठी १९ कोटी ११ लाख रुपये अनुदान दिले गेले आहे. जुन्या वाणांचे वाटपदेखील १६ हजार क्विंटलच्या आसपास होत असून त्यासाठी अनुदान चार कोटी रुपये मिळाले आहे. 

“जॅकी व दिग्विजय या जुन्या वाणांवर यंदा अनुदान प्रतिक्विंटल २५०० रुपये राहील. २००७ मधील या जातींना शेतकऱ्यांकडून अद्यापही मागणी आहे. काबुली हरभऱ्यांचे अनुदानित बियाणे मात्र कमी वाटले जाईल. अंदाजे दीड हजार क्विंटलच्या आसपास काबुली पीकेव्ही दोन या वाणाचे वाटप राहील,” अशी माहिती सूत्रांनी दिली. 

अनुदानित गहू बियाणे तीन जिल्ह्यांमध्येच
अनुदानित गहू बियाण्यांसाठी यंदाही मूळ किमतीवर ५० टक्के अनुदान दिले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना १९०० रुपये प्रतिक्विंटल दराने गहू बियाणे खरेदी करता येईल. मात्र, नागपूर, बीड आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्येच ही योजना लागू आहे. त्यात पीडीकेव्ही सरदार, फुले, नेत्रावती, फुले समाधान या नव्या वाणांचा समावेश आहे. जुन्या गहू वाणाला अनुदान कमी दिले जात आहे. त्यामुळे प्रतिक्विंटल २६०० रुपये दराने शेतकऱ्यांना बियाणे मिळणार आहे.

इतर अॅग्रो विशेष
अचूक आकडेवारीचा काळ आठव्या आंतरराष्ट्रीय कृषी सांख्यिकी परिषदेत...
उद्यापासून हंगाम सुरु, पण ऊसतोड बंदच !मुंबई / पुणे  ः राज्यातील यंदाचा ऊस गाळप...
विदर्भ, मराठवाड्यात गारठा वाढलापुणे   : किमान तापमानात घट होत असल्याने...
खतमाफियांमुळे शेतकऱ्यांची मोठी लूटपुणे : बोगस मिश्रखतांचे उत्पादन व विक्री करणाऱ्या...
भरताच्या वांग्यासह दादर ज्वारीसाठी...खानदेशकन्या तथा आपल्या कवितेतून शेतीचे...
बॅंक एकत्रीकरण एक अनावश्‍यक पाऊलभारताने १९९० मध्ये नवीन आर्थिक धोरण स्वीकारले....
भूगर्भ तहानलेलाच!रा ज्यात या वर्षी जोरदार पाऊस झाला. अनेक भागांत...
साखर उद्योगाने मूल्यपदार्थांकडे वळणे...पुणे: देशाच्या ग्रामीण अर्थकारणात मोलाचा वाटा...
देशात कापूस उत्पादन घटणारजळगाव ः देशात सर्वाधिक कापूस उत्पादित करणाऱ्या...
राष्ट्रीय कृषिमुल्य आयोगासमोर ऊस...पुणे : कायद्यातील उणिवांचा फायदा घेत ऊस उत्पादक...
नुकसानग्रस्तांसाठीचे दोन हजार कोटी...मुंबई: राज्यातील ३४ जिल्ह्यांतील ३२५ तालुक्‍...
थंड वारे वाढणार...पुणे : राज्यात किमान तापमानातचा पारा १६ अंशांच्या...
दर्जेदार दुग्धोत्पादनांचा ‘गारवा’ ब्रॅंडकोल्हापूर जिल्ह्यातील मातब्बर दूध संघ दुग्धजन्य...
शेवगा कसे ठरले 'या' शेतकऱ्याचे हुकमी...कायम अवर्षण स्थिती असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील...
'पणन'ची २७ पासून कापूस खरेदी नागपूर ः सिसिआयची खरेदी सुरूच असली तरी कापूस पणन...
शेतीला व्यावसायिक दर्जा आवश्यक: सुहास...पुणे: भावनिकतेच्या आधारे शेती न करता शेतकरी...
कुजलेल्या तुराट्यांच्या झाडण्याही होणार...परभणी ः यंदा तुरीचं पीक लई जोरात आलं होतं. चांगली...
सांगली जिल्ह्यातील अंडी उत्पादकांना...सांगली ः एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांत...
मानवी, शेती आरोग्यासाठी नैसर्गिक शेतीचा...मानवी व शेतीचे आरोग्य याबाबत अधिक जागरूक झालेल्या...
अभ्यास, नियोजनातून देशी दुग्धव्यसाय...भाजीपाला शेती करण्याबरोबरच रेशीमशेती आणि...